CCTV : बायकोला गाडीच्या चाकाखाली चिरडणारा सिनेनिर्माता कलम किशोर बाबत मोठी अपडेट!
मुंबईच्या अंधेरी पश्चिम परिसरात इमारतीच्या पार्किंगमध्ये थरार! सीसीटीव्ही व्हिडीओमुळे धक्कादायक खुलासा
मुंबई : बायकोच्या अंगावर गाडी घातल्याप्रकरणी सिनेनिर्माता कमल किशोर मिश्रा (Kamal Kishor Mishra) याला पोलिसांनी अखेर ताब्यात घेतलंय. सध्या आंबोली पोलीस (Amboli Police Station) कमल किशोर यांची कसून चौकशी करत आहेत. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, कमल किशोर यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे. अंधेरी पश्चिम येथे राहत्या घरातील इमारतीच्या पार्किंग परिसरातील थरारक सीसीटीव्ही (Kamal Kishor Mishra CCTV) समोर आलं होतं. या सीसीटीव्ही व्हिडीओमध्ये कमल किशोर हे बायकोला कारने चिरडत असल्याची धक्कादायक घटना कैद झाली होती.
19 ऑक्टोबर रोजी ही घटना घडली होती. कमल किशोर यांच्या पत्नीने त्यांना एका महिलेसोबत गाडीत पाहिलं होतं. त्यामुळे त्यांनी कमल किशोर यांना अडवून जाब विचारण्याचा प्रयत्न केला होता.
पाहा सीसीटीव्ही व्हिडीओ :
Film producer Kamal Kishor Mishra has been accused of ramming his wife with his car.#Bollywood #filmproducer @CPMumbaiPolice @CMOMaharashtra pic.twitter.com/sg6ospErKT
— sunny pawan (@SunnySunnypawan) October 27, 2022
दरम्यान, यावेळी कमल किशोर यांनी बायकोच्या विरोध झुगारुन निघून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी बायकोनं त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र कमल किशोर यांनी बायकोच्या अंगावरुनच गाडी नेल्याचं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालं होतं.
बॉलिवूडमधील सिनेनिर्माता आणि फिल्ममेकर म्हणून कमल किशोर मिश्रा प्रसिद्ध आहेत. त्यांचं नाव सध्या या कारणामुळे चर्चेत आलं आहे. आंबोली पोलीस स्थानकात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता चौकशीसाठी त्यांना ताब्यात घेण्यात आलंय.
पोलिसांच्या चौकशीला कमल किशोर मिश्रा नेमकी काय उत्तर देतात, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. हायप्रोफाईल प्रकरण मुंबई पोलीस कशा पद्धतीने हाताळतात, हे पाहणं महत्त्वाचंय. दरम्यान, निष्काळजीपणे वाहन चालवणं आणि एखाद्याच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी कमल किशोर मिश्रा यांच्यावर बुधवारी गुन्हा नोंदवण्यात आला होता.
कमल किशोर मिश्रा यांनी कारने चिरडल्यामुळे त्यांच्या बायकोला गंभीर जखम झाली होती. त्यांच्या हातापायासह त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला होता. आता याप्रकरणी पुढे नेमका काय खुलासा होता, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.