Chandiwal Commission : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सचिन वाझेच्या वकिलाकडून चांदिवाल आयोगासमोर उलटतपासणी
सचिन वाझे यांनी शुक्रवारी एक अर्ज करून जॉइंट सीपी मिलिंद भारंबे यांना साक्षीदार म्हणून बोलवावं, अस म्हटलं होतं. या अर्जाला संजीव पालांडे यांच्या वतीने त्यांचे वकील शेखर जगताप यांनी विरोध केला. तर परमबीर सिंग यांचे वकील अंकुर त्यागी यांनी सचिन वाझे यांच्या अर्जाला स्पोर्ट केला.
मुंबई : चांदीवाल आयोगात आज सचिन वाझे(Sachin Vaze) यांचे वकील योगेश नायडू(Yogesh Nayadu) यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख(Anil Deshmukh) यांची उलटतपासणी घेतली. आयोगात आता उलट तपासणीची प्रक्रिया संपली आहे. आता लिखित स्वरूपात ज्या साक्षीदारांना आपलं म्हणणं मांडायचं आहे ते मांडू शकतात. त्यानंतर आवश्यकता वाटल्यास युक्तिवाद होणार आहे. तर आज उलटतपासणीच्या वेळी सचिन वाझे यांच्या वकिलांनी अनिल देशमुख यांना अनेक प्रश्न विचारले. यावेळी हे सर्व परमबीर सिंग यांनी जाणून बुजून केलं आहे. मला त्यांचे परम सत्य आयोगा समोर मांडायचे आहे. त्यासाठी परवानगी द्यावी, असे देशमुख म्हणाले. याबाबत आयोगाने त्यांना अर्ज करायला सांगतलं आहे. तर सचिन वाझे यांनी शुक्रवारी एक अर्ज करून जॉइंट सीपी मिलिंद भारंबे यांना साक्षीदार म्हणून बोलवावं, अस म्हटलं होतं. या अर्जाला संजीव पालांडे यांच्या वतीने त्यांचे वकील शेखर जगताप यांनी विरोध केला. तर परमबीर सिंग यांचे वकील अंकुर त्यागी यांनी सचिन वाझे यांच्या अर्जाला स्पोर्ट केला. (Former Home Minister Anil Deshmukh cross-examined by Sachin Waze’s lawyer before Chandiwal Commission)
सचिन वाझेचा वकिल अॅड. योगेश नायडूने देशमुखांना विचारलेले प्रश्न जसेच्या तसे
योगेश नायडू : आपलं ट्वीटर काऊंट आहे का ?
अनिल देशमुख : हो मी ट्विर अकाउंट वापरतो. 26 ने 2020 रोजी रोजी मी ट्विट केलं होतं.
योगेश नायडू : अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणात dg आणि adg cid यांनी तपासासाठी नकार दिला होता का ?
अनिल देशमुख : cid च्या अधिकाऱ्यांनि मला सांगितलं की याचा आधीच तपास केला आहे. याचा पुन्हा तपास करण्याची गरज नाही, असं आम्हाला वाटतं, असं सांगितलं. पण त्यानंतर मला अनेक जण भेटले. त्यांनी मला सांगितलं की, याचा तपास बरोबर झालेला नाही. त्यामुळे त्याचा पुन्हा तपास व्हायला हवा. त्यामुळे मलाही अस वाटलं की याचा तपास झाला पाहिजे. म्हणून मी इतर वरिष्ठ अधिकाऱ्याकडे स्पेशल ig कडे तपास दिला. या प्रकरणात अर्णव गोस्वामी यांना अटकही झाली होती.
योगेश नायडू : अन्वय नाईक यांच्या प्रकरणाचा तपास झाला आहे, पुन्हा तपास करायची गरज नाही हे कोणत्या अधिकाऱ्याने संगितले ?
अनिल देशमुख : मला आठवत नाही.
गणेश नायडू : अन्वय नाईक आणि इतर प्रकरणाबाबत सर्व निर्णय घेण्याचा प्रक्रियेत आपण होता. अनेक फाईल होत्या. ऑफिस नोटिंग काही तुम्हाला काही आठवतंय का ?
