Aryan Khan | शाहरुखच्या पोराची कोठडी संपणार, पुढे काय काय घडणार?
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबी आर्यन खानच्या कोठडीची मागणी करणार नाहीत, कालच त्यांनी आर्यनची दोन दिवसांची कोठडी मागितली होती, पण किला कोर्टाने ती दिली नाही
मुंबई : अभिनेता शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) मुलगा आर्यन खान (Aryan Khan) याला क्रूझ ड्रग्ज पार्टी (Cruise Drugs Party) प्रकरणात अंमली पदार्थ नियंत्रण कक्षाकडून (NCB) अटक करण्यात आली आहे. आर्यन खान सध्या पोलीस कोठडीत असून त्याला आज जामीन मिळण्याची शकता आहे. कोर्टात आर्यनची बाजू सुप्रसिद्ध वकील सतीश मानेशिंदे (Satish Maneshinde) मांडणार आहेत. मानेशिंदेंनी संजय दत्तपासून रिया चक्रवर्ती पर्यंत अनेक हायप्रोफाईल केसेस लढवल्या आहेत.
एनसीबी अधिक कोठडी मागणार नाही
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो अर्थात एनसीबी आर्यन खानच्या कोठडीची मागणी करणार नाहीत, कालच त्यांनी आर्यनची दोन दिवसांची कोठडी मागितली होती, पण किला कोर्टाने ती दिली नाही. केवळ एका दिवसाची कोठडी दिल्याने आता एनसीबी अधिक कोठडी मागणार नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
सोमवारी आर्यनची न्यायालयीन कोठडी संपणार आहे, त्यापूर्वी त्याचे वकील सतीश मानेशिंदे जामिनासाठी दुपारी दोन वाजता अर्ज करणार असल्याची माहिती आहे. आर्यन खानसह अटक करण्यात आलेल्या अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचा यांनाही एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. तिघांनाही आज (4 ऑक्टोबरपर्यंत) एनसीबीच्या कोठडीत पाठवण्यात आलं आहे.
आर्यनच्या वकिलांचा कोर्टात नेमका युक्तिवाद काय?
“आर्यनकडे बोर्डिंग पासही नव्हता. त्याला त्या पार्टीचं निमंत्रण आलं होतं. तसेच त्याच्याकडे कोणत्याही पद्धतीचं ड्रग्स सापडलं नाही. त्यामुळे दोन दिवसांची कस्टडी न देता एकाच दिवसाची कस्टडी द्यावी”, असा युक्तीवाद वकील सतिश माने-शिंदे यांनी कोर्टात केला. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने तीनही आरोपींना एक दिवसांची कोठडी सुनावली.
पार्टीत कोकेन, एमडी, चरस सारखे ड्रग्स
एनसीबी अधिकाऱ्यांना कोकेन, एमडी, चरस सारखे ड्रग्स पार्टीत मिळाले आहेत. त्यामुळे तपासासाठी दोन दिवसांची कस्टडी एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी मागितली होती. आजच्या चौकशीत नेमकी काय माहिती बाहेर येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तसेच त्याच माहितीच्या आधारे एनसीबी आणखी कोठडी मागण्याची शक्यता आहे. याशिवाय उर्वरित पाच आरोपींनाही उद्या नियमित न्यायालयात हजर केलं जाईल. त्यांचा नेमका रोल काय ते अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
संबंधित बातम्या :
संजय दत्त ते रिया चक्रवर्ती आणि आता शाहरुखच्या पोराची केस लढणारे कोण आहेत सतीश मानशिंदे?
कोण आहे अरबाझ मर्चंट ज्याचं ड्रग्जकांडमध्येही नाव आणि शाहरुखची मुलगीही करते फॉलो?
शाहरुखच्या मानगुटीवर ते वानखेडे ते आताचे हे वानखेडे, का होतोय फोटो व्हायरल?