BEST Bus Accident | बेस्ट बसची धडक, मुंबईत 29 वर्षीय बाईकस्वाराचा मृत्यू

शनिवारी करण आपल्या बाईकने ऑफिसहून घरी परत येत होता. यावेळी बेस्ट बसने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. बाईकवरुन खाली पडल्यानंतर त्याच्या कानातून रक्त येऊ लागलं

BEST Bus Accident | बेस्ट बसची धडक, मुंबईत 29 वर्षीय बाईकस्वाराचा मृत्यू
बेस्ट बसच्या धडकेत तरुणाचा मृत्यूImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Apr 11, 2022 | 3:21 PM

मुंबई : बेस्ट बसच्या धडकेत (BEST Bus Accident) 29 वर्षीय बाईकस्वार तरुणाला प्राण गमवावे लागले. शनिवारी संध्याकाळी मुंबईतील पूर्व उपनगरात हा दुर्दैवी अपघात झाला. बेस्ट बस चालक बेदरकारपणे गाडी चालवत असल्याचा आरोप केला जात आहे. भरधाव बसच्या धडकेत दुचाकी चालवणाऱ्या तरुणाचा (Bike Rider Death) मृत्यू झाला. निष्काळजी बाळगत बेदरकारपणे बस चालवत इतरांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करत (Mumbai Crime) बेस्ट बस चालकाला अटक करण्यात आली होती. मात्र दिवाणी कोर्टाने त्याला जामीन मंजूर केला. इंडियन एक्स्प्रेसच्या वेबसाईटवर यासंदर्भात बातमी प्रकाशित करण्यात आली आहे.

नेमकं काय घडलं?

मुंबईतील सायन पनवेल रस्त्यावर मानखुर्द भागात अष्टविनायक बिल्डिंगसमोर शनिवारी रात्री 8 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. करण डुंबरे असं मयत 29 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो सँडहर्स्ट रोड परिसरात राहत होता. नवी मुंबईतील कोपर खैरणे परिसरात एका आयटी कंपनीत तो नोकरी करत होता.

ऑफिसहून परत येताना अपघात

शनिवारी करण आपल्या बाईकने ऑफिसहून घरी परत येत होता. यावेळी बेस्ट बसने त्याच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. बाईकवरुन खाली पडल्यानंतर त्याच्या कानातून रक्त येऊ लागलं. एका रिक्षा चालकाने त्याला शताब्दी रुग्णालयात नेलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

व्यवसायाने छायाचित्रकार असलेले करणचे 63 वर्षीय पिता रमेश डुंबरे यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. करणच्या बहिणीने त्याच्या अपघाताची माहिती पोलिसांना दिली होती.

बस चालकावर गुन्हा

ट्रॉम्बे पोलिसात 58 वर्षीय बेस्ट बस चालक वसंत पिसाळ यांच्या विरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. भादंवि कलम 279, 337, 304 आणि मोटार वाहन कायदा 184 अन्वये रॅश आणि निष्काळजीपणे वाहन चालवून इतरांच्या मृत्यूस जबाबदार ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करणच्या पश्चात पत्नी, बहीण आणि आई-वडील असा परिवार आहे.

संबंधित बातम्या :

गावाकडे निघालेल्या मित्रांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक, दोघांचाही जागीच मृत्यू

बघता-बघता टँकर थेट बसमध्ये घुसला, पुणे-यवतमाळ ट्रॅव्हल्सच्या अपघाताची भयंकर सीसीटीव्ही दृश्यं

कारला धडकून लक्झरी बस पलटी, हॉटेलमध्ये घुसून 25 प्रवासी जखमी, पुण्यातील अपघाताची भीषण दृश्यं

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.