AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bombay High Court : बलात्कारामुळे जन्मलेल्या मुलालाही भरपाई, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

उच्च न्यायालयाने या प्रकरणात भरपाईचा महत्त्वपूर्ण निकाल देताना आरोपीला काही प्रमाणात दिलासा दिला आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीची जन्मठेपेची शिक्षा 10 वर्षांपर्यंत कमी करण्याचा निर्णय न्यायालयाने यावेळी दिला. तसेच बलात्काराच्या गुन्ह्यातील दोषीने पीडितेच्या मुलाला 2 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले.

Bombay High Court : बलात्कारामुळे जन्मलेल्या मुलालाही भरपाई, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय
'स्किन टू स्किन टच'चा निकाल देणाऱ्या न्यायमूर्तींचा राजीनामा मंजूर
Follow us
| Updated on: Feb 27, 2022 | 9:45 PM

मुंबई : अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्कारा (Rape)च्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालया (Mumbai High Court)ने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. बलात्काराच्या गुन्ह्यात पिडित मुलीबरोबरच बलात्कारामुळे जन्माला आलेले मुलदेखील पिडित म्हणून ग्राह्य धरले पाहिजे. त्यानुसार पिडीत अल्पवयीन मुलीप्रमाणेच त्या बाळालाही भरपाई मिळाली पाहिजे, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. याचवेळी पिडीत बाळाला भरपाई देण्याचा स्पष्ट आदेश न्यायालयाने दिला आहे. राज्यातच घडलेल्या बलात्काराच्या एका घटनेत मुंबई उच्च न्यायालयाने हा मोठा निर्णय दिला आहे. (Compensation for a child born of rape, Big decision of Mumbai High Court)

बलात्कारपिडीत मुलीच्या बाळाला 2 लाखांची भरपाई देण्याचा आदेश

उच्च न्यायालयाने या प्रकरणात भरपाईचा महत्त्वपूर्ण निकाल देताना आरोपीला काही प्रमाणात दिलासा दिला आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या आरोपीची जन्मठेपेची शिक्षा 10 वर्षांपर्यंत कमी करण्याचा निर्णय न्यायालयाने यावेळी दिला. तसेच बलात्काराच्या गुन्ह्यातील दोषीने पीडितेच्या मुलाला 2 लाख रुपये भरपाई देण्याचे आदेश दिले. उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती साधना जाधव आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठाने हा नुकसानभरपाईचा आदेश दिला. या प्रकरणात 33 वर्षांच्या तरुणाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली होती.

प्रसुतीनंतर पिडीतेचा मृत्यू झाल्याने बाळाच्या पालनपोषणाचा प्रश्न

नेटवर्क 18 च्या बातमीनुसार, प्रसूतीनंतर बलात्कार पीडितेचा मृत्यू झाला. त्यानंतर दोषी तरुण तसेच पीडित मुलीचे कुटुंबिय या दोन्ही कुटुंबांनी मुलाला सोडून दिले. त्यामुळे बाळाच्या पालनपोषणाचा प्रश्न निर्माण झाला. याबाबतची माहिती न्यायालयाला देण्यात आली. सध्या पिडीतेच्या बाळाचे पालनपोषण अनाथाश्रमात केले जात आहे. ही बाब लक्षात आल्यानंतर उच्च न्यायालयाने पिडीत मुलीच्या बाळाला भरपाई देण्याचे आदेश दिले. खार येथील रहिवासी असलेल्या आरोपी रमेश वावेकर याने मुलाच्या पालनपोषणासाठी दोन लाख रुपये देण्याचे निर्देश दिले. कायदा एखाद्या निष्पाप मुलाला बेवारस स्थितीत सोडू शकत नाही. त्यामुळे त्या मुलाला दोषी तरुणाच्या (रेप कन्व्हिक्टेड) ​​वतीने 2 लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात यावी, असे स्पष्ट निर्देश उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने यावेळी दिले.

आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

आरोपी रमेशवर 2015 मध्ये सांताक्रूझ पोलिस स्टेशनमध्ये POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यावेळी बलात्कार पीडित अल्पवयीन मुलगी 8 महिन्यांची गर्भवती होती. तिने 8 ऑक्टोबर 2015 रोजी एका मुलाला जन्म दिला. याप्रकरणी शनिवारी मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला. बलात्कारामुळे जन्माला आलेले मूलही गुन्ह्यात पिडीत आहे. त्यामुळे त्यालाही भरपाई मिळावी, असे न्यायालयाने निकालपत्रात म्हटले आहे. (Compensation for a child born of rape, Big decision of Mumbai High Court)

इतर बातम्या

Solapur Crime : शस्त्राचा धाक दाखवून सिद्धेश्वर एक्स्प्रेसमधील प्रवाशाला लुटले, अडीच लाखाचा ऐवज लुटला

Wardha Crime : दारूबंदी असलेल्या जिल्ह्यात झिंगाट पार्टी, आयोजकासह फार्म मालकाला अटक

532 भारतीय नागरिक मायदेशी परतले
532 भारतीय नागरिक मायदेशी परतले.
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर
नवा व्हिडीओ, नवा प्रश्न... पहलगाममधील हल्ल्याचा आणखी एक व्हिडीओ समोर.
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू
पाकिस्तान हादरला... पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, सात जणांचा मृत्यू.
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर...
पाक क्रिकेटर आफ्रीदी ‘पहलगाम’वर बोलताना भुंकला, ओवैसी म्हणाले हा तर....
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर
सॅल्यूट...बघा भारतीय सैन्याची ताकद, त्रिशक्ती कॉर्प्सकडून व्हिडीओ शेअर.
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?
कचाट्यात सापडणार तोच निसटले, ते दहशतवादी 4 वेळा वाचले; नेमकं काय घडलं?.
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं
ट्रकनं कट मारला अन् एसटी थेट खड्ड्यात, चालकानं सांगितलं नेमकं काय घडलं.
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे केली मोठी मागणी.
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी
तहव्वुर राणाच्या रिमांडमध्ये 12 दिवसांची वाढ करण्याची मागणी.
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते....
भारताशी दगफटका...चीननंतर तुर्की पाकिस्तानच्या मदतीला, सढळ हस्ते.....