AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Drugs Siezed : मुंबई विमानतळावर ड्रग तस्करीच्या टोळीचा पर्दाफाश; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केले सीमाशुल्कच्या कारवाईचे कौतुक

विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय कुरिअर टर्मिनलवर सीमाशुल्क विभागाने 22 ते 25 एप्रिलदरम्यान उत्तर अमेरिकेतून आलेली आणखी तीन पार्सल रोखली. त्यांची कसून तपासणी केली असता त्या पार्सलमधून 27.478 किलोग्रॅम वजनाचा उच्च दर्जाचा हायड्रोपोनिक्स गांजा जप्त करण्यात आला.

Drugs Siezed : मुंबई विमानतळावर ड्रग तस्करीच्या टोळीचा पर्दाफाश; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी केले सीमाशुल्कच्या कारवाईचे कौतुक
मुंबई विमानतळावर ड्रग तस्करीच्या टोळीचा पर्दाफाशImage Credit source: TV9
| Updated on: Apr 30, 2022 | 9:07 PM
Share

मुंबई : मुंबईच्या सीमाशुल्क विभागाने अमेरिकेतून ड्रग्जची तस्करी करणाऱ्या आणि मुंबईत सक्रिय असलेल्या ड्रग टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात पाश्चात्य देशातून ड्रग्जचा व्यापार करणाऱ्या तीन जणांना अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली. या कारवाईबद्दल केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी तपास पथकाचे कौतुक केले आहे. “ड्रगचा धोका टाळण्यासाठी सतर्क राहिलात! वेल डन”, असे ट्विट करीत केंद्रीय मंत्र्यांनी सीमाशुल्कच्या पथकाला भरभरून दाद दिली आहे. ड्रग तस्करी प्रकरणात अटक केलेल्या आरोपींचे वय चाळीशीच्या आसपास असल्याचे सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. ड्रग टोळीतील शेवटच्या आरोपीचा शोध घेतला जात आहे. (Drug smuggling gang busted at Mumbai international airport, three accused arrested)

अमेरिकेतून आलेल्या कुरिअर पॅकेजमध्ये अंमली पदार्थांची वाहतूक होत होती. याबाबतीत मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे इंटरनॅशनल कुरिअर टर्मिनलवर विमानतळ स्पेशल कार्गो आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी वॉच ठेवला होता. याचदरम्यान संशयास्पद कुरिअर पाकीट रोखण्यात आले. त्यात कॅलिफोर्नियामधून आणला गेलेला 910 ग्रॅम मारिजुआना एअर प्युरिफायरमध्ये लपवून ठेवलेला सापडला, अशी माहिती सीमाशुल्क विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

विविध घरगुती वस्तूंमध्ये लपवून ठेवलेला गांजा

विमानतळाच्या आंतरराष्ट्रीय कुरिअर टर्मिनलवर सीमाशुल्क विभागाने 22 ते 25 एप्रिलदरम्यान उत्तर अमेरिकेतून आलेली आणखी तीन पार्सल रोखली. त्यांची कसून तपासणी केली असता त्या पार्सलमधून 27.478 किलोग्रॅम वजनाचा उच्च दर्जाचा हायड्रोपोनिक्स गांजा जप्त करण्यात आला. हा गांजा विविध घरगुती वस्तूंमध्ये लपवून ठेवण्यात आला होता. उत्तर अमेरिकेतील उच्च-गुणवत्तेच्या या गांजाची स्थानिक बेकायदेशीर बाजारपेठांमध्ये प्रति ग्रॅम 3,000 रुपयांपेक्षा जास्त किंमत आहे. जप्त केलेल्या अंमली पदार्थांची स्थानिक अवैध बाजारपेठांमधील एकत्रित किंमत 8 कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते, असे सूत्रांनी सांगितले.

सूत्रधाराच्या घरात 20 किलो गांजा, 120 ग्रॅम चरस

सीमाशुल्क विभागाने ड्रग टोळीचा पर्दाफाश करण्यासाठी गुप्तपणे कारवाईची मोहीम सुरु केली होती. यादरम्यानच्या जप्तीचा तपशील गुप्त ठेवण्यात आला होता. सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी ऑटो-रिक्षा चालक आणि डिलिव्हरी पुरुषांच्या वेशात पाळत ठेवली होती. याचदरम्यान एकसारखे आकार आणि एकसारखे दिसणाऱ्या डमी कुरिअर पार्सलची झाडाझडती घेण्यात आली. ही प्रक्रिया पोलिसांच्या मदतीने हाती घेण्यात आली होती. यादरम्यान एका प्रकरणात असे आढळून आले की पार्सल स्वीकारणारी व्यक्ती ते पार्सल दुसऱ्या पत्त्यावर पाठवत होती. ज्याठिकाणी तेथील रहिवासी पॅकेज गोळा करण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीला कॉल करतील. तेथे पॅकेज घेण्यासाठी आलेला तिसरा व्यक्ती या कारवाईचा सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्या राहत्या घरी झडती घेतली असता आणखी 20 किलो गांजा, 120 ग्रॅम चरस आणि इतर काही अंमली पदार्थ आढळून आले आहेत. (Drug smuggling gang busted at Mumbai international airport, three accused arrested)

भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश.
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा.
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
BMC निवडणुकीसाठी मनसे अ‍ॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार.
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री
3 वर्गमित्र, 3 वेगळे पक्ष अन् प्रभाग एक... राजकारणापलीकडची मैत्री.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं..
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? युगेंद्र पवारांनी एका वाक्यात म्हटलं...
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?
मुंबईत शिंदेंची सेना खरंच स्वबळावर लढणार की 84 जागांसाठी दबाव?.
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!
माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर पण आमदारकीचा निर्णय अध्यक्षांकडे!.
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ
पुढचा राजीनामा शिंदे यांचा...उद्धव ठाकरे यांच्या सनसनाटी दाव्यानं खळबळ.
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंची युती रखडली, जागा वाटपामुळे तिढा कायम.