Dombivli Murder | अखेरपर्यंत मैत्री निभावली, सुप्रिया शिंदे खून प्रकरण, मैत्रिणींमुळे आरोपीचा सुगावा

“सुप्रिया शिंदे (Supriya Shinde) यांचा मृतदेह सोफा सेटमध्ये सापडल्यानंतर दुसरा क्ल्यू शेजाऱ्याकडून मिळाला. आरोपी विशाल घावटची चप्पल आणि त्याच्यासोबत झालेल्या संभाषणाची माहिती त्यांनी दिली” असं पोलिसांनी सांगितलं.

Dombivli Murder | अखेरपर्यंत मैत्री निभावली, सुप्रिया शिंदे खून प्रकरण, मैत्रिणींमुळे आरोपीचा सुगावा
डोंबिवलीतील सुप्रिया शिंदे हत्येचे गूढ उकलले
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 9:20 AM

डोंबिवली : डोंबिवलीतील दावडी परिसरात राहत्या घरातील सोफा-कम-बेडमध्ये (sofa-cum-bed) मृतदेह आढळलेल्या विवाहितेच्या हत्या प्रकरणाचे गूढ अवघ्या काही तासांत उकलले. मात्र 33 वर्षीय सुप्रिया शिंदे (Supriya Shinde) यांच्या खुनाचा गुंता सोडवण्यात त्यांच्या चार जवळच्या मित्र-मैत्रिणींचा मोलाचा वाटा ठरला. शिवशक्ती नगर भागातील ओम रेसिडेन्सी इमारतीमध्ये शिंदे कुटुंबाच्या घरात अनेक गोष्टी संशयास्पद असल्याचं त्यांना आढळलं होतं. अगदी सोफा-कम-बेडपासून पाण्याच्या ड्रमपर्यंत. पती किशोर शिंदे आणि मुलासह सुप्रिया शिंदे चार वर्षांपूर्वी ओम रेसिडेन्सीत राहायला आल्या होत्या. सातारा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावातील असलेल्या अनेक रहिवाशांसोबत त्यांची मैत्री झाली. सुप्रियांच्या हत्येची उकल करण्यात या मैत्रीने महत्त्वाची भूमिका बजावली.

मैत्रिणीने काय सांगितलं?

“जेव्हा सुप्रियाने दार उघडले नाही किंवा फोन कॉलला उत्तर दिले नाही, तेव्हा मी माझ्याकडे असलेल्या चावीने संध्याकाळी 5.30 वाजता दरवाजा उघडला. घरी कोणीच नव्हते, पण मला काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. बेडशीटला सुरकुत्या पडल्या होत्या आणि तिच्या केसांची क्लिप पडद्याला चिकटलेली होती. त्यांच्या घरातील पाण्याचा ड्रमही नेहमीच्या जागेपासून दूर होता” असं सुप्रिया शिंदे यांच्या एका मैत्रिणीने सांगितलं. मिड-डे वेबसाईटने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

मैत्रिणीने तिच्या इतर तिघी मैत्रिणींसह सुप्रिया शिंदे यांचा शोध सुरू केला. “ती आजारी असल्यानं डॉक्टरकडे गेली असेल, असा विचार करून आम्ही जवळपासच्या सर्व दवाखान्यात आणि हॉस्पिटलमध्ये गेलो. शेजारी राहणार्‍या तिच्या नातेवाईकांशीही संपर्क साधला, पण कोणालाच काही माहिती नव्हती” असे दुसऱ्या मैत्रिणीने सांगितले.

सुप्रियांच्या शेजाऱ्यांपैकी एकाने दुपारी त्याच्या घराबाहेर आरोपी विशाल घावटची चप्पल पाहिली होती. त्यावरुन त्यांनी विशालला विचारलेही होते, मात्र त्याने आपण केवळ 5 मिनिटं तिथे येऊन गेल्याचं सांगितलं.

सोफा सेट, चप्पल आणि पाण्याचा ड्रम

“आम्ही सुप्रिया शिंदे हरवल्याची तक्रार नोंदवत असताना, एका शेजार्‍याने त्यांचे पती किशोर शिंदेंना फोन केला की त्यांच्या राहत्या घरातील सोफा-कम-बेडमध्ये त्यांचा मृतदेह सापडला आहे. त्यांच्या एका मैत्रिणीला तो सोफा हलल्याचं वाटत होतं, आणि तो व्यवस्थित बंद केला नसल्याचं वाटत होतं. म्हणून त्यांनी तो उघडून पाहिला” असं मानपाडा पोलिस स्टेशनच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. “मृतदेह सापडल्यानंतर दुसरा क्ल्यू शेजाऱ्याकडून मिळाला. विशाल घावटची चप्पल आणि त्याच्यासोबत झालेल्या संभाषणाची माहिती त्यांनी दिली” असंही पोलिसांनी सांगितलं.

