AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नरेश गोयल यांचे कारनामे, या कारणामुळे बुडाली जेट एअरवेज

Naresh Goyal | जेट एअरवेज का बुडाली, त्यामागील एक एक सुरस कथा अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समोर आणल्या आहेत. सध्या नरेश गोयल हे न्यायालयीन कोठडीत आहे. तर ईडीने त्यांच्याविरुद्ध पुरवणी आरोपपत्र दाखल केले आहे. त्यात अनेक कारनामे समोर आणले आहे. जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल, त्यांची पत्नी आणि इतर जणांविरोधात याप्रकरणात ईडीने यापूर्वीच दोषारोपपत्र दाखल केले आहे.

नरेश गोयल यांचे कारनामे, या कारणामुळे बुडाली जेट एअरवेज
| Updated on: Nov 05, 2023 | 12:09 PM
Share

ब्रिजभान जैसवार, मुंबई | 5 नोव्हेंबर 2023 : जेट एअरवेज का बुडाली, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. आर्थिक गणितं जुळतं नसल्याने हा प्रकार घडल्याचे अनेकांना वाटत होते. पण अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जेट एअरवेज बुडण्यामागची कारणं शोधून काढली आहेत. त्याच्या सुरस कथा आता समोर येत आहे. जेट एअरवेजचे माजी संचालक नरेश गोयल यांच्याविरोधात ईडीने अगोदरच कारवाईचा फास आवळला आहे. गोयल सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांच्यासह पत्नी आणि इतर आरोपींविरोधात ईडीने यापूर्वीच दोषारोपपत्र दाखल केले आहे. आता पुरवणी दोषारोपपत्र मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष कोर्टात सादर करण्यात आले आहे. त्यात मॉस्किटो कॉइल फर्म ते हिरे निर्यातदार, असा नरेश गोयल यांनी जेटचा निधी कसा ‘वळवला’ याची माहिती दिली आहे.

इतक्या कोटींचा कथित घोटाळा

ई़डीने या आठवड्याच्या सुरुवातीला नरेश गोयल, त्यांची पत्नी अनिता, त्यांच्या कंपन्या आणि इतर संस्थांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल केले. त्यात हा कथित घोटाळा 6,000 कोटी रुपयांचा असल्याचे म्हटले आहे. जेट एअरवेज (इंडिया) लिमिटेड विरोधात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक अधिनियम (PMLA) 2002 मधील विविध कलमांन्वये ही कारवाई करण्यात आली.

असा वळवला पैसा

  • पगार व्यवस्थानासाठी मॉस्किटो कॉइल मॅन्युफॅक्चरिंग कंपनीकडून सल्ला घेतला
  • रेल्वे इन्फ्रा कंपनीकडून आर्थिक सल्लामसलत केली
  • हिऱ्याच्या निर्यातदाराला विमानाच्या स्पेअर पार्टसबाबत सल्ला घेण्यात आला
  • अशा सेवा घेत, त्याबदल्यात पैसा देण्यात आला. गोयल यांनी एअरलाईन्सचा पैसा असा वळता केला.
  • प्रवर्तकाशी संबंधित कंपन्यांना एजंट कमिशन म्हणून 1,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम दिली
  • यामुळे जेट एअरवेज बुडाल्याचा ठपका ईडीने गोयल यांच्यावर ठेवला

उजव्या हाताने, डाव्या हाताला गेला पैसा

गोयल यांनी जेट लाइट लिमिटेडला 4,057 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे JIL अनुदान कर्ज देऊन निधी पळवून नेल्याचा आरोप आहे परंतु त्यातील मोठा भाग तिकीट विक्रीसाठी समायोजित केला एजन्सीने असा दावा केला आहे की गोयल यांनी जनरल सेल्स एजंटना (GSA) “अतार्किक” आणि “फुगवलेले” कमिशन देऊन निधी पळविला. यापैकी जवळपास 50 टक्के निधी त्यांच्याच कंपन्यांनी कडे गेल्या त्यात जेआयएलचे काही व्यावसायिक आणि सल्लागारांशी देखील आर्थिक व्यवहार होते मात्र ज्यांच्याशी सेवा प्रदान केल्याचा कोणताही पुरावा नाही. नरेश गोयल सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यांचा मुक्काम सध्या आर्थर रोड तुरुंगात आहेत.

तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण
तेजस्वी घोसाळकरांनी भाजपात प्रवेश करण्याचं थेट सांगितलं कारण.
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद
मनपा निवडणुकांच्या तारखा आज जाहीर होणार? आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद.
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान
ही उद्धव ठाकरेंची मोठी चूक, ठाकरे बंधूंच्या युतीवर आठवलेंचं मोठं विधान.
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर
मुंबईला वाचवणारी महायुतीच धुरंधर... एकनाथ शिंदेंचा बाण उद्धव ठाकरेंवर.
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग
तयारीत राहा...राज्य निवडणूक आयोगाचे आदेश, निवडणुकांच्या तयारीला वेग.
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका
अ‍ॅनाकोंडा ते गांडुळाची औलाद...ठाकरेंची पुन्हा शाहांसह शिंदेंवर टीका.
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!
पालिका निवडणुकीपूर्वी तेजस्वी घोसाळकरंचा ठाकरे सेनेला जय महाराष्ट्र!.
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद
ओबीसी नेते मंगेश ससाणे यांच्या कारवर बीडमध्ये हल्ला, विधानसभेत पडसाद.
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
शालेय पोषण आहारात 1800 कोटीचा घोटाळा? ठाकरेगटाच्या आमदाराचा गंभीर आरोप.
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ
नागपूर अधिवेशनात अजित दादांच्या NCP ची संघाच्या बौद्धिकाकडे यंदाही पाठ.