फॉरेन एक्सचेंजच्या नावाखाली बनावट कॉल सेंटर; बांगुरनगर पोलिसांनी असा केला पर्दाफाश
तक्रारदाराने बांगूरनगर पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. व्यवस्थापक राजेश जयेश पिल्ले याला अटक करण्यात आली. त्याचे दोन साथीदार पळून गेले.
मुंबई : बांगूरनगर पोलिसांच्या पथकाने मुंबईतील मालाड पश्चिम बांगूरनगर पोलीस (Bangurnagar Police) ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या बेकायदेशीर कॉल सेंटरवर छापा टाकला. एका आरोपीला संगणक, 8 हार्डडिक्स, पेन ड्राईव्ह आणि 3 मोबाईलसह अटक केली आहे. हे बनावट कॉल सेंटर आदित्य स्टेट एव्हरसाइन नगर मालाड पश्चिम येथे CIELOX BUSINISS SOLUTIONS LLP या नावाने चालवले जात होते. येथे www. visionfxmarkets. कॉमवर नोंदणी केलेल्या भारतीय आणि इतर देशांतील लोकांशी हिंदी आणि इंग्रजी भाषेत इंटरनेट व्हिप कॉलद्वारे बोलून ते स्वत:ला परकीय शेअर चलन आणि कमोडिटी ट्रेडिंगमध्ये तज्ज्ञ म्हणवत असतं.
फसवणुकीचा गुन्हा दाखल
गुंतवणूकदारांना विश्वासात घेऊन आणि त्यांना किमान $200 गुंतवायला सांगायचे. ते 24 ते 48 तासात $200 जमा करतील असे सांगायचे. 48 तासांमध्ये $200 जमा न केल्यामुळे तक्रारदाराने बांगूरनगर पोलीस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.
दोन साथीदार पळून गेले
या प्रकरणाचा तपास करत असताना, बांगूरनगर पोलिसांनी आदित्य इस्टेट एव्हरसाइन नगर मालाड पश्चिमेकडील CIELOX BUSINISS SOLUTIONS LLP वर छापा टाकला. तिथं व्यवस्थापक राजेश जयेश पिल्ले याला अटक करण्यात आली. त्याचे दोन साथीदार पळून गेले.
सुमारे शंभर लोकांची फसवणूक
पोलिसांनी CIELOX BUSINISS SOLUTIONS LLP च्या कार्यालयातून संगणक, 8 हार्डडिस्क, पेन ड्राइव्ह आणि 3 मोबाईल जप्त केले. या गुंडांनी आतापर्यंत 200 डॉलर घेऊन 100 लोकांची 20 लाखांची फसवणूक केल्याचे पोलिसांना तपासात निष्पन्न झाले आहे. अशी माहिती बांगूरनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तावडे यांनी दिली.
परदेशी चलनाचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक केली जात होती. पण, दुप्पट पैसे मिळतात, असे आमिष असल्यानं लोकं तक्रार करण्यास घाबरत होते. एकाने हिंमत केली आणि या परदेशी चलनाच्या नावावर फसवणूक करणाऱ्यांचा पर्दाफाश झाला.