मुंबईत आणखी एका सायको किलरची दहशत, 15 मिनिटात दगडाने ठेचून दोघा जणांची हत्या

मुंबईच्या रस्त्यांवर सायको किलर फिरत होता. शनिवारी भायखळा आणि जे जे मार्ग परिसरात अवघ्या 15 मिनिटात दोघांची हत्या झाली होती. आरोपीने दोन्ही ठिकाणी फुटपाथवर झोपलेल्या दोन व्यक्तीच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक टाकून हत्या केली होती.

मुंबईत आणखी एका सायको किलरची दहशत, 15 मिनिटात दगडाने ठेचून दोघा जणांची हत्या
सायको किलरला अटक
Follow us
| Updated on: Oct 29, 2021 | 8:02 AM

मुंबई : रमण राघव, बियर मॅन यांच्यानंतर मुंबईत आणखी एका सायको किलरची दहशत पाहायला मिळत आहे. अवघ्या 15 मिनिटात दगडाने ठेचून दोघा जणांची हत्या करणाऱ्या सायको किलरला मुंबई पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.

दोघांच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक टाकले

मुंबईच्या रस्त्यांवर सायको किलर फिरत होता. शनिवारी भायखळा आणि जे जे मार्ग परिसरात अवघ्या 15 मिनिटात दोघांची हत्या झाली होती. आरोपीने दोन्ही ठिकाणी फुटपाथवर झोपलेल्या दोन व्यक्तीच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक टाकून हत्या केली होती.

सीसीटीव्हीच्या मदतीने नराधमाला बेड्या

सीसीटीव्हीच्या मदतीने मुंबई पोलिसांनी नराधम आरोपीला शोधून काढलं. धक्कादायक म्हणजे आरोपीच्या चौकशीदरम्यान त्याने या हत्या सहज म्हणून केल्या असल्याचं सांगितलं आहे.

2015 साली कुर्ल्यात हत्या

अटक केलेल्या आरोपीचे नाव सुरेश शंकर गौडा असे आहे. 2015 सालीही त्याने अशाच प्रकारे कुर्ल्यात एक हत्या केल्याचा आरोप आहे. त्यामुळे आरोपी गौडाने अशा अनेक हत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मुंबई पोलीस फूटपाथवर झालेल्या सर्व हत्यांच्या केसेस पडताळून पाहणार आहे.

2015 सालच्या हत्येच्या गुन्ह्यात त्याला अटक झाली होती, मात्र पुराव्याअभावी त्याची 2016 साली सुटका झाली होती. सध्या आरोपी तुरुंगात असून भायखळा पोलीस दुसऱ्या हत्येच्या प्रकरणात त्याचा ताबा घेणार आहेत.

संबंधित बातम्या :

जालन्यात बुलडाणा अर्बन बँकेवर सशस्त्र दरोडा, बंदुकीचा धाक दाखवत भर दिवसा बँक लुटली

फेसबुकवरील मैत्रीला भुलली, गिफ्टच्या नावाखाली 9 लाखांचा गंडा, पुण्यात उच्चशिक्षित तरुणी सायबर गुन्हेगाराच्या जाळ्यात

नागपूरमध्ये महिला चोरांचा सुळसुळाट, ज्वेलर्सच्या दुकानात मोठ्या चालाखीत दागिने लांबविले, सीसीटीव्हीत घटना कैद

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.