CCTV : सावधान! सकाळी दूध घेण्यासाठी घराचं दार उघडं ठेवताय? मग ही बातमी वाचाच
मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी! पहाटेच्या वेळी दूध घेण्यासाठी घराचं दार उघडं ठेवत असाल तर वेळीच सावध व्हा, कारण...
ब्रिजभान जैसवार, TV9 मराठी, मुंबई : मुंबईकरांसाठी (Mumbai) महत्त्वाची बातमी आहे. मुंबईत सकाळच्या वेळी अनेक जण घराचं दार उघडं ठेवतात आणि पुन्हा झोपी जातात किंवा मग आपल्या कामात व्यस्त होतात. पण मुंबईत चोरांची एक टोळी सक्रिय झाली असून या टोळीने अनेक घरांत चोरी केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. मुख्य म्हणजे सकाळच्या वेळी या घटना होत आहेत. घरातील मौल्यवान सामान, पैसे, मोबाईल यांच्या चोर (Mumbai Crime News) पहाटेच्या वेळी होण्याच्या घटना वाढल्यात. आता तर या प्रकरणाचं एक सीसीटीव्ही फुटेजही (CCTV) समोर आलं आहे. त्यामुळे मुंबईकरांना पोलिसांनी महत्त्वाचं आवाहन केलंय.
मुंबई पोलीस सध्या चोरी करणाऱ्या एका टोळीच्या मागावर आहेत. चोरांची एक टोळी पहाटेच्या वेळी लोकांच्या घरात गुपचूप शिरून चोरी करत असल्याचं समोर आलं आलंय. या टोळीमध्ये 2 महिला आणि 2 लहान मुलांचा समावेश आहे.
पाहा लाईव्ह घडामोडी :
समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये 9 ऑक्टोबर रोजी सकाळी साडे वाजण्याच्या सुमारास एका इमारतीत चोरीची घटना घडलीय. यात चार जण दिसूल आलेत. त्यात एक लहान मुलाचाही समावेश आहे.
दुसऱ्या माळ्यावर एका फ्लॅटचा दरवाजा उघडून काही जण चोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसलंय. तर एक महिला घराच्या बाहेर पहारा देताना दिसून आलीय. काही वेळानंतर सगळेच गुपचूप चोरी करुन पळून जाताना दिसून आलेत.
चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद :
मुंबईकरांनो सावधान! दूध घेण्यासाठी सकाळी दरवाजा उघडा ठेवून झोपी जात असाल, तर तुमच्या घरात चोरांची ही टोळी कधीही हात साफ करुन जाऊ शकते. सतर्क राहा. pic.twitter.com/m2nbB5ghqZ
— Siddhesh Sawant (@ssidsawant) October 20, 2022
साधरणतः पहाटेच्या वेळी लोक दूध घेण्यासाठी दार उघडं ठेवून झोपतात किंवा आपल्या कामात गुंतून जातात. हीच संधी साधून चोरट्यांची टोळी काही मिनिटांत घरात घुसते. मोबाईल, पैसे, दागिने आणि इतर मौल्यवान वस्तूंवर डल्ला मारते आणि धूम ठोकते.
गेल्या काही आठवड्यांपासून ही टोळी मुंबईत सक्रिय आहे. महिन्याभरात चोरीया अशा अनेक घटनांप्रकरणी मुंबईथ गुन्हे दाखल झालेले आहेत. या टोळीतील एका सदस्याला अटकही करण्यात आली आहे. तर इतरांचा शोध सुरु आहे.
चोरीच्या या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांकडून मुंबईकरांना काळजी घेण्याचं आवाहन केलं जातंय. सकाळच्या वेळी शक्यतो दरवाजा उघडा ठेवू नये. किंवा ठेवल्यास सतर्क राहून खबरदारी बाळगावी, असंही आवाहन केलं जातंय.