मुंबई : मुंबईत नववर्षाच्या पार्टीसाठी आणण्यात आलेला सुमारे 3 कोटी 18 लाख रुपयांचा ड्रग्सचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. 31 डिसेंबरच्या पार्टीसाठी हे ड्रग्स आणण्यात आलं होतं. याप्रकरणी तीन आफ्रिकन नागरिकांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी कक्षाने ही कारवाई केली आहे. क्राईम ब्रांचचे जॉईंट सिपी मिलिंद भारंबे आणि अंमली पदार्थ विभागाचे पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली.
अंमली पदार्थ विरोधी कक्षाच्या अधिकाऱ्यांना बिकेसी भागात एक आफ्रिकन व्यक्ती संशयास्पदरित्या वावरताना दिसला. त्याला ताब्यात घेऊन त्याची प्रथम चौकशी असता त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे 105 कोकेन तर 120 ग्राम मोफेड्रिन ड्रग्स सापडले. इबे माईक असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीची सखोल चौकशीत केली असता त्याने त्याच्या अन्य दोन साथीदारांची नावं सांगितली. हे ड्रग्स त्याला त्याच्या दोन आफ्रिकन साथीदारांनी विकल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
अटक आरोपीच्या माहितीनुसार पोलिसांनी मुंबईमध्ये प्रवेश करण्यासाठी महत्वाचा नाका असलेल्या वाशी नाका येथे धाव घेतली. त्या ठिकाणाहून पोलिसांनी आणखी दोन आफ्रिकन नागरिकांना तांब्यात घेतलं. ओडिफे आणि मंडे अशी त्यांची नावे आहेत. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडेही मोठा ड्रग्ज साठा सापडला. या तिघांकडे मिळून कोकेन 225 ग्रॅम, मेफेड्रीन 1500 ग्रॅम आणि एमडीएमए 235 ग्रॅम सापडलं आहे. या सर्व ड्रग्सची किंमत 3 कोटी 18 लाख रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. अंमली पदार्थ विरोधी विभागाची ही एक मोठी कारवाई आहे. (Drugs worth Rs 3 crore seized in Mumbai, action taken by anti-narcotics squad)
इतर बातम्या
50 रुपये चोरल्याच्या रागातून बापाची मुलाला बेदम मारहाण; पुढे जे झाले ते पाहून पोलीसही चक्रावले