Mumbai Crime : भायखळामध्ये दोघा शिवसैनिकांवर तलवारीने जीवघेणा हल्ला! हल्ल्यातून थोडक्यात बचावले

Byculla Shiv Sena worker Attacked : गुरुवारी रात्री ही घटना घडली.

Mumbai Crime : भायखळामध्ये दोघा शिवसैनिकांवर तलवारीने जीवघेणा हल्ला! हल्ल्यातून थोडक्यात बचावले
शिवसैनिकांवर तलवारीने हल्ला...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 15, 2022 | 8:40 AM

मुंबई : मुंबईतील भायखळामध्ये (Byculla crime News) गुरुवारी रात्री दोघा शिवसैनिकांवर (Shiv sena workers) जीवघेणा हल्ला (Attacked) करण्यात आला. शिवसेना विभाग क्रमांक 11 मधील उपविभाग प्रमुख आणि भायखळा विधानसभा समन्वयकांच्या गाडीवर अज्ञातांनी हल्ला केली. तिघेजण दुचाकीवरुन आले आणि त्यांनी तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यातून दोघे शिवसैनिक बालंबाल बचावले आहे. गुरुवारी रात्री साडे अकरा-बारा वाजवण्याच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून अज्ञात हल्लेखोरांचा शोध घेतला जातो आहे. हल्ला झालेल्या शिवसैनिकांनी पोलीस संरक्षण दिलं जावं, अशी मागणी करण्यात आली आहे. या घटनेचा कसून तपास सध्या पोलीस करत आहेत. हल्ल्याबाबत कळल्यानंतर असंख्य शिवसैनिकांनी भायखळा पोलीस स्टेशन गाठलं होतं आणि याप्रकरणी तातडीनं कारवाई करावी, अशी मागणी केली.

नेमकं काय घडलं?

शिवसेना विभाग क्रमांक 11 चे उपविभाग प्रमुख श्री. विजय कामतेकर व भायखळा विधानसभा समन्वयक श्री. बबन गावकर यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. गुरुवार (14 जुलै) रात्री 11.40 ते 11.50 दरम्यान ई. एस.पाटणवाला मार्ग माझगाव येथे कामतेकर आणि गावकर हे त्यांच्या स्विफ्ट गाडीमध्ये होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या आणि मास्क घातलेल्या तिघा अज्ञात हल्लेखोरांनी तलवारीने स्विफ्ट गाडी (गाडी क्रमांक MH -04 DB 8602) या गाडीवर हल्ला केला. स्विफ्ट गाडीत बसून कामतेकर आणि गावकर आपल्या घरी जात होते. त्यावेळी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.

हे सुद्धा वाचा

हल्ल्याची बातमी कळताच बहुसंख्य शिवसैनिकांनी भायखळा पोलीस ठाण्यात धाव घेतली. जीवघेण्या हल्ल्यानंतर कामतेकर आणि गावकर यांना पोलीस संरक्षण दिलं जावं, अशी मागणी शिवसैनिकांनी केलीय. या प्रकारणी भायखळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सध्या पुढील तपास करीत आहेत. यावेळी भायखळा पोलीस ठाणे येथे उपनेते मनोज जामसूतकार, सूर्यकांत पाटील, रमाकांत रहाटे, मंगेश बनसोड, हेमंत कदम, रमेश रावलं, काका कदम , विनोद शिर्के आणि निगप्पा चलवादी यांच्यासह अनेक शिवसैनिक हजर होते.

हा हल्ला राजकीय वैमन्यसातून झाला की आणखी काही कारणावरुन झाला? दुचाकीवरुन आलेले हल्लेखोर नेमके कोण होते? कुणावर नेमका संशय व्यक्त करण्यात आला आहे? या सर्व प्रश्नांच्या अनुशंगाने भायखळा पोलीस पुढील तपास करत आहेत.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.