Kalyan Crime | कल्याणमध्ये विकृतीचा कळस, प्रियकर-प्रेयसीकडून अल्पवयीन भाऊ-बहिणीचा लैंगिक छळ
कल्याणमध्ये (Kalyan) प्रेयसी आणि तिच्या प्रियकराने विकृतीचा कळस गाठला आहे. या दोघांनी अल्पवयीन भाऊ-बहिणीवर लैंगिक अत्याचार (Sexual harassment) केल्याचा आरोप आहे. प्रेयसीने 14 वर्षीय मुलावर सातत्याने लैंगिक अत्याचार केला. तर, तिच्या प्रियकराने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. दोन्ही अल्पवयीन भाऊ-बहिणीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करत कोळसेवाडी पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.
कल्याण : कल्याणमध्ये (Kalyan) प्रेयसी आणि तिच्या प्रियकराने विकृतीचा कळस गाठला आहे. या दोघांनी अल्पवयीन भाऊ-बहिणीवर लैंगिक अत्याचार (Sexual harassment) केल्याचा आरोप आहे. प्रेयसीने 14 वर्षीय मुलावर सातत्याने लैंगिक अत्याचार केला. तर, तिच्या प्रियकराने अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. दोन्ही अल्पवयीन भाऊ-बहिणीच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करत कोळसेवाडी पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.
नेमकं काय घडलं?
आजच्या काळात लैंगिक अत्याचाराच्या घटना सातत्याने वाढत आहेत. कल्याण डोंबिवलीत लैंगिक अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहे. पोलिसांनी या घटनेत कायदेशीर कारवाई केली आहे. डोंबिवलीत एका अल्पवयीन तरुणीवर 33 जणांनी बलात्कार केला होता. या घटनेने एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी सर्व आरोपीना अटक केली होती. डोंबिवलीतील ही घटना ताजी असताना लैंगिक विकृतीची एक विचित्र घटना कल्याणमध्ये समोर आली आहे.
प्रियकराला अल्पवयीन बहिणीसोबत लैंगिक अत्याचार करण्यास भाग पाडले
कोळसेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. एका अल्पवयीन भावा बहिणीची व्यथा ऐकून पोलीस सुद्धा हैराण झाले आहेत. 14 वर्षीय मुलावर एका 23 वर्षीय तरुणी सातत्याने लैंगिक अत्याचार करीत होती. ही तरुणी पिडीत मुलाची नातेवाईक आहे. या आरोपी तरुणीने इतकेच नाही केले तर तिने तिच्या प्रियकराला मुलाच्या अल्पवयीन बहिणीसोबत लैंगिक अत्याचार करण्यास भाग पाडले. तर ती अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार करीत होती.
या आरोपी तरुणीने मुलाच्या बहिणीला सांगितले की आपण दोघे मिळून तिच्या प्रियकरासोबतसुद्धा शय्या करायची. अखेर दोन्ही पिडीत भावा बहिणीने नातेवाईकांच्या मदतीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक बशीर शेख यांनी सांगितले की, आमच्याकडे दोन वेगवेगळ्या तक्रारी दाखल झालेल्या आहेत. या दोन्ही प्रकरणात योग्य कारवाई करण्यात येणार आहे. पिडीत आणि आरोपी हे नातेवाईक असल्याने एकच खळबळ उडाली आहे.
Bangalore Murder | लैंगिक अत्याचाराचा आरोप, अल्पवयीन मित्रांच्या मदतीने मुलीने बापाला संपवलंhttps://t.co/oSA86UYNvS#Murder #DaughterKilledFather #Bangalore
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 24, 2021
संबंधित बातम्या :
चारित्र्यावर सतत संशय घेत असल्याने सूनेकडून सासऱ्याची कु्ऱ्हाडीने वार करुन हत्या
अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत अपहरण केल्याप्रकरणी आरोपीला चार वर्षाचा कारावास