ठाणे पोलिसांनी जप्त केल्या दहा बंदुकासोबत अकरा काडतुसे; 52 हजारांचा ऐवज हस्तगत
या प्रकरणात दयानंद सुदाम भडांगे उर्फ नवश्या आणि चंद्रदेव वसंतलाल सरोज या दोघाना अटक करण्यात आली आहे. यावेळी त्यांच्याकडून दहा बंदुका, अकरा काडतुसे व बंदुका बनवण्याची साधने असा एकूण 52 हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे.
ठाणे: ठाण्याचा कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गायमुख रेतीबंदर (Gaymukh Retibandar) परिसरात रायफल बनवून विक्री करणाऱ्या दोघा आरोपींना कासरवाडवली पोलिसांनी अटक केली. या घटनेबाबत रायफली (Rifle) विक्रीसाठी येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना (Mumbai Police) मिळल्यानंतर पोलिसांनी छापा टाकून आरोपींना (Criminal) अटक केली. या प्रकरणात दयानंद सुदाम भडांगे उर्फ नवश्या आणि चंद्रदेव वसंतलाल सरोज या दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी या आरोपींनी अटक केल्यानंतर त्यांच्याकडून दहा बंदुका, अकरा काडतुसे व बंदुका बनवण्याची साधने असा एकूण 52 हजारांचा ऐवज हस्तगत केला आहे.
रायफली विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर छापा टाकून अटक करण्यात आली. पोलिसांनी त्यांनी अटक केल्यानंतर त्यांच्या मोठ्या प्रमाणात रायफली बनवण्याच्या साधनसामुग्रीसह त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. रायफली बनवविण्याचे साहित्य त्यांच्याकडे सापडल्यामुळे या गुन्ह्यात आणखी काही आरोपी आहेत का याचा शोध पोलीस घेत आहेत. रायफल बनवणाऱ्या या दोघांकडून एकूण 52 हजारचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी काही पुरावे मिळतात का याचा शोध घेणे सुरु आहे.
कोणाला रायफली विक्री केल्या
कासरवाडवली पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांच्याकडून आणखी कोणाला रायफली विक्री केल्या आहेत? आरोपींना जिवंत काडतुसे कोणी दिली याबद्दल अधिक तपास सुरू असल्याचे पोलीस उपायुक्त विनयकुमार राठोड यांनी सांगितले. या प्रकरणाची दागेदोरे कुठपर्यंत पसरली आहेत. याचा शोध घेणेही सुरू आहे. अहमदनगर जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात गावठी कट्टे सापडले आहेत, गावठी कट्ट बाळगणाऱ्यांचे प्रमाण ग्रामीण भागातही असल्याने या प्रकरणाचा तपास पोलीस बारकाव्याने करत आहेत.
संबंधित बातम्या
CCTV | भरधाव रिक्षा अचानक रस्त्यात घसरली, सात वर्षांच्या चिमुकलीसह चौघं जखमी