Girish Malik | दिग्दर्शक गिरीश मलिकांच्या मुलाच्या मृत्यूचं गूढ उकललं, आत्महत्येचं कारणही स्पष्ट
गिरीश मलिक यांचा मुलगा मनन शुक्रवारी दुपारी होळी खेळून घरी परतला. त्यानंतर मुंबईतील ओबेरॉय स्प्रिंग्समध्ये असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन त्याने खाली उडी मारली.
मुंबई : लोकप्रिय दिग्दर्शक गिरीश मलिक (Girish Malik) यांच्या मुलाने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे. होळीच्या दिवशी (18 मार्च) गिरीश मलिक यांनी आपला 17 वर्षांचा मुलगा गमावल्याची धक्कादायक बातमी समोर आली होती. गिरीश यांचा मुलगा मनन मुंबईतील राहत्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन पडला होता. त्याला जवळच्या हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र मनन मलिकने आत्महत्या (Suicide) केल्याची बातमी ताज्या मीडिया रिपोर्ट्समधून समोर आली आहे.
नेमकं काय घडलं?
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, गिरीश मलिक यांचा मुलगा मनन शुक्रवारी दुपारी होळी खेळून घरी परतला. त्यानंतर मुंबईतील ओबेरॉय स्प्रिंग्समध्ये असलेल्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरुन त्याने खाली उडी मारली. त्याला तात्काळ कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात नेण्यात आले, पण त्याचे प्राण वाचू शकले नाहीत.
मद्यपान थांबवण्यास सांगितल्याचा राग
मननला वडील गिरीश मलिक यांनी मद्यपान बंद करण्यास सांगितल्याने त्याने जीव दिल्याचे सांगण्यात येत आहे. हे आत्महत्येचे प्रकरण असल्याच्या वृत्ताला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. 20 मार्च रोजी शवविच्छेदन करण्यात आले असून त्याच्या पार्थिवावर दिल्लीत अंत्यसंस्कार केले जाण्याची शक्यता आहे.
आई-वडील जवळ नसताना खिडकीतून उडी
मनन होळी खेळून घरी आला तेव्हा दारुच्या नशेत होता. घरीही तो मद्यपान करत बसला होता. गिरीश मलिक यांनी त्याला मद्यपान थांबवण्यास सांगितलं, तेव्हा मनन संतापला आणि त्याने खिडकीतून उडी मारली. मननने उडी मारली तेव्हा त्याचे वडील त्यांया खोलीत गेले होते, तर आईही जवळपास नव्हती, अशी माहिती आंबोली पोलीस स्थानकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडोपंत बनसोडे यांनी दिली.
संबंधित बातम्या :
पतीच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेची विहिरीमध्ये उडी घेऊन आत्महत्या
सोलापुरात सासरच्या त्रासाला कंटाळून नवविवाहितेने उचलेले टोकाचे पाऊल
वृद्ध नराधमाकडून आधी अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, मग उचलले हे पाऊल, वाचा सविस्तर