Udaipur Murder Update : कन्हैयालाल हत्याकांडाच्या समर्थनार्थ अल्पवयीन मुलीची पोस्ट, काश्मीरमधून जीवे मारण्याची धमकी

स्थानिक बडगाम पोलिसांच्या मदतीने त्याला 9 जुलै रोजी रात्री बडगाम जिल्ह्यातून आरोपीला अटक करून रविवारी संध्याकाळी मुंबईत आणण्यात आले. झोनल डीसीपी नीलोत्पल यांच्या नेतृत्वाखाली व्हीपी मार्ग पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Udaipur Murder Update : कन्हैयालाल हत्याकांडाच्या समर्थनार्थ अल्पवयीन मुलीची पोस्ट, काश्मीरमधून जीवे मारण्याची धमकी
कन्हैयालाल हत्याकांडाच्या समर्थनार्थ अल्पवयीन मुलीची पोस्ट
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 6:28 PM

मुंबई : उदयपूरमधील कन्हैयालाल हत्या (Kanhaiyalal Murder) प्रकरणी मत व्यक्त केल्याप्रकरणी मुंबईतील 15 वर्षीय तरुणीला धमकी (Threat) देणाऱ्या आरोपीला जम्मू-काश्मीरमधून अटक (Arrest) केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेने जुलैच्या पहिल्या आठवड्यात तिच्या इंस्टाग्रामवर उदयपूरमधील कन्हैयालालच्या हत्येप्रकरणी तिचे मत व्यक्त केले होते. या प्रकरणाशी संबंधित एक व्हिडिओही तरुणीने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. यानंतर काही वेळातच पीडितेला काही अनोळखी नंबरवरून जीवे मारण्याची धमकी आणि लैंगिक छळाची धमकी देणारे कॉल आणि मेसेज आले. याबाबात पीडित मुलीने व्हीपी मार्ग पोलीस ठाणे गाठत तक्रार दाखल केली.

धमकी प्रकरणी श्रीनगरमधून अटक

तांत्रिक विश्लेषण आणि इतर तपशिलांच्या आधारे, पीडित मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी श्रीनगरमधून एका आरोपीला अटक केली. फयाज मोहम्मद भट (30) असे आरोपीचे नाव आहे. स्थानिक बडगाम पोलिसांच्या मदतीने त्याला 9 जुलै रोजी रात्री बडगाम जिल्ह्यातून आरोपीला अटक करून रविवारी संध्याकाळी मुंबईत आणण्यात आले. झोनल डीसीपी नीलोत्पल यांच्या नेतृत्वाखाली व्हीपी मार्ग पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

आरोपींना तीन दिवसांची कोठडी

आरोपीविरुद्ध आयपीसी आणि आयटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला सोमवारी स्थानिक न्यायालयात हजर केले असता आरोपीला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. उदयपूरमधील टेलर कन्हैयालाल यांची 28 जून रोजी हत्या करण्यात आली होती. कन्हैयालालने सोशल मीडियावर नुपूर शर्माचे समर्थन करणारी पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर दुकानात त्यांची हत्या करण्यात आली होती. (Kanhaiyalal threatens to kill a minor girl who posted in support of the murder)

हे सुद्धा वाचा

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.