आधी 49 वा मजला गाठला, मग 26 व्या मजल्यावर आले, मुंबईत वरिष्ठ बँक अधिकाऱ्याची आत्महत्या

कपूर हे पत्नी आणि दोन लहान मुलांसह 16 व्या मजल्यावर भाड्याने घर घेऊन राहत होते. शुक्रवारी पहाटेच श्लोक कपूर यांनी लहान मुलाला शाळेत सोडले. मग त्यांनी आपण फिरायला जात असल्याचे पत्नीला सांगितले. पण त्याऐवजी ते 49 व्या मजल्यावर गेले.

आधी 49 वा मजला गाठला, मग 26 व्या मजल्यावर आले, मुंबईत वरिष्ठ बँक अधिकाऱ्याची आत्महत्या
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Feb 26, 2022 | 2:55 PM

मुंबई : 42 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या (Suicide) धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुंबईतील परेल भागात शुक्रवारी (Mumbai Crime) हा प्रकार घडला. संबंधित व्यक्ती एका परदेशी बँकेत वरिष्ठ उपाध्यक्ष पदावर (foreign bank senior vice president) कार्यरत होती. टोलेजंग इमारतीच्या 26 व्या मजल्यावरुन उडी घेत त्यांनी आयुष्याची अखेर केली. श्लोक कपूर असे मयत बँक अधिकाऱ्याचे नाव आहे. ते मूळ उत्तराखंडमधील देहरादूनचे रहिवासी होते. मात्र जवळपास दीड वर्षांपासून ते मुंबईत राहत होते. शुक्रवारी सकाळी 10 वाजून 35 मिनिटांच्या सुमारास इमारतीतून उडी घेत त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती आहे. परळमधील अशोक टॉवर या इमारतीतून त्यांनी उडी मारल्याचा आरोप आहे. श्लोक कपूर यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

नेमकं काय घडलं?

कपूर हे पत्नी आणि दोन लहान मुलांसह 16 व्या मजल्यावर भाड्याने घर घेऊन राहत होते. शुक्रवारी पहाटेच श्लोक कपूर यांनी लहान मुलाला शाळेत सोडले. मग त्यांनी आपण फिरायला जात असल्याचे पत्नीला सांगितले. पण त्याऐवजी ते 49 व्या मजल्यावर गेले.

आधी 49 वा मजला गाठला, मग 26 व्या मजल्यावर आले

“श्लोक कपूर आधी 49 व्या मजल्यावरील टेरेसवर गेले पण ते लॉक होते, असे सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसून आले आहे त्यानंतर ते 26 व्या मजल्यावर असलेल्या रेफ्युज एरियात आले” असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. त्यानंतर कपूर यांनी उडी मारुन मृत्यूला कवटाळले.

“भोईवाडा पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांना रुग्णालयात नेले, तिथे त्यांचा मृत्यू झाला.” असे पोलिस उपायुक्त विजय पाटील (झोन IV) म्हणाले

नैराश्याने ग्रासले

संबंधित बँकेच्या बीकेसी कार्यालयात काम करणाऱ्या श्लोक कपूर यांना नैराश्याने ग्रासले होते, असे तपास अधिकाऱ्यांना समजले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून नामवंत डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत होते, असेही पोलिसांनी सांगितले.

डायरीत तीन ओळींची सुसाईड नोट

श्लोक कपूर यांची डायरी पोलिसांनी जप्त केली आहे. डायरीत त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याबद्दल माफी मागितली आहे. त्यांची सुसाईड नोट फक्त तीन ओळींची आहे ज्यामध्ये त्यांनी मला माफ करा असे म्हटले आहे. भोईवाडा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

संबंधित बातम्या :

एकाच दिवशी शिक्षक-शेतकऱ्यासह तिघांची आत्महत्या, माजलगावात खळबळ

“मला त्याच्याकडे जायचंय…” मित्राच्या निधनाचा धक्का पचेना, 28 वर्षांच्या तरुणाची आत्महत्या

कल्याणमधील निलंबित पोलिस कर्मचाऱ्याची ट्रेनखाली आत्महत्या

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.