घरात लटकवलेली पँट चोरली, खिशातल्या एटीएम कार्डवरच आयता पिन नंबर सापडला, मग काय…
एटीएम कार्डाचा पासवर्ड सुद्धा कार्डासोबत लिहून ठेवलेला असल्यानं या महिलांनी एटीएम कार्ड वापरून लिंबाळे यांच्या अकाऊंटमध्ये असलेले सर्वच्या सर्व पैसे म्हणजे साडेआठ हजार रुपये काढून घेतले. त्यामुळे लिंबाळे यांचं मोठं नुकसान झालं आहे.
अंबरनाथ : घरात लटकवलेली पँट भंगारवाल्या महिलांनी चोरून नेल्याची घटना ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात घडली आहे. या पँटमध्ये असलेला मोबाईल, रोख रक्कम, महत्त्वाची कागदपत्रं हेदेखील महिलांनी लंपास केलं. याशिवाय एटीएम कार्ड वापरुन बँक खात्यातील सर्वच्या सर्व म्हणजे साडेआठ हजार रुपयांची रोकडही काढून घेतली. चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
घराच्या उघड्या दरवाजातून आत शिरल्या
अंबरनाथ पूर्वेच्या आंबेडकर नगर भागात शनिवारी सकाळी ही घटना घडली. सकाळी सात वाजताच्या सुमारास दोन भंगारवाल्या महिला या परिसरात फिरत होत्या. त्यावेळी त्यांचं लक्ष बाळासाहेब लिंबाळे यांच्या घराकडे गेलं. या घराचा दरवाजा उघडा असल्यानं महिला घरात शिरल्या. त्यांनी घरात जाऊन दरवाजाला लटवकलेली पॅण्ट चोरली आणि पोबारा केला.
ही सगळी घटना या परिसरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली. या पँटमध्ये लिंबाळे यांचा मोबाईल, रोख रक्कम, एटीएम कार्ड आणि अन्य महत्त्वाची कागदपत्रं होती.
एटीएम कार्डवरच पासवर्ड लिहिणं महागात
धक्कादायक बाब म्हणजे एटीएम कार्डाचा पासवर्ड सुद्धा कार्डासोबत लिहून ठेवलेला असल्यानं या महिलांनी एटीएम कार्ड वापरून लिंबाळे यांच्या अकाऊंटमध्ये असलेले सर्वच्या सर्व पैसे म्हणजे साडेआठ हजार रुपये काढून घेतले. त्यामुळे लिंबाळे यांचं मोठं नुकसान झालं आहे.
महिलांचा शोध सुरु
यानंतर आता या महिलांना पकडण्याची मागणी लिंबाळे यांनी पोलिसांकडे केली आहे. तर पोलिसांनी लिंबाळे यांच्या तक्रारीनुसार या महिलांचा शोध सुरू केला आहे.
बदलापुरात दुकानातून मोबाईल चोरी
दुसरीकडे, बदलापुरात दुकानात मोबाईल विकत घेण्याच्या बहाण्याने चोरटा मोबाईल घेऊन पसार झाल्याची घटना घडली आहे. बदलापूर पश्चिमेला घडलेली ही घटनाही सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
दोन मोबाईल चोरुन धूम