लज्जास्पद! 75 वर्षीय महिलेचा रुग्णालयात विनयभंग, डोंबिवलीत वॉर्डबॉयला अटक

डोंबिवली पूर्वेतील नामांकित स्पर्श हॉस्पिटलमध्ये एक महिला उपचारासाठी दाखल झाली होती. उपचारादरम्यान या 75 वर्षीय वयोवृद्ध महिलेसोबत गैरवर्तन करण्यात आले.

लज्जास्पद! 75 वर्षीय महिलेचा रुग्णालयात विनयभंग, डोंबिवलीत वॉर्डबॉयला अटक
डोंबिवलीत वृद्ध महिलेचा विनयभंग
Follow us
| Updated on: Feb 22, 2022 | 1:59 PM

डोंबिवली : 75 वर्षीय महिलेचा विनयभंग (Molestation) करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना वॉर्डबॉयने (Ward Boy) तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली शहरात (Dombivli Crime) हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे. वृद्धेचा विनयभंग केल्या प्रकरणी आरोपी वॉर्डबॉयला रामनगर पोलिसांनी अटक केली आहे. कानादास वैष्णव असे या वॉर्डबॉयचे नाव आहे. डोंबिवलीतील स्पर्श हॉस्पिटलमध्ये हा धक्कादायक प्रकार घडल्याने एकच खळबळ माजली आहे.

डोंबिवलीत लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटना

डोंबिवलीत शहराची ओळख सुसंस्कृत-सुशिक्षित शहर अशी आहे. मात्र या शहरात गेल्या काही महिन्यांपासून लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर 33 नराधमांनी लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेने देशात एकच खळबळ माजली होती. आता एक असा प्रकार समोर आला आहे जो माणुसकीला काळीमा फासणारा आहे.

75 वर्षीय वयोवृद्ध महिलेसोबत गैरवर्तन

डोंबिवली पूर्वेतील नामांकित स्पर्श हॉस्पिटलमध्ये एक महिला उपचारासाठी दाखल झाली होती. उपचारादरम्यान या 75 वर्षीय वयोवृद्ध महिलेसोबत गैरवर्तन करण्यात आले. 16 ते 19 फेब्रुवारी या दरम्यान या महिलेचा दोनदा विनयभंग करण्यात आल्याचा आरोप आहे.

एक्स-रे काढताना विनयभंग

विनयभंग करणारा दुसरा कोणी नसून हॉस्पिटलमधील वॉर्डबॉय होता. ही वयोवृद्ध महिला एक्स-रे करण्यासाठी रूममध्ये गेली असता तेथील वॉर्डबॉयने महिलेसोबत हा प्रकार केला. एकदा हा प्रकार घडल्याने महिला वाटले की चुकून हा प्रकार झाला असेल मात्र या नराधम वॉर्डबॉयने दुसऱ्यांदा असाच प्रकार केला.

पीडित महिलेने ही बाब तिच्या मुलीला सांगितली. उपचारानंतर पीडित महिलेच्या मुलीच्या तक्रारीवरुन रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिकारी केशव हसगूले यांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.

आपल्या आजीसारख्या असलेल्या एका महिलेसोबत असा घृणास्पद प्रकार करणाऱ्या कानादास वैष्णवला रामनगर पोलिसांनी अटक करून पुढील तपास सुरू केला आहे. मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

संबंधित बातम्या :

VIDEO | छेड काढणाऱ्या तरुणाला महिलेसह रिक्षाचालकाचा चोप, व्हायरल व्हिडीओवरुन संताप

पतीपासून विभक्त महिलेचे मित्रासोबत खासगी फोटो व्हायरल, शिवसेना पदाधिकाऱ्यांवर गुन्हा

‘आब्या’मुळे आत्महत्या करतेय, छेडछाडीला कंटाळून पुण्यात नववीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.