Mumbai Crime : वैवाहिक वाद टोकाला गेला, झोपेतच पतीने पत्नीचा काटा काढला !

पती-पत्नीमध्ये वारंवार वाद व्हायचे. वाद मिटवण्याचे अनेकदा प्रयत्न झाले. मात्र काही फायदा झाला नाही. णग अखेर जे घडले त्याने कुटुंबीय हादरले.

Mumbai Crime : वैवाहिक वाद टोकाला गेला, झोपेतच पतीने पत्नीचा काटा काढला !
कौटुंबिक वादातून पतीने पत्नीला संपवले
Follow us
| Updated on: Jul 29, 2023 | 9:13 AM

मुंबई / 29 जुलै 2023 : घरगुती वादातून पतीने पत्नीला संपवल्याची घटना वडाळा परिसरात उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे. रोशनी राजेश इरणाकर असे मयत पत्नीचे आणि राजेश वसंत इरणाकर असे आरोपी पतीचे नाव आहे. या घटनेमुले परिसरात एकच खळबळ उडाली. पती-पत्नीमध्ये नेहमी वाद व्हायचे. अनेकदा समजूत काढूनही दोघांमधील वाद मिटत नव्हते. अखेर या वादाचा भयानक अंत झाला. या घटनेमुले कुटुंबीयांनाही धक्का बसला आहे.

नातेवाईकांनी वाद मिटवण्याचा प्रयत्न केला

इरणाकर जोडपे वडाळा बेस्ट डेपोसमोरील आंबेडकर कॉलेजजवळ राहत होते. पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. नातेवाईकांनी हस्तक्षेप करुन दोघांचा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. पण काहीच फायदा झाला नाही. दोघांमध्ये वाद झाल्यानंतर काहीही न सांगता राजेश बाहेर निघून जायचा. यामुळे पत्नीला त्याचे दुसऱ्या स्त्री शी प्रेमसंबंध असल्याचा संशय होता.

अखेर वादातून पत्नीला संपवले

पचीने अनेकदा आपले प्रेमसंबंध नसल्याचे पत्नीला सांगितले. मात्र तिचा विश्वास बसत नव्हता आणि यावरुन ती पतीशी भांडायची. याच रागातून त्याने पत्नीचा काटा काढला. शुक्रवारी पहाटे पत्नी झोपेत असताना पतीने पत्नीची हत्या केली आणि पळून गेला. सकाळी घरच्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ महिलेला केईएम रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

हे सुद्धा वाचा

आरोपी अटक

यानंतर पोलिसांना प्रकरणाची माहिती देण्यात आली. पोलिसांनी हत्येच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली. पोलीस चौकशी आरोपीने आपला गुन्हा कबूल केला. पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.