“आधी चौकशी करताना विशाल घावटने शिंदेंच्या घरात प्रवेश केल्याचे मान्य करण्यास नकार दिला. आपण तिला पुस्तके देण्यासाठी गेलो होतो आणि लगेच तिथून निघून गेलो, असं तो म्हणाला. त्याने सांगितलेले पुस्तक सुप्रिया यांच्या घरी सापडले. पण त्याची उत्तरं सतत बदलत होती, म्हणून आम्ही त्याला पोलिस ठाण्यात आणले.” असंही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं.

हातावर चावल्याचा निशाण

“दुपारी कुठे होता, याचं तो समाधानकारक उत्तर देऊ शकला नाही. तसेच, त्याच्या हातावर एक ताजी जखम होती, जी चावा घेतल्याची खूण दर्शवत होती. चाव्याचा निशाण कसा आला, हे सांगताना तो गोंधळून गेला” मानपाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक शेखर बागडे यांनी सांगितले. “आम्ही त्याची आणखी कसून चौकशी करताच त्याने हत्या केल्याचे कबूल केले.”

“ती बेपत्ता आहे हे ऐकून आम्ही तिच्या फ्लॅटवर गेलो होतो आणि दोन तास त्या सोफ्यावर बसून राहिलो होतो. तिचा मृतदेह आत कोंबला असेल, अशी पुसटशी कल्पनाही मनाला शिवली नाही. गेल्या काही रात्री मी झोपू शकले नाही. मला खूप भीती वाटते.” असं सुप्रियांची एक मैत्रीण म्हणाली.

सुरुवात कुठून झाली?

विशाल घावट त्याच परिसरात राहतो. सुप्रिया तिच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी त्याच्या बिल्डिंगमध्ये जात असे. तिने त्याला पाहिले असले तरी ती त्याच्याशी कधीच बोलली नव्हती. मात्र तिचे पती किशोर यांनी त्याला एक-दोन वेळा चहासाठी घरी आणले होते.

पोलिसांनी सांगितले की, विशालला सुप्रियाचा मनमिळावू स्वभाव हा जवळीकीची खूण वाटली. म्हणून त्याने तिच्याशी ओळख वाढण्याचा प्रयत्न सुरु केला. तिचा नवरा किशोर मुंबईत कामासाठी जातो आणि रात्री उशिरापर्यंत घरी परत येत नाही हे त्याला माहीत होते.

पुस्तकं देण्याचा बहाणा

शिंदे दाम्पत्याकडे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा आहे आणि त्यांच्याबद्दल वाचायला आवडते, असे विशालला समजले होते. म्हणून तो काही पुस्तकं घेऊन सोमवारी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास तो त्यांच्या घरी गेला, परंतु त्यांचा मुलगा तिथे होता. “विशालला समजलं की त्यांचा मुलगा दुपारी 12.30 वाजता शाळेत जातो, म्हणून तो मंगळवारी, 15 फेब्रुवारी रोजी दुपारी 1.30 वाजता पुस्तकं घेऊन परत गेला. सुप्रियांनी विशालला आत बोलावलं, त्याला बसायला सांगितलं. ती पुस्तके ठेवण्यासाठी मागे फिरताच त्याने सुप्रियांवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला” असे सहाय्यक पोलीस निरीक्षक अविनाश वनवे यांनी सांगितले.

“सुप्रिया शिंदेंनी सर्व शक्तीनिशी त्याचा प्रतिकार केला, मात्र तो तोकडा पडला. मदतीसाठी किंचाळण्याआधीच विशालने आपल्या हाताने त्यांचे तोंड झाकले. त्यांनी विशालच्या हाताचा चावा घेतला, पण त्याने हार मानली नाही. त्याने सुप्रियांचे डोके जमिनीवर आपटले. त्या अर्धवट बेशुद्ध अवस्थेत असताना त्याने त्यांच्या गळ्याला दोन टायने आवळून त्यांची हत्या केली” असं वनवे पुढे म्हणाले.

विशालने त्यांचा मृतदेह फेकण्यासाठी आधी प्लास्टिकच्या ड्रमचा अंदाज घेतला, परंतु शेवटी तो सोफा-कम-बेडच्या आत कोंबला. त्यानंतर जमिनीवर सांडलेलं रक्त साफ करुन त्यांचा मोबाईल घेऊन तो पळून गेला. मात्र शेजाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याने तो जाळ्यात सापडला.

संबंधित बातम्या :

Dombivli Murder | अतिप्रसंगाला विरोध केल्याने विवाहितेची हत्या, सोफा सेट मर्डर केस सॉल्व्ह, केवळ चपलांवरुन आरोपी जाळ्यात

बेपत्ता मुलीच्या चिंतेने ज्या बेडवर घालवली रात्र, त्यातच सापडला होता डोंबिवलीच्या स्नेहलचा मृतदेह

सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.