Mumbai Crime : गोरेगावमध्ये मालकाच्या घरात लाखोंची चोरी करणाऱ्या नोकराला दिंडोशी पोलिसांकडून अटक

मुंबईतील दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे पीडित कुटुंब 9 जून रोजी बनारस येथील त्यांच्या गावी गेले होते. त्यानंतर 16 जून रोजी गावावरून मुंबईत आले असता घराचा दरवाजा तुटलेला होता. घराच्या लॉकरमधून रोख रकमेसह लाखोंचे सोन्याचे दागिने गायब होते. त्यांनी तात्काळ दिंडोशी पोलीस ठाणे गाठत चोरीची तक्रार दाखल केली.

Mumbai Crime : गोरेगावमध्ये मालकाच्या घरात लाखोंची चोरी करणाऱ्या नोकराला दिंडोशी पोलिसांकडून अटक
गोरेगावमध्ये मालकाच्या घरात लाखोंची चोरी करणाऱ्या नोकराला दिंडोशी पोलिसांकडून अटकImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 19, 2022 | 5:35 PM

मुंबई : बंद असलेल्या बंगल्यात लाखो रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरुन पोबारा करणाऱ्या चोरट्याच्या दिंडोशी पोलीसांनी मुसक्या आवळल्या आहेत. हा चोर दुसरा तिसरा कुणी नसून घरातील जुना नोकर (Servant) आहे. चोरी करुन हा चोरटा इंदूर येथे पसार झाला होता. पोलिसांनी तेथून त्याची गठडी वळली आहे. आरोपीला मालकाने कामावरुन काढून टाकले होते. मालक गावी जाणार असल्याची माहिती असल्याने नोकराने संधी साधली आणि चोरी (Theft) केली. कर्ज फेडण्यासाठी त्याने हा गुन्हा केल्याचे पोलील चौकशीत सांगितले. सध्या आरोपीला दिंडोशी पोलिसांनी अटक (Arrest) केली असून, पुढील कारवाई पोलीस करीत आहेत.

कर्ज फेडण्यासाठी नोकरानेच केली चोरी

मुंबईतील दिंडोशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे पीडित कुटुंब 9 जून रोजी बनारस येथील त्यांच्या गावी गेले होते. त्यानंतर 16 जून रोजी गावावरून मुंबईत आले असता घराचा दरवाजा तुटलेला होता. घराच्या लॉकरमधून रोख रकमेसह लाखोंचे सोन्याचे दागिने गायब होते. त्यांनी तात्काळ दिंडोशी पोलीस ठाणे गाठत चोरीची तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर दिंडोशी पोलिसांनी तपास सुरु केला असता पीडित कुटुंबाने त्यांच्या नोकराला कामावरुन काढल्याचे पोलिसांना कळले. पोलिसांनी त्या दिशेने तपास केला असता नोकर फरार असल्याची आणि इंदूर येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार इंदूर येथून अटक करण्यात आलेल्या आरोपीची दिंडोशी पोलिसांनी चौकशी केली. आरोपीने आपल्या बहिणीच्या लग्नासाठी दोन लाख रुपये कर्ज घेतले होते. ते कर्ज फेडण्यासाठी आरोपीने चोरीचा कट रचला. त्याला मालक गावी जाण्याची पूर्व माहिती होती. त्यामुळे त्याने ही संधी साधून चोरी केली. सध्या दिंडोशी पोलिसांनी चोरीच्या सोन्या-चांदीच्या आणि हिऱ्याच्या दागिन्यांसह आरोपींना अटक केली आहे. (Dindoshi police arrest servant for stealing from owners house in Goregaon)

हे सुद्धा वाचा

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.