मोठी कारवाई! मुंबई विमानतळावरुन तब्बल 80 कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त, लपवले कुठे होते?
16 किलो ड्रग्जसह एका अटक, अटक करण्यात आलेली व्यक्ती केरळमधील असल्याची माहिती समोर
ब्रिजभान जैस्वार, TV9 मराठी, मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Mumbai International Airport) मोठी कारवाई डीआरआयने (DRI) केली आहे. एका इसमाला तब्बल 80 कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या ड्रग्जसह अटक (Drug Peddler Arrest) करण्यात आली. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीकडे 16 किलो हेरॉईन सापडलंय. हे हेरॉईन उच्च दर्जाचं असल्याची माहिती समोर आलीय. बुधवारी मुंबई विमानतळावर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, जिथे ड्रग्ज सापडलेत, ती लपवलेली जागा पाहून तपास अधिकारीही चक्रावून गेलेत.
ड्रग्जप्रकरणी ज्या आरोपीला अटक करण्यात आली आहे, तो मूळचा केरळमधील असल्याची माहिती समोर आलीय. बिनू जॉन असं आरोपीचं नाव आहे. सध्या आरोपीची कसून चौकशी सुरु आहे.
डीआरआयला एक व्यक्ती 16 किलो हेरॉईन घेऊन मुंबईत येत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या मदतीने तपास यंत्रणा कामाला लागली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे एका संशयित व्यक्तीला ताब्यात घेत तपास करण्यात आला. या तपासामध्ये ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीच्या बॅगमध्ये ड्रग्ज लपवण्यात आले होते. पण कुणालाही कळू नये यासाठी या बॅगमध्ये खास व्यवस्था करण्यात आलेली होती.
अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची ट्रॉली बॅग तपासण्यात आली. या बॅगेत असलेल्या एका फेक कॅविटीमध्ये ड्रग्ज लपवण्यात आले असल्याचं तपासातून समोर आलंय. त्यानंतर डीआरआयने या व्यक्तीला अटक केली. तसंच त्याच्याकडे आढळून आलेलं ड्रग्जही जप्त केलं.
Maharashtra | Directorate of Revenue Intelligence (DRI), Mumbai arrested a person from Kerala at the airport after seizing 16 kg of high-quality heroin worth over Rs 80 crores, hidden in a fake cavity inside the trolley bag. Case filed under NDPS Act; further probe underway: DRI pic.twitter.com/85ERrXRctz
— ANI (@ANI) October 5, 2022
सापडेलं ड्रग्ज हेरॉईन असल्याचं तपासातून उघड झालं. या ड्रग्जचं वजन केलं असता त्याचं मूल्य 16 किलो असल्याचं समोर आलं. इतकंच नव्हे तर या ड्रग्जची किंमत 80 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचीही माहिती डीआरआयने दिली आहे. याप्रकरणी आता एनडीपीएस कायद्याखाली केरळमधील या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची सध्या कसून चौकशी केली जातेय. या व्यक्तीला एका विदेशी नागरिकाने एक हजार अमेरिकन डॉलर दिले होते. ड्रग्ज मुंबईत घेऊन येण्यासाठी कमिशन म्हणून ही रक्कम आरोपीला देण्यात आली होती, अशी माहिती चौकशीतून उघडकीस आलीय.
ज्या व्यक्तीने ही रक्कम दिली होती तिचं नावदेखील अटक करण्यात आलेल्या व्यक्तीने सांगितल्याचं कळतंय. त्याअनुषंगाने पुढील तपास केला जातो आहे. दरम्यान, अटक करण्यात आलेली व्यक्ती याआधीही ड्रग्जविरोधी कारवाईत पकडली गेली होती का? याचाही तपास केला जातोय.