Mumbai Crime : लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार, लाखो रुपयेही उकळले !

आधी मैत्री केला, मग प्रेमाच्या जाळ्यात ओढले. लग्नाचे आमिष दाखवून दोन वर्ष नको ते केले. पीडितेने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

Mumbai Crime : लग्नाचे आमिष दाखवत महिलेवर अत्याचार, लाखो रुपयेही उकळले !
लग्नाचे आमिष दाखत महिलेवर अत्याचार
Follow us
| Updated on: Aug 03, 2023 | 11:54 AM

मुंबई / 3 ऑगस्ट 2023 : लग्नाचे आमिष दाखवत एका 31 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मुलुंडमध्ये उघडकीस आली आहे. तसेच 15.75 लाख रुपयेही आरोपीने महिलेकडून उकळले. याप्रकरणी महिलेने मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मुलंड पोलिसांनी महिलेच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला आहे. मात्र आरोपी फरार झाला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथक तयार केले असून, विविध ठिकाणी छापेमारी सुरु आहे. गौरव जनार्दन धेंडे असे आरोपीचे नाव असून, त्याच्यावर बलात्कार आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लग्नाचे आमिष दाखवत दोन वर्षे अत्याचार

पीडिता अंधेरी रहिवासी आहे. मुलुंड येथे राहणाऱ्या गौरव धेंडे याच्याशी तिची 2021 मध्ये ओळख झाली होती. ओळखीनंतर दोन महिन्यांनीच गौरवने पीडितेला लग्नाची मागणी घातली. यानंतर लग्नाचे आमिष दाखवत तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. दोन वर्ष लग्नाचे आमिष दाखवत तो तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करत होता. यादरम्यान, त्याने तिच्याकडून पैशांची गरज असल्याचे सांगत 15.75 लाख रुपये उकळले.

पोलिसांकडून फरार आरोपीचा शोध सुरु

आरोपी दोन वर्ष झाली तरी लग्न करण्याचे नावच घेत नव्हता. सतत टाळाटाळ करत होता. तसेच घेतलेले पैसेही परत करत नव्हता. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे पीडितेच्या लक्षात आले. यानंतर तिने मुलुंड पोलीस ठाण्यात धाव घेत पोलिसांकडे तक्रार दाखल केली. पोलिसांनी धेंडे विरोधात गुन्हा दाखल करत त्याचा शोध सुरु केला आहे.

हे सुद्धा वाचा

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.