Drugs | 1 कोटी 85 लाखांचे दीड किलो ड्रग्ज जप्त, नवी मुंबईत वर्षातील सर्वात मोठी कारवाई
आरोपी समसदिन शेख आणि राजेंद्र ऊर्फ बारकू पवार यांच्याकडून मेथाक्यलॉन नावाच्या एकूण 1 किलो 550 ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ ताब्यात घेण्यात आले आहेत. बाजार भावाप्रमाणे या अंमली पदार्थांची किंमत सुमारे 1 कोटी 85 लाख 27 हजार 100 आहे.
नवी मुंबई : 1 कोटी 85 लाख 27 हजार 100 रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा (Drugs Seized) जप्त करण्यात आला आहे. गुन्हे शाखेने नवी मुंबईत वर्षातील सर्वात मोठी कारवाई असल्याचं मानलं जात आहे. नवी मुंबईच्या (Navi Mumbai Crime) अनैतिक मानवी वाहतूक शाखेने उरण फाटा येथील रेयान इंटरनॅशनल स्कूल समोरील रस्त्यावर ही कारवाई केली. दोन व्यक्ती अवैधरित्या अंमली पदार्थ घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना मुद्देमालासह रंगेहाथ ताब्यात घेण्यात आलं आहे. नवी मुंबईत आयपीएल क्रिकेट (IPL 2022) सामने सुरु आहेत. या धर्तीवर ड्रग्ज पेडलर परिसरात सक्रिय झाले नाहीत ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे.
1 कोटी 85 लाखांचे ड्रग्ज
आरोपी समसदिन शेख आणि राजेंद्र ऊर्फ बारकू पवार यांच्याकडून मेथाक्यलॉन नावाच्या एकूण 1 किलो 550 ग्रॅम वजनाचे अंमली पदार्थ ताब्यात घेण्यात आले आहेत. बाजार भावाप्रमाणे या अंमली पदार्थांची किंमत सुमारे 1 कोटी 85 लाख 27 हजार 100 आहे.
मुद्देमालासह रंगेहाथ ताब्यात
नवी मुंबईच्या अनैतिक मानवी वाहतूक शाखेने उरण फाटा येथील रेयान इंटरनॅशनल स्कूल समोरील रस्त्यावर ही कारवाई केली. समसदिन शेख आणि राजेंद्र ऊर्फ बारकू पवार हे अवैधरित्या अंमली पदार्थ घेऊन जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांना मुद्देमालासह रंगेहाथ ताब्यात घेण्यात आलं.
नवी मुंबईत वर्षातील सर्वात मोठी कारवाई
नवी मुंबईत आयपीएल क्रिकेट सामने सुरु आहेत. याच धर्तीवर मैदानाच्या बाहेर असे अंमली पदार्थ विक्रीला आणले तर नसावेत ना अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र नवी मुंबईतील ही या वर्षातील सर्वात मोठी कारवाई आहे. याबाबत आणखी तपास गुन्हे शाखा करत आहे. नवी मुंबई पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
संबंधित बातम्या :
नागपुरात अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई; दिल्ली पासिंग कारमधून तस्करी, सिटच्या खाली ठेवला गांजा
मूकबधीर तरुणाचा गोदामाला पहारा, महिलांकडून ने-आण, मुंबईत गांजा तस्करीच्या टोळीचा पर्दाफाश
ना डॉक्टरांची चिठ्ठी, ना औषधांची बिलं, औरंगाबादेत नशेच्या गोळ्यांची सर्रास विक्री, एकाला बेड्या