Drugs Racket | स्टेथस्कोप, टायमधून ड्रग्जची परदेशी तस्करी, NCB ची मुंबईत छापेमारी, 13 कोटींचा मुद्देमाल जप्त

अंमली पदार्थ तस्करीसाठी तस्करांनी नवी शक्कल लढवली होती. विविध वस्तूंमधून ते ड्रग्ज परदेशात पाठवत होते. डॉक्टरांचा स्टेथस्कोप, मायक्रोवेव्ह अव्हन, हार्ड डिस्क, सायकलिंग हेल्मेट यामधून ड्रग्ज तस्करी होत होती.

Drugs Racket | स्टेथस्कोप, टायमधून ड्रग्जची  परदेशी तस्करी, NCB ची मुंबईत छापेमारी, 13 कोटींचा मुद्देमाल जप्त
प्रातिनिधीक फोटो
Follow us
| Updated on: Dec 15, 2021 | 8:59 AM

मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या (NCB) मुंबई झोनच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवस कारवाई करत ड्रग्ज तस्करीचं रॅकेट उघडकीस आणलं आहे. एनसीबी अधिकाऱ्यांनी ड्रग्ज तस्करीचा (Drugs Smuggling) एक नवा प्रकार उघडकीस आणला असून चक्क कुरिअरच्या माध्यमातून तस्करी सुरु असल्याचे कारवाईत उघडकीस आलं आहे. स्टेथस्कोप ,मायक्रोवेव्ह अव्हन, हार्ड डिस्क, सायकलिंग हेल्मेटमधून अंमली पदार्थांची तस्करी होत असल्याचं समोर आलं आहे. जवळपास आठ ठिकाणी कारवाई करुन सहा गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या अनेक टीमचं गेल्या दोन दिवसांपासून सतत धाड सत्र सुरु होतं. एनसीबीच्या टीमने आठ ठिकाणी धाडी टाकल्या. त्यापैकी सहा प्रकरणात गुन्हे दाखल केले आहेत.

कशाकशातून ड्रग्जची तस्करी?

अंमली पदार्थ तस्करीसाठी तस्करांनी नवी शक्कल लढवली होती. विविध वस्तूंमधून ते ड्रग्ज परदेशात पाठवत होते. डॉक्टरांचा स्टेथस्कोप, मायक्रोवेव्ह अव्हन, हार्ड डिस्क, सायकलिंग हेल्मेट यामधून ड्रग्ज तस्करी होत होती. मुंबई एनसीबीच्या पथकाने ही धडक कारवाई करत सुमारे 13 कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत.

संशय निर्माण होऊ नये, यासाठी स्टेथस्कोपसारख्या वस्तू वापरल्या होत्या. खोटी ओळख बनवून खोटा पत्त्यांवर अंमली पदार्थ हवाई मार्गे पाठवले जात होते. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी परदेशात होणाऱ्या पार्टीसाठी हे अंमली पदार्थ पुरवणाऱ्या या टोळीचा पर्दाफाश एनसीबीने केला आहे.

एनसीबीने मुंबईत एकूण आठ ठिकाणी कारवाई करत अंमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत एका परदेशी नागरिकाला ताब्यात घेतले असून आणखी काही जण या टोळीत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एनसीबीने कारवाईत जप्त केलेली ड्रग्ज

4.9 ग्रॅम मेटाफेटामाईन -डॉक्टर स्टेथस्कोपमध्ये

4 किलो अफीम मायक्रोवेव्ह अव्हनमधून मालदीवला पाठवलं जात होतं

2.5 किलो झोपीडीयम 10 हजार टॅब्लेट खाण्याच्या पदार्थात अमेरिकेत पाठवण्यात येत होत्या

4.95 ग्रॅम एमफेटमाईन – सायकल हेल्मेटमध्ये आणि 4.56 ग्रॅम बांगड्यांमधून ॲास्ट्रेलियाला पाठवण्यात येणार होते

8.48 ग्रॅम मेटाफेटामाईन हॉर्स पाईपमध्ये लपवून दुबईला पाठवलं जाणार होतं, हे डोंगरीमधून जप्त केले आहे

3.9 ग्रॅम एमफेटाईम टाय बॉक्समधून सीएसएमटी येथून जप्त केलं आहे

17 ग्रॅम एमफेटामाईन स्वित्झर्लंडमध्ये पाठवलं जात होतं. कॉम्प्युटर हार्ड डिस्कमधून अंधेरी येथून जप्त करण्यात आलं आहे.

यातील काही अंमली पदार्थ परदेशात निर्बंध असल्याने कोट्यवधी किमतीला विकले जातात आणि त्यासाठी हे पदार्थ छुप्या मार्गाने भारतातून पाठवल जात आहेत.

संबंधित बातम्या :

अनैतिक संबंधातून महिलेकडून प्रियकराचीच हत्या!, लातूरमधील धक्कादायक घटना

नांदेडमधील ऑनर किलिंग प्रकरणी आरोपीला फाशीच, हायकोर्टाकडून शिक्षेवर शिक्कामोर्तब

पुतणीला त्रास देणाऱ्या जावयाची लॉजमध्ये हत्या, चुलत सासऱ्याचा गळफास

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.