अनिल देशमुख : आठवत नाही.
योगेश नायडू : मिलिंद भारंबे यांची जॉईंट सिपी म्हणून सप्टेंबर 2020 मध्ये नियुक्ती झाली होती का ?
अनिल देशमुख : आठवत नाही
योगेश नायडू : सचिन वाझे हे आपल्याला रिपोर्ट करत नाहीत, अशी कधी मिलिंद भारंबे यांनी सचिन वाझे यांच्या विरोधात तक्रार केली होती का ? याबाबत त्यांचा रिपोर्ट सादर करण्यापूर्वी त्यांनी कधी तक्रार केली होती का ?
अनिल देशमुख : हा रिपोर्ट मिलिंद भारंबे यांनी दिला. सचिन वाझे हे त्यांच्यावरील अधिकारी म्हणजेच acp, dcp, अॅड. cp या कोणालाच रिपोर्ट करत नव्हते. मला मिलिंद भारंबे यांनी कधी तक्रार केली नाही.
योगेश नायडू : फेस मास्क आणि अनव्य नाईक या केसमध्ये सचिन वाझे यांनी तुम्हाला टेक्निकल सहकार्य केले होते का ?
अनिल देशमुख : मी सचिन वाझे यांना ओळखत नाही.
योगेश नायडू : कुंदन शिंदे यांच्या आधी वैभव तुम्हाणे हा खाजगी सचिव म्हणून तुमच्याकडे काम करायचा का ?
अनिल देशमुख : तो सोशल मीडियाचं काम पहायचा.
योगेश नायडू : वैभव ताम्हाणे हा तुमच्यात आणि सचिन वाझे, अनव्य नाईक कुटुंब यांचा समनव्यक म्हणून काम करायचा का ?
अनिल देशमुख : मला आठवत नाही.
योगेश नायडू : परमबीर सिग यांनी 20 मार्च 2021 रोजी जे पत्र दिलं होतं. बाबत आपण आयोगा समोर जे प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. त्यात आपण चुकीची माहिती दिली आहे.
अनिल देशमुख : नाही बरोबर माहिती दिली आहे. खर तर मला परमबीर सिंगबाबत काही परम सत्य आयोगाला सांगायचं आहे.
योगेश नायडू : तुमच्या प्रतिज्ञापत्रात J ते I मध्ये आपण चुकीचं दिलं आहे. दिशाभूल करणारी माहिती दिली आहे आणि कोणताही पुरावा नसणारी माहिती दिली आहे.
अनिल देशमुख : नाही जे काही दिलं आहे हे सत्य आहे.
योगेश नायडू : फेक फॉलोवर केस, टीआरपी केस, अन्वय नाईक केस या प्रकरणात वैभव ताम्हणे तुमच्यासोबत काम करत होता का ?
अनिल देशमुख : हो, तो माझ्यासोबत काम करत होता. तो थोडा फार समन्वयाचं काम करत होता.
योगेश नायडू : आपल्या प्रतिज्ञापत्रात आपण म्हटलंय की विधानसभेत प्रश्न आला होता. डान्स बार, नार्कोटिक्स, जुगार आदीबाबत प्रश्न आला होता. यावेळी tru ट्रॅप ट्रक या बारबाबत प्रश्न आला होता का ? हा बार अंकित आनंद यांच्या मालकीचा आहे ?
अनिल देशमुख : 1 मार्च आणि 4 मार्चला प्रश्न आला होता. विधानसभेमध्ये प्रश्न होता. अख्या महाराष्ट्राबाबत प्रश्न होता. एकाबाबत नव्हता. एका आमदाराने हनी कोंबबाबत प्रश्न होता.
योगेश नायडू : आपण बार मालक अंकित आनंद यांना भेटला होता का ?
अनिल देशमुख : नाही
योगेश नायडू : तुमच्या मंत्री पदाच्या काळात अंकित आनंद याने सचिन वाझे यांना मेसेज पाठवला होता की, हुक्का पार्लर, पब आणि ऑर्केस्ट्रा बार यांच्याकडून हफ्ता गोळा करण्यासाठी तयार आहे. मला सांगा मी तुम्हाला कधी भेटू हे खरं आहे का ?
