Nalasopara | ‘ये XXX रोता क्यू है’, नालासोपाऱ्यात पादचाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण, दोन माथेफिरु पसार

सुजित सिंग (वय 43) असे जखमी झालेल्या वाटसरुचे नाव असून तो जिओ टॉवर मध्ये काम करतो. नालासोपारा पश्चिमेच्या गुलमोहर अपार्टमेंटसमोर काल (रविवारी) रात्री 7:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.

Nalasopara | 'ये XXX रोता क्यू है', नालासोपाऱ्यात पादचाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण, दोन माथेफिरु पसार
नालासोपाऱ्यात माथेफिरुंची एकाला मारहाणImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 21, 2022 | 12:43 PM

नालासोपारा : दोघा माथेफिरुंनी एका वाटसरुला विनाकारण मारहाण (Attack) केली. मुंबईजवळच्या नालासोपारा (Nalasopara) शहरात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मारहाणीचा व्हिडीओ समोर आला असून त्यातून या घटनेची तीव्रता स्पष्ट होत आहे. रस्त्यावरून जाताना दोन अनोळखी माथेफिरुंनी ‘ये XXX रोता है क्यू’ अशी शिवराळ भाषा वापरत विनाकारण दगड आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. यामध्ये पादचारी गंभीर जखमी झाला आहे.

सुजित सिंग (वय 43) असे जखमी झालेल्या वाटसरुचे नाव असून तो जिओ टॉवर मध्ये काम करतो. नालासोपारा पश्चिमेच्या गुलमोहर अपार्टमेंटसमोर काल (रविवारी) रात्री 7:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे.

नेमकं काय घडलं?

रस्त्यावरून जाताना दोन अनोळखी माथेफिरुंनी ‘ये XXX रोता है क्यू’ अशी शिवराळ भाषा वापरत पादचाऱ्याला दगड आणि लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. या घटनेचा एक व्हिडिओ दुसऱ्या दिवशी सकाळी समोर आला आला. व्हिडीओमधील हाणामारी किती तीव्र होती, हे दिसत आहे.

एक हल्लेखोर चक्क बॅगेतील हातोडा घेऊन मारण्याच्या तयारीत होता, पण घटनास्थळावरील काही तरुणांनी त्या माथेफिरूला तात्काळ अडवल्याने मोठा अनर्थ टळला आहे. घटनेची माहिती नालासोपारा पोलिसांना कळताच, पोलिसांनी त्वरित घटनास्थळी दाखल होऊन हा वाद मिटवला.

दोन जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शशांक मुल्कराज (वय 26), दीपक शितप्रसात पांड्या (वय 27) असे मारहाण करणाऱ्या माथेफिरुंची नावं आहेत. त्यांच्यावर नालासोपारा पोलीस ठाण्यात कलम 324, 323, 504, 34 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. सध्या हे दोघेही फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

संबंधित बातम्या :

Sangli Crime | नातेवाईकांची बदनामी, बार मालकाचा माजी नगरसेवकावर खुनी हल्ला, दोघे गंभीर

Yavatmal Murder : डिजेवरचा ठेका जीवावर बेतला, यवतमाळमध्ये तरुणाची हत्या

मुंबईत पुरी भाजी विक्रेत्याचं ग्राहकाशी भांडण, लहान मुलीसह दोघांवर उकळतं तेल फेकलं

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.