मुंबईत 27 वर्षीय गायिकेला stalk, लग्नाचीही मागणी, आयटी इंजिनिअरला अटक
गायिकेची मैफिल असणाऱ्या विविध राज्यांतील कार्यक्रमांना किंवा तिच्या ऑफिसला जाऊन विजयकांत संबंधित गायिका आणि तिच्या महिला मॅनेजरला त्रास देत असल्याचा आरोप आहे
मुंबई : 27 वर्षीय गायिकेला (Mumbai singer) त्रास देणाऱ्या 34 वर्षीय तरुणाला मुंबईतून अटक करण्यात आली आहे. मूळ तामिळनाडूतील विशाखापट्टणमचा रहिवासी असलेला आरोपी आयटी इंजिनिअर (IT engineer) म्हणून कार्यरत आहे. गायिकेवर पाळत ठेवणे (stalking), तिची बदनामी करणे, तिला आक्षेपार्ह फोटो आणि मेसेज पाठवणे या आरोपांखाली मुंबई पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली. आरोपी विजयकांत मांडा हा गायिका आणि तिच्या मॅनेजरला 2016 पासून छळत असल्याचं समोर आलं आहे.
काय आहे प्रकरण?
गायिकेची मैफिल असणाऱ्या विविध राज्यांतील कार्यक्रमांना किंवा तिच्या ऑफिसला जाऊन विजयकांत संबंधित गायिका आणि तिच्या महिला मॅनेजरला त्रास देत असल्याचा आरोप आहे. दक्षिण मुंबईत असलेल्या गायिकेच्या घराच्या इमारतीच्या गेटवर येऊन तो थांबला होता. त्यानंतर 17 मार्चला मॅनेजरच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला. इंडियन एक्स्प्रेसने यासंदर्भात वृत्त दिलं आहे.
2018 मध्ये गायिकेने आयोजित केलेल्या एका स्पर्धेमध्ये आरोपी सहभागी झाला होता. त्यानंतर तो मुंबईतील ऑफिसला आला. त्यामुळे तक्रारदार मॅनेजरने तिचा नंबर त्याला दिला होता, असं 28 वर्षीय मॅनेजरने पोलिसांना दिलेल्या जबाबात सांगितलं.
2019 मध्ये आरोपी विजयकांत मुंबई, चेन्नई, बंगळुरु, हैदराबाद अशा विविध शहरात आयोजित गायिकेच्या कॉन्सर्टना हजेरी लावत असे. चार वेगवेगळ्या नंबरवरुन मेसेज करुन तो गायिकेला त्रास देत असल्याचा दावा केला जातो.
गायिकेला भेटायचं आहे, असं सांगून तो मला सारखा फोन करायचा, पण ती व्यस्त असल्याचं सांगून मी टाळायचे, असं मॅनेजरने तक्रारीत म्हटलं आहे.
गायिकेला लग्नाची मागणी
विजयकांत एकदा आपल्या आईला घेऊन तिच्या ऑफिसला आला होता. तिथे त्याने गायिकेला लग्नाची मागणीही घातली. एकदा त्याने दहा कोटी रुपयांच्या कर्जाची मागणी केली. तो आपला चाहता आहे, म्हणून गायिकेने त्याकडे दुर्लक्ष केलं, असं पोलिसांनी सांगितलं. मात्र त्याचा ताप वाढत चालल्याने गायिकेच्या मॅनेजरने त्याची तक्रार करण्याचं ठरवलं.
संबंधित बातम्या :
शिक्षकाकडून अश्लील मेसेज, दारु पार्टीचंही निमंत्रण, विद्यार्थिनींनी शिकवला जन्माचा धडा
चेहरा भोळा, 50 अल्पवयीन मुलींवर ऑनलाईन ‘डोळा’, पोलिसांनी धरला भामट्याचा गळा
शंभरहून अधिक महिलांना आक्षेपार्ह व्हिडीओ पाठवले, 22 वर्षीय जिम ट्रेनरला अटक