Price Tag लावून तरुणींचे फोटो शेअर, मुंबईत 22 वर्षांचा विकृत तरुण गजाआड, 200 हून अधिक पीडिता?
आरोपी शुभम गडलिंगेने पैशांच्या मोबदल्या लैंगिक सुख देण्याचे आश्वासन देत फॉलोअर्सना त्यांची छायाचित्रे खाजगीरित्या पाठवली, असे महिलांनी सांगितले. त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे.
मुंबई : सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (Social Media) कॉल गर्ल्स असा उल्लेख करत गेल्या पाच वर्षांपासून आपले फोटो व्हायरल होत असल्याची तक्रार मुंबईतील सात महिलांनी केली होती. त्यानंतर अँटॉप हिल पोलिसांनी 22 वर्षीय तरुणावर गुन्हा दाखल (Mumbai Crime) केला आहे. या कृत्यामागे आपला मित्र शुभम गडलिंगे (वय 22 वर्ष) असल्याचा आरोप तक्रारदार महिलांनी केला आहे. शुभम हा मुंबईतील वडाळा येथील रहिवासी आहे. 200 हून अधिक महिला या प्रकाराला बळी पडल्याचा पोलिसांना संशय आहे. शुभमने महिलांच्या संबंधित सोशल मीडिया अकाऊंटवरुन त्यांचे फोटो आणि व्हिडीओ (Obscene Photo) चोरल्याचा दावा महिलांनी केला आहे. त्यानंतर त्याने इंस्टाग्राम आणि टेलिग्रामवर त्यांची फेक अकाऊण्ट तयार केली, आणि त्यांचे फोटो वेश्या असा उल्लेख करत पोस्ट केले. मिड-डे वेबसाईटने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
काय आहे प्रकरण?
आरोपी शुभम गडलिंगेने पैशांच्या मोबदल्या लैंगिक सुख देण्याचे आश्वासन देत फॉलोअर्सना त्यांची छायाचित्रे खाजगीरित्या पाठवली, असे महिलांनी सांगितले. त्याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी तक्रारदारांनी केली आहे. या प्रकरणातील तक्रारदार महिला या 12 ते 25 वर्ष वयोगटातील आहेत. त्या आरोपीच्या शाळा, कॉलेज, सोसायटी, कौटुंबिक औळख किंवा नातेवाईक आहेत. शुभम हा वाणिज्य शाखेचा पदवीधर आहे. त्याच्या पालकांनी त्याला पुढील शिक्षणासाठी कॅनडाला पाठवायचे ठरवले होते.
तक्रारदार मुलींच्या पालकांची आरोपीला मारहाण
काही वर्षांपूर्वी, शुभम सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींना संबंधित महिलांचे फोटो पाठवताना पकडल्यानंतर तक्रारदारांच्या पालकांनी त्याला मारहाण केली होती. मिड-डेशी बोलताना वडाळ्यातील एका अल्पवयीन मुलीने सांगितले की, “काही दिवसांपूर्वी माझ्या मित्रांनी मला कळवले की कॉल गर्ल म्हणून माझे फोटो इंस्टाग्रामवर व्हायरल झाले आहेत. मला धक्काच बसला. माझा मित्र शुभमच्या या दुष्कृत्यांबद्दल मला माहिती होती, कारण त्याला यापूर्वी अनेक जणींच्या पालकांनी बेदम चोप दिला होता. जेव्हा मी त्याला याबद्दल विचारलं, तेव्हा त्याने आधी नकार दिला, मात्र नंतर त्याने त्याची कबुली दिली. मी लगेचच त्याच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला. नंतर, मला माझ्या अनेक मैत्रिणी याला बळी पडल्याचं समजलं. त्याला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळालीच पाहिजे.” अशा शब्दात पीडितेने संताप व्यक्त केला.
आरोपीवर मानसोपचार, कुटुंबाचा दावा
पोलिसांनी शुभम गडलिंगेविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला गेल्या आठवड्यात अटक केली होती. मात्र, अटकेनंतर एकाच दिवसात त्याची जामिनावर सुटका करण्यात आली. प्रेयसीसोबत नातं तुटल्यानंतर गेल्या तीन ते चार वर्षांपासून त्याचं मनस्वास्थ्य ढासळले असल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याच्यावर उपचार सुरु आहेत, असे त्यांनी सांगितले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक नासीर कुलकर्णी म्हणाले की, “आम्ही आरोपी शुभम गडलिंगे याला अल्पवयीन मुली आणि महिलांचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी अटक केली आहे. आम्ही दोन-तीन मुलींचे जबाब नोंदवले आहेत. आम्हाला शंका आहे की 150-200 पेक्षा जास्त जणी याला बळी पडल्या आहेत. गेल्या आठवड्यात त्याची जामिनावर सुटका झाल्यामुळे आम्हाला त्याची पुरेशी पोलीस कोठडी मिळाली नाही. त्याच्या कुटुंबीयांनी आम्हाला सांगितले की तो नैराश्याने ग्रस्त आहे. आम्ही त्याची वैद्यकीय कागदपत्रे तपासत आहोत.”
संबंधित बातम्या :
नग्न फोटो व्हायरल करेन, नागपुरातील तरुण हनीट्रॅपमध्ये अडकला, वडिलांच्या युक्तीने अशी झाली सुटका
वहिनी आंघोळ करतानाचा व्हिडीओ शूट, ब्लॅकमेल करत पुण्यात दिराकडून बलात्कार
अश्लील व्हिडीओ शूट करुन प्रियकराकडूनच ब्लॅकमेल, अल्पवयीन मुलीवर सहा महिने तिघांचा गँगरेप