AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rupali Chakankar : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांविरुद्ध इंडियन बार असोसिएशनची याचिका, नेमकं कारण काय?

चाकणकरांविरोधात कायदेशीर कारवाईचे आदेश देण्याची याचिकेत मागणी करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ भाजपा नेते नारायण राणे यांच्याविरोधात अलिकडेच काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तर दुसरीकडे गणेश नाईक यांच्यासंबंधी एका महिलेतर्फे तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र या प्रकरणांमध्ये राजकीय हेतूने चाकणकर कारवाई करत असल्याचा आरोप होत आहे.

Rupali Chakankar : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांविरुद्ध इंडियन बार असोसिएशनची याचिका, नेमकं कारण काय?
रुपाली चाकणकरांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल Image Credit source: tv9
| Edited By: | Updated on: Apr 30, 2022 | 10:46 PM
Share

मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या विरोधात मुंबई हायकोर्टात इंडियन बार असोसिएशन तर्फे एक जनहित याचिका (Petition) दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत रूपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या पदाचा दुरूपयोग राजकीय लढाईत करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याचिकाकर्ते यांचे वकील याचिकेवर लवकर सुनावणी घेण्यात यावी याकरीता सोमवारी मुंबई हायकोर्टात लेखी अर्ज करणार आहेत. ही याचिका इंडियन बार असोसिएशनतर्फे मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. याचिकेत भाजपा नेते नारायण राणे आणि गणेश नाईक यांच्याविरोधात पदाचा गैरवापर करत रुपाली चाकणकर यांनी आदेश दिल्याचा दावा इंडियन बार असोसिएशनतर्फे करण्यात आला आहे. (Indian Bar Association files public interest litigation in Mumbai High Court against Rupali Chakankar)

चाकणकरांविरोधात कायदेशीर कारवाईचे आदेश देण्याची मागणी

चाकणकरांविरोधात कायदेशीर कारवाईचे आदेश देण्याची याचिकेत मागणी करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्री आणि वरिष्ठ भाजपा नेते नारायण राणे यांच्याविरोधात अलिकडेच काही तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तर दुसरीकडे गणेश नाईक यांच्यासंबंधी एका महिलेतर्फे तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र या प्रकरणांमध्ये राजकीय हेतूने चाकणकर कारवाई करत असल्याचा आरोप होत आहे. रुपाली चाकणकर यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह 11 मंत्र्यांना प्रतिवादी करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार रूपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या पदाचा दुरुपयोग आपल्या पार्टी विरोधातील इतर पार्टीमधील नेत्यांविरोधात केला आहे. आता राज्य सरकारकडून आणि महिला आयोगाकडून या याचिकेला काय उत्तर देण्यात येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्याचबरोबर चाकणकर ह्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष असून राष्ट्रवादी पक्षाच्या महिला अध्यक्ष पदावर ही कायम आहेत. नियमाप्रमाणे हे गैरकायदेशीर आहे असं दावा संबंधित याचिकेत करण्यात आला आहे.

अर्ध न्यायिक पदावर असताना पक्षाचे कामकाज केल्याचा आरोप

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अर्ध न्यायिक पदावर असताना पक्षाचे कामकाज करणे हे चुकीचे आहे. तसेच नवाब मलिक यांना कोर्टाने न्यायालयीन कोठडीत पाठवल्यानंतर पार्टीच्या आंदोलनात त्या सहभागी झाल्या होत्या. मात्र महिला आयोगाच्या कलम 20 नुसार हे चुकीचे आहे त्यामुळे त्यांच्याविरोधात आयपीसी 409 नुसार गुन्हे तसेच त्यांच्यासोबत त्यावेळी उपस्थित असलेले अनेक आमदार, खासदार, मंत्री यांच्या विरोधात देखील IPC 120B नुसार गुन्हेगार असतात असे कायद्यात म्‍हटले आहे. त्यामुळे रूपाली चाकणकर यांच्या विरोधात जनहित याचिका दाखल करण्यात आली असून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्या संदर्भात न्यायालयाने आदेश द्यावे अशी याचिकेत मागणी करण्यात आली आहे. नियमानुसार या याचिकेत येणाऱ्या काळात मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी अपेक्षित आहे. मात्र संदर्भात राज्याच्या महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (Indian Bar Association files public interest litigation in Mumbai High Court against Rupali Chakankar)

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.