‘कारवाई टाळायची असेल तर पैसे दे’, परमबीर सिंह यांच्यासह 28 जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह पाच पोलीस अधिकारी आणि एका कर्मचाऱ्यासह 28 जणांविरोधात खंडणी वसूल करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, अशा गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.

'कारवाई टाळायची असेल तर पैसे दे', परमबीर सिंह यांच्यासह 28 जणांवर खंडणीचा गुन्हा दाखल
Parambeer Singh
Follow us
| Updated on: Jul 31, 2021 | 7:39 AM

ठाणे : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह पाच पोलीस अधिकारी आणि एका कर्मचाऱ्यासह 28 जणांविरोधात खंडणी वसूल करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, जबरी चोरी यासारख्या 10 हून अधिक कलमांतर्गत ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 3 वर्षानंतर याची दखल ठाणे नगर पोलिसांनी घेतली आहे. (Extorsion case filed against 28 persons including Parambir Singh Thane Police)

पाच अधिकाऱ्यांसह 28 लोकांवर गुन्हे दाखल

पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये पोलीस उपायुक्त दिपक देवराज, सहाय्यक पोलीस आयुक्त एन. टी. कदम, खंडणी विरोधी पथकाचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मोरे, पोलीस कर्मचारी चौधरी सह अन्य लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाई टाळायची असेल तर पैसे दे, खंडणी मागितल्याचा आरोप

मोक्का अंतर्गत कारवाई टाळण्यासाठी सुमारे पाच कोटी रुपयांची खंडणी तक्रारदार आणि त्यांच्या साथिदारांकडून वसूल करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कुख्यात गुंड रवि पुजारी आणि प्रदीप शर्मा यांचे हितसंबंध असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

नेमकं प्रकरण काय?

परमबीर सिंह हे ठाणे पोलीस आयुक्त असताना 2018 मध्ये गुन्हे अन्वेषण शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने सट्टेबाजांचे रॅकेट उद्धवस्थ केले होते. पोलिसांनी याप्रकरणात काही बाॅलीवुड कलाकारांनाही ताब्यात घेतले होते. त्यानंतर पोलिसांनी मुंबईतील एक व्यावसायीक केतन तन्ना आणि सोनू जालान यांना अटक केली होती.

या अटकेनंतर आरोपींविरोधातील मोक्का कायद्याअंतर्गत होणारी कारवाई टाळणे तसेच जीवे मारण्याची धमकी देऊन पोलीस अधिकारी, कर्मचारी, गुंड रवि पुजारी, दलाल, पोलीस खबरी यांच्यासह 28 जणांनी सोनु जालान याच्याकडून 3 कोटी 45 लाख रुपये तर केतन तन्ना याच्याकडून 1 कोटी 25 लाख रुपयांची खंडणी उकळल्याचे तक्रारीत म्हटले आहे. या तक्रारीच्या आधारे ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच प्रदीप शर्मा यांचे गुंड रवि पुजारी याच्यासोबत हितसंबंध असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

(Extorsion case filed against 28 persons including Parambir Singh Thane Police)

हे ही वाचा :

मुंबई-ठाण्यात खंडणीचा गुन्हा, परमबीर सिंह यांच्या पाच निकटवर्तीय पोलीस अधिकाऱ्यांची बदली

परमबीर सिंग यांच्यापाठोपाठ आता वरिष्ठ पोलिसांवर खंडणीचा गुन्हा, कुणाकुणाची नावं?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.