प्रेयसी दुसऱ्या मुलासोबत फिरत होती, संतापलेल्या प्रियकराने तरुणासोबत केले ‘हे’ कृत्य

चेंबूर परिसरात राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणीसोबत आदित्यचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. मात्र काही दिवसांपासून ही तरुणी मुद्देशीर याच्यासोबत फिरत होती.

प्रेयसी दुसऱ्या मुलासोबत फिरत होती, संतापलेल्या प्रियकराने तरुणासोबत केले 'हे' कृत्य
पैशाच्या वादातून तरुणाला मारहाण
Follow us
| Updated on: Feb 03, 2023 | 8:38 PM

मुंबई : प्रेयसी दुसऱ्या मुलासोबत फिरत असल्याच्या रागातून प्रियकराने साथीदाराच्या मदतीने तिच्या मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना चेंबूरमध्ये घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. मुद्देशीर शेख असे हत्या करण्यात आलेल्या 21 वर्षीय तरुणाचे नाव आहे. या तरुणाची भररस्त्यात हत्या केल्याची घटना गुरुवारी चेंबूर परिसरात घडली. याबाबत गुन्हे शाखा परिमंडळ 6 च्या अधिकाऱ्यांनी 12 तासात आरोपींना अटक केली आहे. आदित्य त्रिभुवन आणि खलफम सय्यद या दोन आरोपींना अटक केली आहे.

आदित्यचे अनेक दिवसांसोबत तरुणीसोबत प्रेमसंबंध होते

चेंबूर परिसरात राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणीसोबत आदित्यचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. मात्र काही दिवसांपासून ही तरुणी मुद्देशीर याच्यासोबत फिरत होती.

आदित्यला याबाबत माहिती मिळाली. यामुळे आदित्य चांगलाच संतापला आणि त्याने मुद्देशीरला संपवण्याचा कट रचला. यासाठी त्याने आपला मित्र खलफम सय्यद यालाही सोबत घेतले.

हे सुद्धा वाचा

मित्राच्या मदतीने तरुणाला भोसकले

आदित्यने मुद्देशीर शेखला गुरुवारी चेंबूरच्या सिंधी सोसायटी परिसरात गाठले. यानंतर खलफम याच्या मदतीने त्याने मुद्देशीरवर अनेक वार केले. यामध्ये मुद्देशीरचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांनी कसून शोध घेत आरोपींना बेड्या ठोकल्या

घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत तपास सुरु केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करत आरोपींचा शोध सुरु केला.

कल्याण, कुर्ला आदी परिसरात तपास करत गुन्हे शाखेने धारावी परिसरातून दोघांना अटक केली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.