अनिल देशमुख : अंकित आनंद याला मी ओळखत नाही.
योगेश नायडू : अधिकाऱ्यांच्या बदल्या या डायरेक्ट तुमच्या नियंत्रणात होत्या हे खरं आहे का ?
अनिल देशमुख : पोलीस मन्युलप्रमाणे काही बदल्या माझ्या अधिकारात, काही cm आणि माझ्या तर काही dgp तर काही cp यांच्या तर काही sp च्या नियंत्रणात येतात. महाराष्ट्र पोलीस आस्थापना बोर्ड आहे त्या माध्यमातून बदल्या होत असतात.
योगेश नायडू : ciu एखाद्या प्रकरणाचा तपास करू शकते का ? तपासासाठी पुढाकार घेऊ शकते का ? हे तुम्हाला माहीत आहे का ?
अनिल देशमुख : ciu हे पोलीस मॅन्युअल नुसार जे काही नियम आहेत त्याप्रमाणे काम करतं.
योगेश नायडू : तुम्हाला ती नियमावली माहीत आहे का ?
अनिल देशमुख : नाही
योगेश नायडू : अनेक हाय फ्रोफाईल केसेस या पोलीस मॅन्युअलच पालन न करता ciu कडे दिल्यात.
अनिल देशमुख : मला माहित नाही.
योगेश नायडू : ciu ची स्थापना आणि कार्यपद्धतीबाबत काही सांगू शकता का ?
अनिल देशमुख : हे प्रशासकीय भाग आहे.
योगेश नायडू : मिलिंद भारंबे यांना प्रश्नावली कोणी दिली ?
अनिल देशमुख : कमिशनर कार्यालयातील अधिकाऱ्यांनी स्वतःच प्रश्नावली बनवली होती. त्यांना acs होम यांनी सूचना केल्या होत्या. त्यात सचिन वाझे यांना कसं खात्यात घेतलं आणि त्यांना महत्वाच्या विभागात कसं घेतलं ? जो 14 वर्ष सस्पेंड होता त्याला कसं महत्वाच्या पदावर नेमलं असे अनेक मुद्दे होते.
योगेश नायडू : गृह विभागाकडून प्रश्न निश्चित करण्यात आले होते का ? तसं पत्रात म्हटलं आहे.
अनिल देशमुख : गृहमंत्री यांनी प्रश्न तयार केले नव्हते.
योगेश नायडू : acs होम हे तुमच्या सल्ल्याशिवाय, परवानगी शिवाय हे करू शकतात का ?
अनिल देशमुख : मी आधी उत्तर दिलं आहे.
योगेश नायडू : मिलिंद भारंबे यांचा रिपोर्ट तुम्हाला मिळाला होता का ?
अनिल देशमुख : 30 मार्चला रिपोर्ट त्यांनी दिला तो दोन तीन दिवसांनी राज्य सरकारला मिळाला. मला कुणी तरी हा रिपोर्ट दाखवला पण मी 5 एप्रिल रोजी राजीनामा दिला.
योगेश नायडू : हेमंत नगराळे यांची पोलीस महासंचालक पदावरून पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली. ही खालच्या दर्जाची पोस्ट होती. dgp च्या खालची पोस्ट होती ?
अनिल देशमुख : हो नगराळे यांना पोलीस आयुक्ती पदी नेमले हे खरं आहे. कारण पोस्टचा दर्जा सारखाच आहे.
योगेश नायडू : हेमंत नगराळे यांची हायरारकीत खालच्या पोस्टवर नियुक्ती करण्यात आली. त्यांना पोलीस आयुक्त करण्यात आलं. हे केवळ सचिन वाझे यांना अडकण्यासाठी आपण केलं का ?
अनिल देशमुख : मी त्यांची बदली केली नाही. राज्य सरकारने केली. (Former Home Minister Anil Deshmukh cross-examined by Sachin Waze’s lawyer before Chandiwal Commission)
इतर बातम्या
Bengal Crime: पत्नीशी वाद, मुलाचा गळा चिरुन होमगार्डची आत्महत्या; सुदैवाने पत्नी बचावली