CCTV: टीव्ही घेण्यावरुन वाद, पेट्रोल पंपावर दोघांचा प्राणघातक हल्ला, लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण

पेट्रोल पंपावर दोघा जणांनी एकावर प्राणघातक हल्ला केल्याची भीषण घटना उघडकीस आली आहे. नवी मुंबईतील पनवेल शहरातील सिकापूर पेट्रोल पंपावर हा प्रकार घडला. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

CCTV: टीव्ही घेण्यावरुन वाद, पेट्रोल पंपावर दोघांचा प्राणघातक हल्ला, लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण
पेट्रोल पंपावर हल्ला
Follow us
| Updated on: May 07, 2022 | 4:19 PM

नवी मुंबई : पेट्रोल पंपावर आलेल्या व्यक्तीवर दोघा जणांनी जीवघेणा हल्ला (Attack) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नवी मुंबईतील पनवेल शहरातील (Panvel Crime News) सिकापुर पेट्रोल पंपावर हा प्रकार घडला. या प्रकरणी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. टीव्ही घेण्यावरुन झालेल्या वादावादीतून हा हल्ला झाल्याचा संशय आहे. काठ्या आणि लाथा बुक्क्यांनी पीडिताला जबर मारहाण केल्याचं समोर आलं आहे. पीडित व्यक्तीला पनवेलच्या गांधी रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून उपचार सुरु असल्याची माहिती आहे. ही संपूर्ण घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

पहा व्हिडीओ

काय आहे प्रकरण?

पेट्रोल पंपावर दोघा जणांनी एकावर प्राणघातक हल्ला केल्याची भीषण घटना उघडकीस आली आहे. नवी मुंबईतील पनवेल शहरातील सिकापूर पेट्रोल पंपावर हा प्रकार घडला. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

लाथा बुक्क्यांनी जबर मारहाण

ह्या तिन्ही व्यक्ती पेट्रोल पंपावर पोहचण्या अगोदर टीव्ही घेण्यावरुन त्यांच्यात वाद झाल्याची माहिती आहे. दोघे आरोपी आणि पीडित व्यक्ती हे पेट्रोल पंपावर एकत्र आले, त्यानंतर काठ्या आणि लाथा बुक्क्यांनी दोघांनी पीडिताला जबर मारहाण केल्याचा आरोप आहे.

पीडिताला गंभीर दुखापत

पीडित व्यक्तीला पनवेलच्या गांधी रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून उपचार सुरू आहेत. याबाबत खांदेश्वर पोलीस अधिक तपास करत आहेत. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

धसांच्याकडून कराडच्या मुलांवर गंभीर आरोप, 'घरातूनच 150 फोन जातात कसे?'
धसांच्याकडून कराडच्या मुलांवर गंभीर आरोप, 'घरातूनच 150 फोन जातात कसे?'.
राजेंकडून 'छावा'च्या 'त्या' सीनवर नाराजी, प्रदर्शनाला ग्रीनसिग्नल नाही
राजेंकडून 'छावा'च्या 'त्या' सीनवर नाराजी, प्रदर्शनाला ग्रीनसिग्नल नाही.
सामंतांच्या फुटीच्या दाव्याला बळ?ठाकरेंच्या मेळाव्याला नेत्यांची दांडी
सामंतांच्या फुटीच्या दाव्याला बळ?ठाकरेंच्या मेळाव्याला नेत्यांची दांडी.
रत्नागिरीत उद्धव ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का, 100-200 नाहीतर तब्बल...
रत्नागिरीत उद्धव ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का, 100-200 नाहीतर तब्बल....
'अण्णा, ॐ नमः शिवाय!', पोलीस अधिकारी अन् कराडचं फोनवरील संभाषण व्हायरल
'अण्णा, ॐ नमः शिवाय!', पोलीस अधिकारी अन् कराडचं फोनवरील संभाषण व्हायरल.
योजनेच्या निकषांची ऐसी-तैशी अन् 'लाडकी बहीण' निघाली बांग्लादेशी
योजनेच्या निकषांची ऐसी-तैशी अन् 'लाडकी बहीण' निघाली बांग्लादेशी.
कराड सरेंडर होण्यापूर्वी बीडमध्येच पण कोणाच्या हाती नाही, नव CCTV समोर
कराड सरेंडर होण्यापूर्वी बीडमध्येच पण कोणाच्या हाती नाही, नव CCTV समोर.
'...तर कराडला मारून टाकतील'; तृप्ती देसाईंकडून भिती व्यक्त, उडाली खळबळ
'...तर कराडला मारून टाकतील'; तृप्ती देसाईंकडून भिती व्यक्त, उडाली खळबळ.
परळीतील आतापर्यंतच्या सर्व हत्यांच्या मालिकेवर सुरेश धसांचं बोट
परळीतील आतापर्यंतच्या सर्व हत्यांच्या मालिकेवर सुरेश धसांचं बोट.
'ते आपलंच पोरगं..', पोलीस अधिकाऱ्यासोबत कराडचे फोनवरुन संभाषण व्हायरल
'ते आपलंच पोरगं..', पोलीस अधिकाऱ्यासोबत कराडचे फोनवरुन संभाषण व्हायरल.