दिल्ली एसआयटीचा मुंबई सत्र न्यायालयात अर्ज, क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी वेळ मागितला !

दिल्ली एसआयटीने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून या प्रकरणात आणखी काही वेळ आरोपपत्र दाखल करण्याकरीता आवश्यक आहे. म्हणून वेळ वाढवून देण्यात यावा अशी मागणी मुंबई सत्र न्यायालयात आज करण्यात आली आहे. या प्रकरणात 20 आरोपींना अटक करण्यात आली असून आर्यन खान सोबतचे 18 जण सध्या जामीन अर्जावर बाहेर आहेत.

दिल्ली एसआयटीचा मुंबई सत्र न्यायालयात अर्ज, क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आरोपपत्र दाखल करण्यासाठी वेळ मागितला !
कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणी आर्यन खानला क्लीन चीटImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Mar 28, 2022 | 11:42 PM

मुंबई : एसआयटी मुंबई एनसीबी कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज (Cruise Drugs) प्रकरणाची चौकशी दिल्ली एनसीबीकडे सोपवण्यात आली होती. या प्रकरणात तपास करून 2 एप्रिल 2022 रोजी आरोपपत्र दाखल करणे बंधनकारक होते. मात्र एनसीबीच्या एसआयटीतर्फे आज मुंबई सत्र न्यायालया (Mumbai Session Court)त आरोपपत्र दाखल करण्याकरीता आणखी 90 दिवसाचा वाढीव वेळ देण्यात यावा अशा आशयाचा विनंती अर्ज आज मुंबई सत्र न्यायालयात केला आहे. बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला या प्रकरणात अटक केल्यानंतर तत्कालीन एनसीबी झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आले होते. नंतर या प्रकरणाचा तपास एनसीबी दिल्ली एसआयटीला देण्यात आला होता. (Delhi SIT seeks time to file chargesheet in cruise drugs case)

दिल्ली एसआयटीने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून या प्रकरणात आणखी काही वेळ आरोपपत्र दाखल करण्याकरीता आवश्यक आहे. म्हणून वेळ वाढवून देण्यात यावा अशी मागणी मुंबई सत्र न्यायालयात आज करण्यात आली आहे. या प्रकरणात 20 आरोपींना अटक करण्यात आली असून आर्यन खान सोबतचे 18 जण सध्या जामीन अर्जावर बाहेर आहेत.

एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्वात तपास सुरू

या प्रकरणात एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्वात तपास सुरू आहे. मागील महिन्यात पुन्हा या प्रकरणाचे माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यासह काही अधिकाऱ्यांचा जवाब नोंदवण्यात आला होता. तसेच या प्रकरणातील इतर आरोपींचे जबाबही एसआयटी पथकाने नोंदवला आहे. या प्रकरणात आर्यन खानला सोडवण्यासाठी पैसे मागितल्याचे आरोप करणारे साक्षीदार यांचा देखील एसआयटीने जबाब नोंदवला.

कार्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरणात कारवाईतील साक्षीदार प्रभाकर साईल, मनिष भानुशाली आणि अन्य साक्षीदारांनी केलेल्या आरोपांची चौकशीही करण्यात आली आहे. साक्षीदार प्रभाकर साईलचा जवाब नोंदविण्यात आला आहे. मात्र या प्रकरणाचे मुख्य साक्षीदार असलेले मनिष भानुशाली यांचा अद्याप जेलमध्ये असल्याने एनसीबी एसआयटीला जवाब नोंदवता आला नाही. प्रभाकर साईल यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंसह नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या अधिकाऱ्यांवर खंडणी उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला होता. बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला सोडण्यासाठी खंडणी मागितल्याचा आरोप प्रभाकर साईलतर्फे करण्यात आला होता. (Delhi SIT seeks time to file chargesheet in cruise drugs case)

इतर बातम्या

डोंबिवलीमध्ये एटीएम फोडणारा उच्चशिक्षित चोरटा गजाआड, ड्रिल मशिनच्या आवाजामुळे अडकला पोलिसांच्या जाळ्यात

Beed Firing : बीडमध्ये हळदी समारंभात नवरदेवाचा मित्रांसह धिंगाणा; उत्साही नवरदेवाचा हवेत गोळीबार

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.