Jacqueline Fernandez : परदेशवारीसाठी जॅकलिन फर्नांडिसची कोर्टात धाव; आयफा अवॉर्ड सोहळ्यासाठी केली याचिका
200 कोटींच्या वसुलीच्या प्रकरणात ठग सुकेश चंद्रशेखरशी संबंधित एका प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसविरुद्ध लुकआउट सर्कुलर नोटीस जारी करण्यात आलेली आहे. त्यामुळे जॅकलिनची परदेशवारी गोत्यात सापडली आहे. तिहार तुरुंगात बंद असलेला देशातील सर्वात मोठा ठग सुकेश चंदशेखर याच्याशी जॅकलिनचे संबंध अलीकडेच उजेडात आले आहेत. त्यामुळे कथित फसवणूक प्रकरणात जॅकलिनही चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे.
नवी दिल्ली : अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस (Jacqueline Fernandez)ने आयफा अवॉर्ड (IIFA Awards) सोहळ्याकरीता परदेशात जाण्यासाठी दिल्लीतील कनिष्ठ न्यायालयात याचिका (Petition) दाखल केली आहे. अबू धाबी येथे होणाऱ्या आयफा पुरस्कार सोहळ्यात सहभागी होण्यासाठी 15 दिवस परदेशात जाण्यास परवानगी द्या, अशी विनंती तिने पटियाला हाऊस कोर्टात एका अर्जाद्वारे केली आहे. अबुधाबीव्यतिरिक्त फ्रान्स आणि नेपाळला जाण्यासाठीही परवानगीही मागितली आहे. तिच्या या अर्जावर न्यायालय काय निर्णय देतेय, यावर जॅकलिनच्या आयफा अवॉर्ड सोहळ्याच्या परदेशवारीचे भवितव्य अवलंबून आहे.
लुकआउट सर्कुलर जारी झाल्यामुळे परदेशवारी गोत्यात
200 कोटींच्या वसुलीच्या प्रकरणात ठग सुकेश चंद्रशेखरशी संबंधित एका प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसविरुद्ध लुकआउट सर्कुलर नोटीस जारी करण्यात आलेली आहे. त्यामुळे जॅकलिनची परदेशवारी गोत्यात सापडली आहे. तिहार तुरुंगात बंद असलेला देशातील सर्वात मोठा ठग सुकेश चंदशेखर याच्याशी जॅकलिनचे संबंध अलीकडेच उजेडात आले आहेत. त्यामुळे कथित फसवणूक प्रकरणात जॅकलिनही चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. याच पार्श्वभूमीवर तिला परदेशात जाण्यासाठी न्यायालयात धाव घ्यावी लागली आहे. तिने दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात याचिका दाखल करून परदेशात जाण्यासाठी परवानगी मागितली आहे.
अबूधाबीसह नेपाळ, यूएई, फ्रान्स या देशांमध्ये जाण्याचा प्लान
15 दिवसांच्या आयफा फिल्म अवॉर्ड्स कार्यक्रमात परदेश दौऱ्यावर जाण्यासाठी जॅकलिन उत्सुक आहे. अबू धाबी येथील 2022 च्या आयफा वीकेंड अवॉर्ड सोहळ्यासह नेपाळ, यूएई, फ्रान्स या देशांतील काही चित्रपट कार्यक्रम आणि पत्रकार परिषदांनाही तिला उपस्थित राहायचे आहे. यासाठी मला न्यायालयाने त्वरित परवानगी द्यावी, अशी विनंती जॅकलिनने केली आहे. जॅकलिनविरुद्ध ईडीने एलओसी म्हणजेच लूक आऊट सर्क्युलर जारी केले आहे. त्यानुसार जॅकलिनने न्यायालयाला LOC ला स्थगिती देण्याची विनंती केली आहे.
याआधी परदेशात जाताना मुंबई विमानतळावर रोखले होते!
याआधीही जॅकलीनला परवानगीशिवाय परदेशात जाताना मुंबई विमानतळावर अडवण्यात आले होते. त्यानंतर तिची सखोल चौकशी करण्यात आली. त्यानंतर तिला सोडण्यात आले होते. तेव्हापासून तिच्याविरोधात एलओसी जारी करण्यात आले आहे. जॅकलिन सध्या ईडीच्या रडारवर आहे. ईडीने तिचे अनेकदा जबाब नोंदवले असून सुकेश चंद्रशेखर प्रकरणाशी संबंधित महत्त्वाच्या आरोपपत्रात तिचे नाव आहे. महागड्या भेटवस्तूंसाठी तिने सुकेशशी मैत्री कशी केली? असा प्रश्न आहे. अलीकडेच ईडीने जॅकलिन फर्नांडिसची सुमारे 7 कोटींची एफडी जप्त केली होती. आता न्यायालय तिच्या अर्जावर काय निर्णय देतेय, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.