दहशतवादविरोधी कारवाईत एनआयएला झटका, इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचा सदस्य निर्दोष

अशफाकचे वडील अब्दुल मजीद यांनी नागपाडा पोलिस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआरनंतर ऑगस्ट 2016 मध्ये कुरेशीला अटक करण्यात आली होती.

दहशतवादविरोधी कारवाईत एनआयएला झटका, इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनचा सदस्य निर्दोष
तरुणीचा पाठलाग करणाऱ्या आरोपीची निर्दोष सुटकाImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Sep 30, 2022 | 7:11 PM

मुंबई : सहा वर्षांपूर्वी पाकिस्तानी दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटच्या कनेक्शन (Islamic State Connections) प्रकरणात केलेल्या कारवाईत राष्ट्रीय तपास यंत्रणेला (National Investigation Agency) शुक्रवारी मोठा झटका बसला आहे. महाराष्ट्रातील तरुणांना इस्लामिक स्टेटमध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप असलेल्या आर्शी कुरेशीला (Arshi Qureshi) आज मुंबईच्या सत्र न्यायालयाने निर्दोष सोडले. कुरेशीविरोधात एनआयएने सबळ पुरावे दाखल केले नाहीत, असे मत व्यक्त करीत एनआयएच्या विशेष न्यायालयाने कुरेशीच्या सुटकेचा आदेश दिला आहे. कुरेशीला सर्व आरोपांतून निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.

2016 मध्ये कुरेशीला अटक झाली होती

कुरेशीला मुंबई पोलिसांनी 2016 मध्ये यूएपीए कायद्याअंतर्गत अटक केली होती. गेली 6 वर्षे तो तुरुंगात कैद आहे. वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरु झाकीर हुसैन यांनी स्थापन केलेल्या इस्लामिक रिसर्च फाऊंडेशनसाठी (IRF) कुरेशी काम करत होता, असे एनआयएने आपल्या आरोपात म्हटले आहे.

कुरेशीने इस्लाम स्वीकारण्यास तरुणांना प्रभावित केल्याचा आरोप

आयआरएफमधील पदाचा वापर करुन कुरेशीने इस्लाम स्वीकारण्यास लोकांना प्रभावित केल्याचेही एनआयने आरोपात नमूद केले आहे. कुरेशीवर अशफाक मजीद आणि त्याच्या साथीदारांना जिहादी विचारसरणीला प्रवृत्त केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा

प्रकरण काय ?

अशफाकचे वडील अब्दुल मजीद यांनी नागपाडा पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या एफआयआरनंतर ऑगस्ट 2016 मध्ये कुरेशीला अटक करण्यात आली होती. मजीद यांचे मूळगाव कासरगोड येथून अशफाक बेपत्ता झाल्यानंतर आपल्या मुलाला दहशतवादी कारवायांसाठी प्रभावित केल्याचा आरोप केला होता.

यानंतर 2017 साली एनआयएने या प्रकरणाचा तपास हाती घेतला. एनआयएने कुरेशी आणि अन्य एका फरार सदस्याला याप्रकरणी आरोपी बनवले होते. त्यांच्यावर UAPA च्या कलम 13, 18, आणि 38 आणि भारतीय दंड संहितेच्या कलम 120B अंतर्गत गुन्हेगारी कट रचून तरुणांना प्रतिबंधितांमध्ये सामील होण्यासाठी प्रवृत्त केल्याबद्दल आरोप ठेवण्यात आले.

ठोस पुराव्यांअभावी कुरेशी निर्दोष मुक्तता

या आरोपांसदर्भात तपास यंत्रणेने ठोस पुरावे सादर न केल्याचे निरीक्षण एनआयए विशेष न्यायालयाचे न्यायाधीश ए.एम. पाटील यांनी नोंदवले. यानंतर आरोपी कुरेशीची कलम 13 आणि कलम 19 अंतर्गत आरोपांतून सुटका करण्यात आली आहे.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.