Instagram सुपरस्टार होण्यासाठी यूपीहून मुंबईला, दोन अल्पवयीन मुली वसईत सापडल्या

उत्तर प्रदेशच्या प्रयाग नगर गणपत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन मुली होत्या. 26 डिसेंबर 2021 पासून या दोन मुली घरातून बेपत्ता होत्या. गणपत पोलीस ठाण्यात या दोन्ही मुली बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या आई वडिलांनी दाखल केली होती

Instagram सुपरस्टार होण्यासाठी यूपीहून मुंबईला, दोन अल्पवयीन मुली वसईत सापडल्या
प्रातिनिधीक फोटोImage Credit source: टीव्ही9
Follow us
| Updated on: Mar 24, 2022 | 7:49 AM

वसई : मुंबईला मायानगरी म्हटलं जातं, ते उगीच नाही. पूर्वी बॉलिवूडमध्ये नशीब आजमावण्यासाठी देशाच्या विविध कानाकोपऱ्यात युवक-युवती मुंबईत यायचे. आता जमाना सोशल मीडियाचा आहे. इन्स्टाग्रामवर (Instagram) सुपरस्टार होण्यासाठी दोन अल्पवयीन मुली यूपीहून मुंबईत आल्या होत्या. सुदैवाने या दोघींना पालकांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. उत्तर प्रदेशहून (Uttar Pradesh) वसईत (Vasai) आलेल्या दोन मुलींना शोधून माणिकपूर पोलिसांनी सुखरुप त्यांच्या वडिलांच्या ताब्यात दिले आहे.

काय आहे प्रकरण?

उत्तर प्रदेशच्या प्रयाग नगर गणपत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन मुली होत्या. 26 डिसेंबर 2021 पासून या दोन मुली घरातून बेपत्ता होत्या. गणपत पोलीस ठाण्यात या दोन्ही मुली बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या आई वडिलांनी दाखल केली होती. पण दोघींचाही शोध लागत नव्हता.

मोबाईल लोकेशनवरुन शोध

पोलिसांनी त्यांच्या मोबाईलचे लोकेशन शोधले असता त्या दोघीही महाराष्ट्रात मुंबईजवळच्या वसईत असल्याचे पोलिसांना समजले होते. त्यावेळी उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी वसईच्या माणिकपूर पोलिसांना याबाबत संपर्क साधून मुलींच्या काकांना या ठिकाणी पाठवले होते.

माणिकपूर पोलिसांनी शोध घेतला असता एक मुलगी वसईतील एका प्लॅस्टिक कंपनीत काम करत असल्याचं समजलं, तर एक मुलगी वसईच्या उमेलमान परिसरात राहत असल्याचे पोलिसांना लोकेशन मिळाले. पोलिसांनी या दोघींना शोधून तिच्या नातेवाईकांच्या सुखरूप स्वाधीन केले आहे.

संबंधित बातम्या :

लग्नात नवरीच्या पराक्रमाने लोकं म्हणताहेत, असली नवरी रशिया-युक्रेनच्या युद्धात पाहिजे..!

सौंदर्याचा आणि श्रीमंतीचा दूरदूरपर्यंत संबंध नाही, हे सिद्ध करणारे फुगे विकणाऱ्या मुलीचे खास फोटो

कच्चा बादामवरचे ठुमके तर बघा; भोजपुरी अभिनेत्री आम्रपालीचा इन्स्टावरचा व्हिडिओ व्हायरल

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.