कमी वयात सद्गुरु बारचा परवाना घेतल्याप्रकरणी अडचणी वाढ! समीर वानखेडेंवर गुन्हा दाखल

Sameer Wankhede's Sadguru Bar in Navi Mumbai : कार्डेलिया क्रूझ ड्रग आणि आर्यन खान प्रकरण एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर असलेल्या समीर वानखेडे यांना चांगलंच भोवलं असल्याची चर्चा रंगली आहे.

कमी वयात सद्गुरु बारचा परवाना घेतल्याप्रकरणी अडचणी वाढ! समीर वानखेडेंवर गुन्हा दाखल
समीर वानखेडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 3:58 PM

नवी मुंबई : अभिनेता शाहरुखचा मुलगा आर्यन खान (Shahrukh Khan son Aryan Khan) ड्रग्ज प्रकरणानंतर समीर वानखेडे आणि एनसीबी चांगलीच चर्चेत आली. त्यानंतर नवाब मलिकांनी सनसनाटी आरोप करत हा मुद्दा आणखीनच तापला होता. अशातच आता समीर वानखेडे यांच्याविरोधात नवी मुंबईत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोपरी पोलिस ठाण्यात समीर वानखेडेंविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी शंकर गोगावले यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. कमी वयात बारचा परवाना घेतल्याचा ठपका समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे एकूणच कार्डेलिया क्रूझ ड्रग आणि आर्यन खान प्रकरण एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर असलेल्या समीर वानखेडे यांना चांगलंच भोवलं असल्याची चर्चा रंगली आहे. आता कोपरी पोलिस ठाण्यात (Kopari Police Station) समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानं त्यांच्यावर नेमकी काय कारवाई होते, हा पाहणं महत्त्वाचं आहे.

गुन्हा दाखल होण्यामागची कारणं

समीर वानखेडे यांच्यावर फक्त कमी वयात बारचा परवाना घेण्याबाबत आरोप करण्यात आला आहे, अशातला भाग नाही. तर त्यांच्यावर खोटारडेपणा करणे, तत्थ्यासोबत छेडछाड करणे तसंच चुकीचा माहिती देणे, असेही आरोप करण्यात आले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोपरी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला आहे.

कुठेय समीर वानखेडे यांचा बार?

एनसीबीचे माजी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांचा नवी मुंबईत बार आहे. या बारचं नाव सद्गुरु हॉटेल एन्ड बार असं आहे. या सद्गुरु हॉटेल आणि बारचा परवाना काही दिवसांपूर्वीच रद्द करण्यात आला होता. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी हा परवाना रद्द करण्याची कारवाई केली होती. परवाना काढण्यासाठी समीर वानखेडे यांनी दाखवलेली कागदपत्र बनावट असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं होतं. यानंतर ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी या बारविरोधात कारवाई करत बारचं लायसन्स रद्द केलं होतं. वयाच्या 17 व्या वर्षी आपल्या नावावर बार परवाना घेतल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून या आधीच समीर वानखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बाजवण्यात आली होती. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.

आर्यन खान आणि क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणानंतर वेगवेगळे आरोप समीर वानखेडे यांच्यावर करण्यात आले होते. सध्या एनसीबीकडून समीर वानखेडे यांचीदेखील चौकशी करण्यात आली होती. अशातच आता कोपरी पोलिस ठाण्यात वानखेडेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानं समीर यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

पाहा प्रतिनिधी गणेश थोरात यांनी ठाण्यातून याबाबत घेतलेला आढावा –

संबंधित बातम्या :

संतापजनक! 2 सख्ख्या बहिणींसह अन्य एकीचे लैंगिक शोषण, आरोपीला पोलीस कोठडी

गुजराती गायिकेवर नोटांची उधळण, विरारमधील धार्मिक कार्यक्रमात प्रकार

माय तू वैरीण निघालीस.. प्रियकराच्या मदतीनं आईनंच केला मुलाचा खून, औरंगाबादमधील वैजापूरची घटना

छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.