Dombivli Murder | अतिप्रसंगाला विरोध केल्याने विवाहितेची हत्या, सोफा सेट मर्डर केस सॉल्व्ह, केवळ चपलांवरुन आरोपी जाळ्यात

शेजारच्या इमारतीत राहणाऱ्या तरुणाने सुप्रिया शिंदे (Supriya Shinde) यांच्यासोबत अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, यावेळी यांनी प्रतिकार केल्यामुळे विशालने फरशीवर डोकं आपटून आणि नंतर टायने गळा आवळून सुप्रिया यांची निर्घृण हत्या (Dombivali Murder) केल्याचा आरोप आहे.

Dombivli Murder | अतिप्रसंगाला विरोध केल्याने विवाहितेची हत्या, सोफा सेट मर्डर केस सॉल्व्ह, केवळ चपलांवरुन आरोपी जाळ्यात
डोंबिवलीतील सुप्रिया शिंदे हत्येचे गूढ उकलले
Follow us
| Updated on: Feb 18, 2022 | 2:24 PM

डोंबिवली : डोंबिवलीतील दावडी परिसरात राहत्या घरातील सोफा-कम-बेडमध्ये (sofa-cum-bed) मृतदेह आढळलेल्या विवाहितेच्या हत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर येत आहे. 33 वर्षीय सुप्रिया शिंदे (Supriya Shinde) या विवाहित महिलेची गळा आवळून हत्या झाल्याचे स्पष्ट झाले होते. पुस्तक देण्याच्या बहाण्याने शेजारील इमारतीत राहणारा विशाल घावट शिंदेंच्या घरात शिरला. अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला असता सुप्रिया यांनी प्रतिकार केला. यामुळे विशालने सुप्रिया यांची निर्घृण हत्या (Dombivali Murder) केल्याचा आरोप आहे. मानपाडा पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरु केला होता, मात्र काहीच सुगावा नसल्याने आरोपी शोधण्याचं आवाहन पोलिसांसमोर उभं ठाकलं होतं. हत्या झाली त्या वेळी सुप्रिया यांच्या घराबाहेर चपला असल्याची माहिती तपासा दरम्यान साक्षीदारांनी पोलिसांना दिली होती. पोलिसांनी ही चप्पल कुणाची, हे शोधून काढत आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

काय आहे प्रकरण?

डोंबिवली पूर्व भागातील दावडी येथील शिवशक्ती नगर परिसरात ओम रेसिडेन्सी इमारतीमध्ये किशोर शिंदे त्यांची पत्नी सुप्रिया शिंदे आणि दहा वर्षांच्या मुलासह राहत होते. 15 फेब्रुवारी रोजी किशोर शिंदे नेहमीप्रमाणे सकाळी कामावर गेले, तर त्यांचा मुलगा शाळेला गेला होता. किशोर सायंकाळी घरी परतले तेव्हा यांची पत्नी सुप्रिया घरी नव्हती. त्यांनी तिचा शोध घेतला नातेवाईकांकडे विचारपूस केली, मात्र ती कुठेही आढळून आली नाही. अखेर रात्रीच्या सुमारास किशोर हे पत्नी हरवल्याची तक्रार देण्यासाठी मानपाडा पोलिस ठाण्यात गेले.

याचवेळी घरी असलेल्या नातेवाईकांना सुप्रिया यांचा मृतदेह घरातील सोफा सेटमध्ये आढळून आला. त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मानपाडा पोलिसांनी एसीपी डी मोरे आणि सीनियर पी आय शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरु केला.

चपलांवरुन आरोपी सापडला

सुप्रिया शिंदे यांची गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र कोणताही सुगावा नसल्याने हत्या का आणि कुणी केली, हे समजत नव्हते. आरोपीला शोधण्याचे आवाहन पोलिसांसमोर उभे ठाकले होते. तपासादरम्यान काही साक्षीदारांनी घराच्या बाहेर काही चपला आढळल्याचं पोलिसांना सांगितलं. हाच धागा पकडून पोलिसांनी त्या चपला कुणाच्या याचा शोध सुरू केला. विविध चपलांचे फोटो साक्षीदारांना दाखवत चप्पल कोणती, हे निष्पन्न केलं. अखेर शिंदे यांच्या शेजारच्या इमारतीत राहणाऱ्या विशाल घावट याची चप्पल असल्याचे स्पष्ट झाले.

पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं. पोलीस खाक्या दाखवताच त्याने केलेल्या कृत्याची कबुली दिली. 15 फेब्रुवारी रोजी दुपारी सुप्रिया यांचा मुलगा शाळेत गेला होता, तर पती कामावर निघून गेले होते. सुप्रिया यांना वाचनाची आवड असल्याने विशाल पुस्तक देण्याच्या बहाण्याने त्याच्या घरी गेला.

अतिप्रसंगाला विरोध केल्याने डोकं आपटलं

सुप्रिया घरी एकटीच असल्याचा फायदा घेत त्याने त्यांच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र सुप्रिया यांनी त्याला प्रतिकार केला, यावेळी विशालने सुप्रियांचे डोके फरशीवर आपटले. त्यानंतर टायने गळा आवळून त्यांना जिवे ठार मारले. त्याचा मृतदेह त्याच्या घरातील सोफासेटमध्ये लपवून ठेवला.

धक्कादायक म्हणजे सुप्रिया घरी नसल्याने किशोर हे मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यास गेले, त्या वेळेला विशाल हा देखील त्यांच्यासोबत गेला होता. या प्रकरणात काहीही पुरावा नसताना फक्त चपलेवरुन हा गुन्हा आणि आरोपी शोधण्यात मानपाडा पोलिसांना यश आले या इमारतीतील आणि आजूबाजूच्या कोणत्याही इमारतीमध्ये सीसीटीव्ही नसल्याने पोलिसांनी नागरिकांना सीसीटीव्ही बसवण्याचे देखील आवाहन केलं आहे.

संबंधित बातम्या :

Dombivli Murder | सोफासेटमधील मृतदेहाचे गूढ उकलण्याच्या मार्गावर, संशयित आरोपी विवाहितेचा मित्र?

चक्क सोफासेटमध्ये डेडबॉडी! गळा आवळून सुप्रियाची कुणी केली हत्या? डोंबिवलीत खळबळ

बेपत्ता मुलीच्या चिंतेने ज्या बेडवर घालवली रात्र, त्यातच सापडला होता डोंबिवलीच्या स्नेहलचा मृतदेह

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.