संजय राऊतांच्या व्याह्यांचा वानखेडेंना झटका, नवी मुंबईतील हॉटेलचा बार परवाना कायमचा रद्द

बार परवाना घेण्याच्या वेळी वय कमी असल्याने ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या आदेशाने एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखडे यांच्या वाशी येथील सतगुरु बारचा परवाना रद्द करण्यात आला आहे

संजय राऊतांच्या व्याह्यांचा वानखेडेंना झटका, नवी मुंबईतील हॉटेलचा बार परवाना कायमचा रद्द
समीर वानखेडे, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर
Follow us
| Updated on: Feb 03, 2022 | 9:18 AM

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (Narcotics Control Bureau) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांना मोठा झटका बसला आहे. नवी मुंबईतील वाशी भागात समीर वानखेडे यांच्या नावे असलेल्या सतगुरु हॉटेलचा बार परवाना कायमस्वरुपी रद्द करण्यात आला आहे. ठाण्याचे जिल्ह्याधिकारी राजेश नार्वेकर (Rajesh Narvekar) यांनी वानखेडेंचा बार परवाना कायमस्वरुपी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. त्या अनुषंगाने लवकरच कारवाई होणार आहे. राजेश नार्वेकर हे शिवसेना खासदार संजय राऊत यांची कन्या पूर्वशी यांचे सासरे आहेत, अर्थात राऊतांचे व्याही आहेत. वयाच्या 17 व्या वर्षी आपल्या नावावर बार परवाना घेतल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून या आधीच समीर वानखेडे यांना कारणे दाखवा नोटीस बाजवण्यात आली होती.

मुद्देमाल ताब्यात घेणार

बार परवाना घेण्याच्या वेळी वय कमी असल्याने ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या आदेशाने समीर वानखडे यांच्या वाशी येथील सतगुरु बारचा परवाना रद्द करण्यात आला आहे. राज्य उत्पदान शुल्क यांच्या वतीने या बारचा मुद्देमाल ताब्यात घेणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे ठाणे अधीक्षक निलेश सांगडे यांनी दिली.

काय आहे प्रकरण?

“समीर वानखेडे यांचे पिता ज्ञानदेव वानखेडे हे 1997 मध्ये उत्पादन शुल्क कार्यालयात नोकरीला होते. त्यावेळी त्यांनी समीर वानखेडेंच्या नावावर बारचं परमीट काढलं होतं. त्याची नोंद ठाणे जिल्ह्याच्या रजिस्टरमध्ये नोंद आहे. समीर ज्ञानदेव वानखेडे या नावानं हे परमीट घेण्यात आलं. त्यावेळी समीर यांचं वय होतं 17 वर्ष 10 महिने आणि 19 दिवस. वडील उत्पादन शुल्क विभागात काम करत होता. त्यामुळे त्यांनी एका अल्पवयीन मुलाला बारचं परमीट दिलं. हा सर्वात मोठा फर्जीवाडा आहे” असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. वानखेडे यांच्या नावावर वाशी येथे हा बार आहे. या बारचं परमीट नूतनीकरणही करण्यात आलं आहे. 31 मार्च 2022 पर्यंत या बारचं परमीट नूतनीकरण करण्यात आलं आहे. हे बार आणि रेस्टॉरंट आहे, असं मलिक यांनी सांगितलं होतं.

संबंधित बातम्या :

समीर वानखेडेंची बदली, NCB च्या विभागीय संचालकपदी कोणाची वर्णी?

अल्पवयीन असतानाच समीर वानखेडेंना बारचं परमीट मिळालं; मलिकांकडून वानखेडे कुटुंबाचा आणखी फर्जीवाडा उघड

दरेकर म्हणतात, दाऊद नाव केवळ मुस्लिमांचच का? मराठ्यांमध्येही आहेत, वानखेडेवर वाद वाढणार?

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.