CCTV Video : जिममध्ये राजकीय वाद, राष्ट्रवादी वि. भाजप राडा जोरात! घटना सीसीटीव्ही कैद, अखेर प्रकरण पोलीस ठाण्यात

Kalyan News : राष्ट्रवादीचे ब्रह्मा माळी हे जिममध्ये होते. यावेळी भाजपाचे पदाधिकारी कुंदन माळी हे आपल्या कार्यकर्त्यांसह जिममध्ये आले. जुन्या राजकीय वादातून कुंदन आणि ब्रह्मा यांच्यामध्ये वाद झाला. भांडण वाढलं. शब्दाला शब्द वाढत गेला, हमरीतुमरी झाली.

CCTV Video : जिममध्ये राजकीय वाद, राष्ट्रवादी वि. भाजप राडा जोरात! घटना सीसीटीव्ही कैद, अखेर प्रकरण पोलीस ठाण्यात
जीममध्ये राडा...Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Aug 17, 2022 | 2:18 PM

कल्याण : महाराष्ट्रात सत्तासंघर्ष (Maharashtra Political Crisis) पाहायला मिळाला. महाविकास आघाडी पडलं. एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली. ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं. हा राजकीय भूकंपाला घडून महिनाही उलटून केला. पण राज्यातील राजकीय चर्चा अजूनही तितक्याच ताज्या आहेत. राजकीय चर्चांमधून वाद होण्याचे प्रकार नवे नाहीत. त्यातही वेगवेगळ्या विचारसरणीचे लोक राजकीय विषयांवरुन भांडले आणि वाद चिघळला तर नवल वाटायला नको. आताचं प्रकरण कल्याणमधून समोर येतंय. एक जीममध्ये सॉलिड राडा झाला. राड्यामागचं कारणही (Kalyan Political Fight) राजकीय वाद होतं. या राजकीय वादात भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या समर्थकांमध्ये हमरीतुमरी झाली. जीमच्या आतच एका तरुणाला तिघांनी मिळून दमदाटी करत मारण्याचा प्रयत्न केला. कुणात किती दम आहे, हे एकमेकांना दाखवण्याचा प्रयत्न सुरु असताना जीममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याने (Kalyan Fight Video) आपलं काम चोख बचावलं. सगळी घटना कॅमेऱ्यात कैद केली. आता या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला आहे आणि काहींनी अटकही करण्यात आलीय.

नेमकं काय आहे प्रकरण?

कल्याण डोंबिवलीच्या ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून राजकीय वाद अनेकदा विकोपाला गेल्याचं पाहायला मिळालंय. त्यातच कल्याण ग्रामीण मधला संदप भोपर हा पट्टा कायमच वादग्रस्त चर्चेत असतो. आता पुन्हा या ठिकाणी एक नवीन वाद समोर आला. थेट जिममध्येच राष्ट्रवादी आणि भाजपाचे कार्यकर्ते भिडलेत. ही घटना सीसीटीव्हीमध्ये देखील कैद झालीये.

हे सुद्धा वाचा

आज सकाळी राष्ट्रवादीचे ब्रह्मा माळी हे जिममध्ये होते. यावेळी भाजपाचे पदाधिकारी कुंदन माळी हे आपल्या कार्यकर्त्यांसह जिममध्ये आले. जुन्या राजकीय वादातून कुंदन आणि ब्रह्मा यांच्यामध्ये वाद झाला. भांडण वाढलं. शब्दाला शब्द वाढत गेला, हमरीतुमरी झाली. अखेर वादाचा स्वरूप हाणामारीत झाले. तिघे जण मिळून एकाला मारहाण करताना व्हिडीओत दिसून आले आहेत. तर एक व्यक्ती या भांडणात मध्ये पडून मारहाण करणाऱ्यांना अडवताना दिसतोय. अखेर तिघेही मारहाण करणारे निघून जातानाही दिसतात.

पाहा व्हिडीओ :

याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात आठ जणाविरोधात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आलीये. या अगोदरही याच परिसरात पाण्यावरून राजकीय वातावरण तापलेले पाहायला मिळाले आहे. अनेक प्रकरणं पोलीस ठाण्यात सुद्धा गेलीत. आता राज्यात सरकार बदल्यानंतर राजकीय चिखलफेक सुरू असताना थेट जिममध्येच राष्ट्रवादी आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये ‘किसमे कितना है दम’ या जोशमध्ये भिडल्याने आश्चर्य व्यक्त होतंय.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.