WhatsApp वर ब्लॉक केल्याने खट्टू, मुंबईत 20 वर्षीय तरुणीची बॉयफ्रेण्डच्या घरी आत्महत्या

रविवारी रात्री दोघेही कोणाच्या तरी लग्नाला गेले होते, त्यानंतर तरुणीने तिला रात्रभर त्याच्या घरी राहायचे आहे, असा आग्रह धरला. मात्र, त्याने तिची मागणी धुडकावून लावली आणि तिला आपल्या घरी जाण्यास सांगितले

WhatsApp वर ब्लॉक केल्याने खट्टू, मुंबईत 20 वर्षीय तरुणीची बॉयफ्रेण्डच्या घरी आत्महत्या
तरुणीची आत्महत्याImage Credit source: टीव्ही 9
Follow us
| Updated on: May 19, 2022 | 12:32 PM

मुंबई : एका 20 वर्षीय तरुणीने आत्महत्या (Girlfriend Suicide) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रियकराच्या घरी गळफास लावून तिने आयुष्याची अखेर केली. मुंबईतील (Mumbai Crime News) उपनगरी मार्गावर दहिसर येथील रेल्वे रुळांच्या कडेला असलेल्या बॉयफ्रेण्डच्या घरात तिने जीवनयात्रा संपवली. तरुणीशी झालेल्या वादानंतर प्रियकराने तिचा नंबर व्हॉट्सअॅपवर ब्लॉक (WhatsApp) केला होता. या कारणामुळे तिने गळफास लावून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. प्रणाली लोकरे असे मयत तरुणीचे नाव असून ती सोमवारी सकाळी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली होती.

काय आहे प्रकरण?

“मयत तरुणी आणि तिचा 27 वर्षीय प्रियकर गेल्या सहा महिन्यांपासून एकमेकांना ओळखत होते. रविवारी रात्री दोघेही कोणाच्या तरी लग्नाला गेले होते, त्यानंतर तरुणीने तिला रात्रभर त्याच्या घरी राहायचे आहे, असा आग्रह धरला. मात्र, त्याने तिची मागणी धुडकावून लावली आणि तिला आपल्या घरी जाण्यास सांगितले” अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.

हे सुद्धा वाचा

घरी गेल्यानंतरही प्रियकराकडे तगादा

बॉयफ्रेण्डने पिटाळल्यावर ती तिच्या घरी निघून गेली, पण लगेचच ती वारंवार प्रियकराला फोन करु लागली आणि पुन्हा त्याच्या घरी यायचा हट्ट धरु लागली. रात्री लोकलमध्ये अनेक ड्रग अॅडिक्ट फिरत असतात, असं सांगून त्याने तिला गप्प करण्याचा प्रयत्न केला. आणि तिचा नंबर व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केला, असेही पोलिसांनी सांगितले. मात्र, त्यानंतर तरुणीने त्याच्या घरी जाऊन व्हॉट्सअॅपवर ब्लॉक केल्याबद्दल जाब विचारला.

ओढणीने प्रियकराच्या घरीच छताला गळफास

त्यानंतर ती त्याच्या घरीच राहिली, परंतु प्रियकर काही काळासाठी घराबाहेर गेल्याची संधी साधत तिने आपला दुपट्टा वापरून छताला गळफास लावून घेतला. तिचा प्रियकर परतल्यावर तिला गळफास घेतल्याचे पाहून त्याला धक्काच बसला. प्राथमिक माहितीनुसार बोरिवली रेल्वे पोलिस (जीआरपी) स्टेशनने अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, असं पोलिस निरीक्षक अनिल कदम म्हणाले. घटनास्थळी कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही.

ओव्हर-पझेसिव्ह गर्लफ्रेण्ड

“आम्ही मृत तरुणी आणि तिच्या प्रियकराचे मोबाईल फोन जप्त केले आहेत. प्रथमदर्शनी असे दिसते की ती तिच्या प्रियकराबद्दल अत्यंत पझेसिव्ह होती, मात्र तिचा प्रियकर तिच्या आततायीपणावर नाराज होता. त्यांनी लग्न करण्याचा निर्णयही घेतला होता.” असंही पोलिसांनी सांगितलं

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.