90 च्या काळातलं मुंबईला हादरवणारं दुहेरी हत्याकांड, पोलिसांनाही जमलं नाही ते देशाच्या पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडीत यांनी करुन दाखवलं

आम्ही आज ज्या महिलेची माहिती देणार आहोत त्या महिलेने अनेकदा स्वत:चा जीव धोक्यात टाकून मोठी कामगिरी बजावली आहे. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात महिला म्हणून ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. ही व्यक्ती म्हणजे देशाच्या पहिल्या खासगी महिला गुप्तहेर रजनी पंडीत !

90 च्या काळातलं मुंबईला हादरवणारं दुहेरी हत्याकांड, पोलिसांनाही जमलं नाही ते देशाच्या पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडीत यांनी करुन दाखवलं
देशाच्या पहिल्या महिला खासगी गुप्तहेर रजनी पंडीत
Follow us
| Updated on: Aug 09, 2021 | 7:54 AM

मुंबई : आपण जे काम करतो त्या कामात पूर्णपणे झोकून दिलं तर त्या कामातून मिळणारं यश हे अपेक्षेपेक्षाही जास्त असतं. अर्थात यश मिळण्याआधी खूप कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागतं. एखादा प्रसंग असा येतो की सगळं सोडून द्यावं. कधीकधी माणूस नैराश्यात जातो. पण संयमाने न खचता लढत राहिलं तर आपण नक्कीच यशाच्या उंच शिखरावर पोहोचतो. त्यानंतर सर्व जग आपल्या कर्तृत्वाला सलाम करतं. आम्ही आज अशाच एका महिलेची माहिती देणार आहोत ज्या महिलेने अनेकदा स्वत:चा जीव धोक्यात टाकून मोठी कामगिरी बजावली आहे. पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात महिला म्हणून ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. ही व्यक्ती म्हणजे देशाच्या पहिल्या खासगी महिला गुप्तहेर रजनी पंडीत !

रजनी यांनी अनेक सीरिअस किलर्स, गुन्हेगारीच्या घटनांचा उलगडा केला आहे. विशेष म्हणजे 30 गंभीर गुन्ह्यांचा उलगडा केल्यामुळे त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले आहेत. त्यांनी 1988 साली त्यांच्या आयुष्यातील पहिल्या केसचा उलगडा केला होता. विशेष म्हणजे या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी त्यांनी वेशांतर करुन त्या सहा महिने आरोपीच्या घरात कामवालीबाई म्हणून काम केलं होतं. त्यावेळी हे प्रकरण वृत्तपत्र-माध्यमांमध्येही प्रचंड गाजलं होतं.

नेमकं प्रकरण काय?

संबंधित घटना ही 1988 साली घडली होती. मुंबईतल्या गजबलेल्या भागातील एका हायप्रोफाईल इमारतीत एका फ्लॅटमध्ये एक पुरुष आणि त्याच्या मुलाची हत्या करण्यात आली होती. या घरातील गृहिणी असलेल्या महिलेने पोलिसांना फोन करुन आपल्या पती आणि मुलाच्या हत्येची माहिती दिली होती. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन घटनेचा पंचनामा केला.

पोलिसांच्या तपासात काहीच उलगडा झाला नाही

यावेळी पोलिसांनी इमारतीचा वॉचमन आणि परिसरातील भाजीपाला व्यापारी, दुकानदार यांच्याकडेही याप्रकरणाची चौकशी केली होती. पण पोलिसांना संशयास्पद काहीच मिळत नव्हतं. मृतक पुरुषाच्या पत्नीच्या हालचालींवरही पोलिसांनी लक्ष ठेवलं. पण तिची देखील वागणूक पीडितासारखी दिसली. त्यामुळे अखेर पोलिसांनी या प्रकरणाची फाईल बंद केली.

रजनी पंडीत यांच्याकडून तपास

अखेर मृतक व्यक्तीच्या एका नातेवाईकाने देशाच्या पहिल्या खासगी महिला गुप्तहेर रजनी पंडीत यांची भेट घेतली. त्यांनी या प्रकरणाची माहिती रजनी पंडीत यांना दिली. त्यांनी या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी रंजनी यांना विनंती केली. अखेर रजनी यांनी या प्रकरणाचा अभ्यास केला. त्यानंतर त्या वेशांतर करुण संबंधित महिलेच्या घरी गेल्या. तिथे त्यांनी आपण गरीब असून कामाच्या शोधात असल्याचं महिलेला सांगितलं. तसंच आपण घरातील सर्व कामे करु शकतो. तसेच तुम्हाला जितके पैसे देता येतील तितके पैसे द्या, असंही रजनी महिलेला म्हणाल्या.

आरोपी महिलेच्या घरात कामवाली बाई म्हणून काम

अखेर महिलेने रजनी यांना कामवाली बाई समजून कामावर ठेवलं. रजनी यांनी जवळपास सहा महिने आरोपी महिलेच्या घरात कामवाली बाई म्हणून काम केलं. या दरम्यान त्यांनी घरातील लादी पुसणे, भांडी-कपडे धुणे असं सर्व प्रकारची कामे केली. रजनी यांनी घरात एक रेकॉर्डर ठेवलं होतं जेणेकरुन रजनी घरात नसताना त्या महिलेच्या सर्व गोष्टी आपल्याला रेकॉर्ड करता येतील. मात्र, एका दिवशी त्या रेकॉर्डरचं प्ले बटन रजनी यांच्याकडून दाबलं गेलं. त्यामुळे महिलेला आवाज गेला. तिने याबाबत विचारपूस केली. अखेर रजनी यांना त्यावेळी हे रेकॉर्डर कचऱ्यात फेकून द्यावं लागलं.

आरोपीच्या अखेर मुसक्या आवळल्या

यादरम्यान एक पुरुष दरवाज्यावर आला. त्याने घराची बेल वाजवली. रजनी यांनी घराचा दरवाजा उघडला. त्यानंतर रजनी यांनी महिलेला दरवाज्यावर एक पुरुष आल्याची माहिती दिली. महिला त्या पुरुषासोबत बोलताना घाबरत होती. तसेच तिने त्या पुरुषाला घरी का आला? म्हणून विचारलं. यावेळी तिने रजनी यांना किचनमधून बाहेर न येण्यास सांगितलं. रजनी यांना संशय आला. त्यांनी किचनमध्ये पायावर सुरी मारुन स्वत:ला जखमी केलं. तसेच रुग्णालयात जाण्याचं नाव सांगून त्या घराबाहेर पडल्या. रजनी हॉस्पिटलचं नाव सांगून टॅक्सीत बसल्या. त्यानंतर रस्त्यावर त्यांनी पीसीओ सेंटरवर टॅक्सी थांबवत पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस तातडीने आरोपी महिलेच्या घरी दाखल झाले. त्यांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता आरोपींनी आपला गुन्हा कबूल केला होता. या गुन्ह्याचा उलगडा केल्यानंतर रशमी यांना पुरस्कारही प्रधान करण्यात आला होता.

हेही वाचा : 

भारतातील अपहरणाची ‘ती’ भयानक घटना ज्याने संपूर्ण देश हादरला होता

पतीशी विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय, पत्नीने बळजबरी तरुणीचे केस कापले

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.