Instagram वर मैत्री करत अश्लील फोटो Viral करण्याची धमकी, 13 वर्षांच्या मुलीवर 10 जणांचा बलात्कार!

Karjat Crime: एका तेरा वर्षांच्या मुलीवर तब्बल दहा जणांनी बलात्कार केला. या घटनेनं एकच संताप व्यक्त केला जातोय. धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्रातच ही घटना घडलीय.

Instagram वर मैत्री करत अश्लील फोटो Viral करण्याची धमकी, 13 वर्षांच्या मुलीवर 10 जणांचा बलात्कार!
इन्स्टाग्रामवर मैत्री करण अल्पवयीनं तरुणीवर बलात्कारImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 20, 2022 | 8:38 AM

देशातील मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एका तेरा वर्षांच्या मुलीवर तब्बल दहा जणांनी बलात्कार (Raped on minor girl) केला. या घटनेनं एकच संताप व्यक्त केला जातोय. धक्कादायक बाब म्हणजे महाराष्ट्रातच (Maharashtra Crime) ही घटना घडलीय. महाराष्ट्रातील कर्जत तालुक्यात ही घटना घडली. या खळबळजनक घटनेनंतर पोलिसांनी सर्व संशयित आरोपींना अटक केली असून गुन्हाही दाखल केला आहे. बलात्काराची घटनेआधी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर (Instagram) पीडित मुलीसोबत मैत्री करण्यात आली होती. त्यानंतर या मुलीचे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी आरोपींनी या पीडितेला दिली आणि या त्यानंतर मुलीसोबत संपातजनक कृत्य केलाचा प्रकार उघडकीस आला. ही संतापजनक घटना कर्जत तालुक्यातील गौरकामत गावात घडली आहे. या घटनेनं संपूर्ण गावही हादरुन गेलंय. सध्या पोलिसांनी संशयितांना अटक केली असून त्यांना सात दिवसांची पोलीस कोठी सुनावण्यात आली आहे.

13 वर्षीय मुलीसोबत गैरकृत्य

कर्जत तालुक्यातील गौरकामत गावामध्ये एक 13 वर्षांची मुलगी राहते. या मुलीचं इन्स्टाग्रामवर अकाऊंट होतं. तिच्यासोबत शिक्षण घेणाऱ्या शाळेतील मुलांनी मैत्री केली. इन्स्टाग्रावर मैत्री केली. त्यानंतर काही तरुणांनी या मुलीसोबत लज्जास्पद कृत्य केलंय.

इन्स्टाग्रामवर मैत्री केल्यानंतर काही तरुणांनी पीडित मुलीला कपडे काढून दाखवायला लावले. त्यानंतर इन्स्टाग्राम अकांऊटंच्या स्क्रीनवर येणाऱ्या मुलीच्या फोटोंगं रॅकॉर्डिंग केलं. हे रेकॉर्डिंग इतरांमध्ये व्हायरल करण्यात आलं. गौरकामत गावातील आठ जण आणि शिरसे, जंभिवली गावातील प्रत्येक एक, असा एकूण दहा जणांना पोलिसांनी याप्रकरणी ताब्यात घेतलं. त्यानंतर अटक करुन कोर्टातही हजर करण्यात आलं. यानंतर कोर्टानं या सर्वांना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आङे.

धमकावत बलात्कार…

अटक करण्यात आलेल्या तरुणांनी या मुलीला तुझे अश्लील फोटो व्हायरल करु अशी धमकी देत, तिचं लैगिंक शोषण केलं. लैंगिक अत्याचार झालेल्या या मुलीनं अखेर हा सगळा प्रकार पोलिसात जाऊन सांगितला. लैंगिक अत्याचारानं असह्य झालेल्या पीडित मुलीची तक्रार घेतल्यानंतर पोलिसांनीही तातडीनं पावलं उचलली. काही जणांना तत्काळ ताब्यात घेण्यात आलं. या संपूर्ण प्रकरणी पोलिसांनी पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करुन घेतला असून आता अधिक तपास केला जातो आहे. दरम्यान, या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित केला जातोय.

संबंधित बातम्या :

मानवतेला काळीमा फासणारी घटना, 9 महिन्यांपासून 14 वर्षीय लेकीवर वारंवार बलात्कार, नराधम बापाला बेड्या

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार, नंतर तेलंगाणामध्ये फरार, मोबाईल लोकेशन ट्रेस होताच बेड्या

Nanded Rape | चॉकलेटच्या आमिषाने पाच वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, 60 वर्षांच्या नराधमाला बेड्या

देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.