युनिकॉर्न स्टार्ट-अप समूहावरील छापेमारीत 1 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड आणि 22 लाखांचे दागिने जप्त
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात एकूण 23 ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. या छापेमारीत कागदपत्रे आणि डिजिटल डेटासह अनेक महत्वाचे पुरावे प्राप्तिकर विभागाच्या हाती लागले आहेत. या पुराव्यांवरुन कंपनीने बनावट खरेदी आणि रोखीचे व्यवहार केल्याचे आढळले आहे.
मुंबई : युनिकॉर्न स्टार्ट-अप समूहा (Unicorn start-up group)च्या पुणे आणि ठाणे येथील कार्यालयांवर मारलेल्या छापेमारीत तब्बल 1 कोटी रुपयांची बेहिशेबी रक्कम आणि 22 लाख रुपयांचे दागिने जप्त (Seizes) करण्यात आल्याची माहिती वित्त मंत्रालयाने दिली. प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी 9 मार्च 2022 रोजी युनिकॉर्न स्टार्ट अप समूहाच्या कार्यालयांवर छापे टाकले होते. युनिकॉर्न स्टार्ट अप कंपनी बांधकामा साहित्य पुरवठा करण्याचा व्यवसाय करते. या कंपनीची वार्षिक उलाढाल सहा हजार कोटींहून अधिक आहे. (Income tax department seizes cash of Rs 1 crore and jewelery worth Rs 22 lakh in raid on Unicorn start-up group)
एकूण 23 ठिकाणी छापेमारी
महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशात एकूण 23 ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. या छापेमारीत कागदपत्रे आणि डिजिटल डेटासह अनेक महत्वाचे पुरावे प्राप्तिकर विभागाच्या हाती लागले आहेत. या पुराव्यांवरुन कंपनीने बनावट खरेदी आणि रोखीचे व्यवहार केल्याचे आढळले आहे. याशिवाय, साधारण 400 कोटी रुपयांच्या बेहिशेबी नोंदी देखील आढळल्या आहेत.
Income Tax Department conducted a search & seizure operation on a Pune & Thane based unicorn start-up group, engaged in the business of construction material on March 9th and recovered unaccounted cash of Rs 1 crore and jewellery worth Rs 22 lakhs: Ministry of Finance pic.twitter.com/p3Tl0pRJMW
— ANI (@ANI) March 20, 2022
काही बनावट कंपन्यांच्या माध्यमातून हवाला व्यवहार होत असल्याचे उघड
या कंपनीला मोठ्या प्रीमियमच्या समभागांच्या माध्यमातून मॉरिशस मार्गे मोठा परदेशी निधी देखील मिळाल्याचे छापेमारीत उघड झाले. तसेच, शोध मोहिमेदरम्यान, मुंबई आणि ठाण्यातील बनावट कंपन्यांच्या माध्यमातून काही हवाला व्यवहार होत असल्याचेही आढळले. या बेहिशेबी व्यवहाराबाबत कंपनीच्या संचालकांकडे विचारणा केली असता, कंपनीने व्यवहार केल्याची कबुली देत विविध मूल्यांकन वर्षात, 224 कोटींपेक्षा अधिक बेहिशेबी उत्पन्न मिळवल्याचेही प्राप्तिकर विभागाला सांगितले. ज्या बनावट कंपन्यांच्या माध्यमातून खोटे व्यवहार दाखवण्यात आले त्यांचे मूल्य 1500 कोटींपेक्षा अधिक आहे. तसेच या उत्पन्नावरील सर्व देय कर भरण्याची तयारीही त्यांनी दर्शवली. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. (Income tax department seizes cash of Rs 1 crore and jewelery worth Rs 22 lakh in raid on Unicorn start-up group)
इतर बातम्या
Nagpur Crime : नागपुरात आठ वर्षीय गतिमंद बालिकेवर लैंगिक अत्याचार
VIDEO : गिरीश महाजनांच्या मुलीच्या लग्नात पाकिटमार घुसला, माजी नगरसेवकाचे पैसे चोरण्याचा प्रयत्न