चोर समजून रिक्षा चालकाला इतरं मारलं, इतकं मारलं की तो मेलाच! कुटुंबीयांचे गंभीर आरोप

मारहाणीत रिक्षा चालकाचा मृत्यू झाला असून रिक्षा चालकाच्या कुटुंबीयांना याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दामी नगर परिसरात राहणाऱ्या शाहरुख शेख या रिक्षा चालकाला जमावानं चोर समजून बेदम मारहाण केली.

चोर समजून रिक्षा चालकाला इतरं मारलं, इतकं मारलं की तो मेलाच! कुटुंबीयांचे गंभीर आरोप
शाहरुख शेखच्या हत्येचं कारण काय?
Follow us
| Updated on: Jan 24, 2022 | 10:23 AM

मुंबई : मुंबईच्या समता नगरमधून (Samata Nagar) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चोर समजून एका रिक्षा चालकाला बेदम मारहाण जमावानं केली आहे. या मारहाणीत रिक्षा चालकाचा मृत्यू झाला असून रिक्षा चालकाच्या (AutoRikshaw Driver) कुटुंबीयांना याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. समता नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दामी नगर परिसरात राहणाऱ्या शाहरुख शेख या रिक्षा चालकाला जमावानं चोर समजून बेदम मारहाण केली. त्याचे हातपाय बांधून त्याला निर्मल चाळीजळ फेकून देण्यात आलं होतं. घटनेच्या 2 तासांनंतर लोकांनी याबाबतची माहिती पोलीसांना दिली. घटनास्थळी जेव्हा पोलीस पोहोचले तेव्हा जखमी रिक्षाचालक शाहरुख शेख हा रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसून आलं. पोलिसांनी तत्काळ शाहरुख याला उपाचारासाठी रुग्णालयात दाखलं केलं. शताब्दी रुग्णालयात त्याचा दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यान, शाहरुखचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे.

कुटुंबीयांचा निदर्शनं

याप्रकरणी सध्या समता नगर पोलीस काही जणांवर गुन्हा दाखल करून आता पुढील तपास करत आहेत. दरम्यान, पोलिसांवर शाहरुखच्या कुटुंबीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून त्याच्या कुटुंबातील लोक संतप्त झाले आहेत. रविवारी दुपारी शाहरुखच्या कुटुंबाव्यतिरिक्त स्थानिक रहिवाशांनी उत्तर प्रदेश विभागाचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण पडवळ यांच्या कार्यालयाबाहेर हत्येचा गुन्हा दाखल करण्यासाठी धरणं आंदोलन केले. शाहरुखच्या मारेकऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे. हातात शाहरुखच्या मारेकऱ्यांचे बॅनर पोस्टर घेऊन कुटुंबीय अतिरिक्त आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर न्यायासाठी याचना करत होते.

15 जानेवारी रोजी शाहरुख शेख याचा मृत्यू झाला आहे. उपचारादरम्यान, त्याचा जीव गेलाय. त्याला जबर मारहाण करण्यात आली होती. त्याला मारहाण करण्यात आल्याचं एक सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. शाहरुखला न्याय द्या, अशी मागणी करत काहींनी निदर्शनं केली आहेत. संजय पालस्माकार, नरेश पवार, मच्छीदर कुंभार, मिथिलेश भारती आणि कृष्णा भोलेयांच्यावर शाहरुख शेखच्या हत्येचा आरोप करण्यात निदर्शनं करणाऱ्यांनी केला आहे.

सीसीटीव्हीमध्ये काय दिसलं?

रस्त्याच्या कडेला असलेल्या एक सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये एका तरुणाला मारहाण करण्यात आल्यांचं दिसून आलं आहे. दरम्यान, शाहरुखच्या आईनं पोलिस सहकार्य करत नसल्याचा आरोप केला आहे. माझ्या मुलाची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. माझ्या मुलाला न्याय द्यावा, अशी मागणी केली आहे. चोर असल्याचं भासवून मुद्दाम त्याला मारहाण करण्यात आली, असाही आरोप त्यांनी केलाय. सध्या याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

इतर बातम्या :

लातुरात कोयत्यानं सपासप वार, नांदेडमध्ये खून करुन हाडं नदीत फेकली, 5 मित्रांनी आपल्याच मित्रांना का संपवलं?

नागपुरातील ‘हंगामा डान्स’ प्रकरणात फास आवळला, पोलिसांनी आणखी 8 जणांना ठोकल्या बेड्या, पाळमुळं आणखी खोल ?

नवजात बाळांना विकणारी टोळी अखेर गजाआड, 2.75 लाखात बाळाची विक्री, काय होती मोड्स ओपरेंडी?

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.