Kurla Building Collapse : कुर्लामध्ये 4 मजली इमारत कोसळली! 14 जणांना वाचवण्यात यश, एकाचा मृत्यू…
Building collapse in Mumbai Kurla : इमारत दुर्घटनेनंतर 15-18 जणांना वाचवण्यात आलंय.
मुंबई : मुंबईतील (Mumbai Building Collapse) कुर्ला पूर्व येथील शिवसूष्टी रोड या ठिकाणी एक चार मजली इमारत कोसळली. नेहरु नगर (Kurla Nehru Nagar) इथं असलेली ही एक चार मजली इमारत सोमवारी रात्री उशिरा कोसळली. इमारत कोसळून अनेकजण खाली दबले गेले होते. या इमारतीमध्ये 20-25 जण राहत असल्याची माहिती मिळतेय. त्यापैकी 15-18 जणांना वाचवण्यात आलंय. तर या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. अजूनही सात लोक दबले गेले असण्याची भीती व्यक्त केली जातेय. सध्या या ठिकाणी बचावकार्य केलं जात आहेत. ही इमारत जुनी असल्याची माहिती मिळतेय. महानगरपालिकेतर्फे ही इमारत खाली करण्याची नोटीस दिली गेली होती. तरिही काही कुटुंब याठिकाणी राहत होती. दरम्यान, आता घटनास्थळी अग्निशमन दलाकडून बचावकार्य (Kurla Building Collapse Rescue Operation) केलं जातंय. जेसीबीच्या मदतीने इमारतीचा कोसळलेला मलबा हटवून खाली अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आलं.
लोकं झोपेत असताना पत्त्यासारखी कोसळली इमारत
सोमवारी मध्यरात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारत ही घटना घडली. ही धोकादायक इमारत होती. तरिही या इमारतीत कुटुंब वास्तव्य करत होती. या इमारतीत राहत असलेली लोकं सोमवारी रात्री झोपेत असताना ही इमारत पत्त्यासारखी कोसळली. त्यामुळे कुणालाच जीव वाचवण्यासाठीची संधीही मिळू शकली नाही.
कुर्ला इमारत दुर्घटनेत किरकोळ जखमी झालेल्यांची नावं आणि वय
- चैत बसपाल 36 वर्षे
- संतोषकुमार गौड 25 वर्षे
- सुदेश गौड 24 वर्षे
- रामराज रहानी 40 वर्षे
- संजय माझी 35 वर्षे
- आदित्य खुशावह 19 वर्षे
- अबिद अन्सारी 26 वर्षे
- गोविंद भारती 32 वर्षे
- मुकेश मोर्या 25 वर्षे
- मनिष यादव 20 वर्षे
पाहा व्हिडीओ :
A 4-storey building has just collapsed in Kurla, Mumbai.
As per reports, 7 people have been rescued; 20 to 25 are believed to be trapped under the debris. Rescue operations are on. Hope & prayers for their survival. Sadly, Life has no value in Mumbai!! pic.twitter.com/Lhp2mHgdb4
— Priti Gandhi – प्रीति गांधी (@MrsGandhi) June 27, 2022
अनेकजण मलब्याखाली अडकले!
या दुर्घनटनेत अनेकजण मलब्याखाली अडकलेय. इमारत कोसळल्याचा आवाज झाल्यानं आजूबाजूला एकच गोंधळ उडाला होती. याबाबतची माहिती तातडीने स्थानिक प्रशासनाला आणि अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी बचावकार्यास सुरुवात केली. सकाळी 6 वाजेपर्यंत एकूण 14 लोकांना वाचवण्यात यश आलं होतं. तर अजूनही 7 लोकं अडकले असण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. इमारत दुर्घटनेनंतर आठ तास उलटून गेले, तरिही याठिकाणी अग्निशमन दलाच्या जवानांकडून बचावकार्य केलं जातंय. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत अनेकजण जखमी झालेत.
15 ते 18 लोकांपैकी काहींना किरकोळ जखमा झाल्या आहेत, तर काही जण अगदी बालंबाल बचावलेत. काहींना खरचटलं असून गंभीर स्वरुपाच्या जखमा झाल्या आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयातही पाठवण्यात आलं असून अजूनही बचावकार्य केलं जातंय.