मुंबई पोलिसांकडून ‘मुंबई टू पुणे’ कनेक्शन उद्धवस्त, धडाकेबाज कारवाई करत सात जणांना ठोकल्या बेड्या

मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला एका महिलेच्या हालचालींवर संशय आला. त्यांनी तिच्यावर पाळत ठेवली अन् मग पुढे पोलिसांच्या हाती रॅकेटच लागलं.

मुंबई पोलिसांकडून 'मुंबई टू पुणे' कनेक्शन उद्धवस्त, धडाकेबाज कारवाई करत सात जणांना ठोकल्या बेड्या
मुंबई अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून ड्रग रॅकेटचा पर्दाफाश
Follow us
| Updated on: Jul 13, 2023 | 4:57 PM

मुंबई : अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणात मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी सेलने धडाकेबाज कामगिरी करीत सात जणांना अटक केली आहे. ‘मुंबई टू पुणे’ असे कनेक्शन असलेल्या अंमली पदार्थांच्या तस्करीचे नेटवर्क पोलिसांनी उद्धवस्त केले. मुंबईतील एक महिला वारंवार पुणे भेटीवर येत असल्याची गुप्त माहिती पोलिसांच्या पथकाला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून संबंधित महिलेला मंगळवारी रात्री दादर येथून ताब्यात घेतले. त्यानंतर दक्षिण मुंबईतील केम्प्स कॉर्नर, मालाड, पुणे आणि विरार येथे छापेमारी करून आणखी पाच जणांना अटक करण्यात आली. ही कारवाई करणाऱ्या पोलीस पथकाचे वरिष्ठ पातळीवरून कौतुक केले जात आहे.

पुण्यात जायची आणि केवळ 20 मिनिटे थांबायची!

दक्षिण मुंबईतील रहिवाशी असलेल्या आरोपी महिलेचे वारंवार पुण्यात येणे-जाणे सुरु होते. तिने अनेकदा पुण्याची ट्रिप केली होती. विशेष म्हणजे, ती ज्यावेळी पुण्यात जायची, त्यावेळी तिथे ती फक्त 20 मिनिटे थांबायची, अशी महिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे. पोलिसांना तिच्या गुप्त हालचालींबाबत माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी पुढील कारवाईची सूत्रे हलवली होती. अखेर गुप्त कारवाईमध्ये ठोस धागेदोरे हाती लागले आणि मुंबईतून पुण्याला अंमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले.

सुकेरिनो फर्नांडिस असे दादर येथून अटक केलेल्या महिलेचे नाव असून, ती माजी शिक्षिका आहे. मालाड येथील अंजू पॉल या महिलेने तिला पुरवलेल्या दारूची वाहक म्हणून काम करीत होती, असा पोलिसांचा आरोप आहे. ती दक्षिण मुंबईतील केम्प्स कॉर्नर येथील रहिवाशी आहे. तिने रात्री उशिराच्या सुमारास पुण्याच्या ट्रिप केल्या होत्या. प्रत्येक वेळी ती फक्त 20 मिनिटे तिथे राहत होती. त्यामुळे तिच्यावरील संशय बळावला, अशी प्रतिक्रिया अँटी नार्कोटिक्स सेलचे डीसीपी प्रकाश जाधव यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून महिलेला अटक

मंगळवारी रात्री ती पुण्याला जाण्यासाठी कॅब घेणार असल्याची गुप्त माहिती घाटकोपर येथील अंमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे पोलिसांनी अधिक तपास केला आणि मोठे रॅकेट उध्वस्त करण्यात यश मिळवले. पोलिसांनी विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये दोन नायजेरियन आणि दोन महिलांसह एकूण पाच जणांना अटक केली आहे. पुण्यातील दोन कथित अंमली पदार्थ तस्करांनाही अटक करण्यात आली आहे. या कारवाईत 16,14,000 रुपये किमतीचे 58.20 ग्रॅम मेफेड्रोन आणि 15 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.