बाईक चोरल्याचा संशय, मुंबईत 23 वर्षीय तरुणाची आत्महत्या, पोलिसांनी छळल्याचा कुटुंबाचा आरोप

23 वर्षीय तरुणाने राहत्या घरी आत्महत्या केल्याचा प्रकार मुंबई उपनगरात उघडकीस आला आहे पोलिसांनी राजला चोरीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप पवार कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरु केली आहे.

बाईक चोरल्याचा संशय, मुंबईत 23 वर्षीय तरुणाची आत्महत्या, पोलिसांनी छळल्याचा कुटुंबाचा आरोप
सांकेतिक छायाचित्र Image Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 9:20 AM

मुंबई : बाईक चोरीचा (Bike Theft) संशय असलेल्या 23 वर्षीय तरुणाने राहत्या घरी आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईजवळच्या (Mumbai Crime) दहिसर (पूर्व) भागात बुधवारी हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. राज पवार असं मयत तरुणाचं नाव आहे. पोलिसांच्या छळाला कंटाळून राजने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. 19 फेब्रुवारी राजची बाईक टो केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. इंडियन एक्स्प्रेस वेबसाईटने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

पोलिसांनी राजला चोरीच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोप पवार कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी या घटनेची चौकशी सुरु केली आहे.

काय आहे प्रकरण?

23 वर्षीय तरुणाने राहत्या घरी आत्महत्या केल्याचा प्रकार मुंबई उपनगरात उघडकीस आला आहे. दहिसर पूर्व भागात राहणाऱ्या राज पवार याने बुधवारी आपल्या आयुष्याची अखेर केली. त्याने बाईक चोरल्याचा संशय होता.

पोलिसांवर कुटुंबीयांचा आरोप

पोलिसांच्या त्रासाला कंटाळून राजने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. 19 फेब्रुवारी राजची बाईक वाहतूक पोलिसांनी टो केली होती. यावेळी त्याच्याकडून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याचा दावा त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी राजला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिल्याचा आरोपही त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

संबंधित बातम्या :

तासभर कुठल्या मुलीशी बोलतोयस? बायकोने रागात मोबाईल फोडला, नवऱ्याची आत्महत्या

अपघात झाल्याचा खोटा बहाणा, मित्राच्या घरी पोलिसाची आत्महत्या

पत्नीच्या निधनाची बातमी कळताच सीआरपीएफ जवानाची आत्महत्या

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.