Kalyan CCTV : कपड्यांच्या आडून कपड्यांचीच चोरी! कपडेचोर महिला CCTV कॅमेऱ्यात कैद, धाडस तर बघा!
Kalyan crime News : काही दिवसांनी स्टॉक कमी दिसल्यानं सीसीटीव्ही तपासले असता त्यात हा प्रकार समोर आला.
कल्याण : कपड्यांच्या दुकानातील एक चोरी कल्याणमधून (Kalyan Crime News) समोर आली आहे. कपड्यांच्या दुकानात खरेदीच्या बहाण्याचे आलेल्या महिलांनी कपड्याच्या आडूनच चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. चोरीची ही घटना सीसीटीव्ही (CCTV Video) कॅमेऱ्यातही कैद झाली आहे. कपडे चोरणाऱ्या या महिलांची टोळीनं नवा कोऱ्या कपड्यांवर डल्ला मारत हजारो रुपयांचा माल लंपास केलाय. दुकानात चोरी करुन पसार झालेल्या या महिला सध्या फरार आहेत. पोलिसांनी या महिलांचा शोध घेण्यासाठी मोहीम सुरु केली आहे. पोलीस पथकांच्या माध्यमातून या कपडे चोरणाऱ्या महिलांच्या टोळीचा (Lady gang) शोध घेतला जातोय. दुकानदाराला बोलण्यात काही महिला गुंतवून ठेवायच्या आणि तोपर्यंत इतर महिला कपड्यांच्या दुकानातील मालावर हात साफ करायच्या. कपड्यांच्या आडूनच कपड्यांची चोरी करण्याचा हा प्रकार उघडकीस आलाय. कल्याणमध्ये समोर आलेल्या या चोरीच्या घटनेनं कपडे विक्री करणारे दुकानदारही धास्तावले आहेत.
16 हजारांचे कपडे चोरले
कल्याणमध्ये कपड्यांच्या दुकानात चोरी करणारी महिलांची टोळी सक्रिय असल्याचं पाहायला मिळतंय. या टोळीनं एका दुकानातून 16 हजार रुपयांचे कपडे चोरून नेलेत. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय.
पाहा व्हिडीओ :
#Video | कपड्यांची चोर करणाऱ्या महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद, पाहा चोरीची मोड्स ऑपरेंडी #Kalyan #maharashtranews #crime pic.twitter.com/vzYHkKIZ0Y
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 14, 2022
नेमकी चोरी कुठं केली?
कल्याण पश्चिमेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात केशाज लेडीज गारमेंट नावाचं दुकान आहे. या दुकानात 6 मे रोजी संध्याकाळी 6 च्या सुमारास काही महिला आणि पुरुष अशी चोरट्यांची टोळी आली. यापैकी काही महिलांनी दुकानातील कर्मचारी भूपेंद्र चावडा यांना कपडे दाखवण्यात गुंग ठेवलं आणि इतर महिलांनी रॅकमधले कपड्याचे बंडल चोरले.
कपडेचोर टोळीचा शोध सुरु
काही दिवसांनी स्टॉक कमी दिसल्यानं सीसीटीव्ही तपासले असता त्यात हा प्रकार समोर आला. त्यानुसार दुकानाच्या मालकीण पूजा गुप्ता यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिसांनी आयपीसी 380, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला असून या चोरट्यांच्या टोळीचा पोलीस शोध घेतायत.
कपड्यांची चोरी करणाऱ्या या महिलांच्या टोळीमुळे इतर दुकानदारांनीही आता सतर्क राहण्याची गरज व्यक्त केली जाते आहे. टोळीनं दुकानात ग्राहक बनून येत कपडे लांबवणाऱ्या या टोळीच्या मुसक्या पोलीस केव्हा आवळतात, हे पाहणं महत्त्वाचंय.